नवीन लेखन...

आत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)

सरांनी ‘ फक्त आजचा दिवस ‘ मधील पुढील सूचना फळ्यावर लिहिल्या होत्या ..

७ ) आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरी मी तसे दर्शवणार नाही .

८ ) फक्त आजचा दिवस मानसिक व्यायाम म्हणून मी स्वतःला न आवडणाऱ्या दोन तरी गोष्टी करेन .

९ ) फक्त आज मी स्वतःसाठी एक दिनक्रम आखेन ..तंतोतंत पाळला गेला नाही तरीही मी दिनक्रम आखेन .

व्यसनी व्यक्ती त्याच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे सतत स्वतःच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार करत असतो ..त्याला त्याच्या वर्तनाने आसपासच्या इतर लोकांना काय त्रास होतोय याची परवा नसते ..प्रत्येक क्षणी आपण कोठे आहोत ? काय बोलतो आहोत ? काय करतो आहोत ? याचे आपण भान ठेवणे गरजेचे आहे ..अनेकदा आपण आई -वडील , भावंडे , पत्नी -मुले , यांच्याशी इतके दादागिरीचे ..आक्रमक ..त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करतो ..त्यांचे आपल्यावरील प्रेम ..त्यांचा अधिकार समजून न घेता अनेकदा आपण तोंडाचा पट्टा सोडतो ..त्यांना घायाळ करतो …वेगवेगळे आरोप करून त्यांना चूप बसवतो ..या वर्तनाने त्याच्या भावना दुखावल्या जातात ..त्यांचे आपल्यावर कितीही प्रेम असले तरी आपण केलेल्या अपमानाने त्यांना त्रास होतोच ..या उलट आपण स्वतच्या भावना मात्र खूप जपतो ..कोणी आपल्याशी काही वावगे बोलल्यास लगेच अविचाराने तिखट प्रतिक्रिया देतो ..समोरच्या व्यक्तीच्या वयाचा ..मानाचा..सामाजिक स्थानाचा ..कसलाही मागचा पुढचा विचार न करता दुरुत्तरे करतो .. ..खरेतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करणे गरजेचे असते कारण प्रत्येक गोष्टीचे अनेक पैलू असतात जे कदाचित आपणास माहित नसतात तरी लगेच आपण आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे लगेच जाहीर करून ..बहुधा त्याचे कारण पुढे करून व्यसन करतो ..हे कितपत योग्य आहे ? इतरांची मने जपणे व स्वतःची सहनशीलता वाढवण्यासाठी ही ‘ आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरीही तसे वर्तन करणार नाही ‘ ही सूचना केली गेलीय …

पुढच्या सुचने बाबत सांगताना सर म्हणाले ..व्यसनी व्यक्ती हा स्वताच्या आवडी -निवडी बाबत खूप दक्ष असतो ..अनेक गोष्टी करायला त्याला आवडत नाही ..त्या गोष्टी कितीही उपयोगाच्या असल्या तरी तो त्या गोष्टी करण्याचा कंटाळा करतो ..किवां त्या करणे पुढे ढकलत जातो ..उदा . सकाळी लवकर उठणे , नियमित नियमित योगाभ्यास करणे , घरातील जवाबदारीची कामे करणे ज्यात ..सामान आणणे ..घरचा गॅस सिलेंडर संपल्यास तो घेवून येणे …वीजबिले भरणे ..कुटुंबीयांसोबत फिरायला जाणे ..पत्नीसोबत खरेदीला जाणे..घरातील वृद्ध माणसाना मदत करणे ..पत्नीला घरकामात मदत करणे ..स्नेही नातलग यांना अधूनमधून भेटी देणे …लग्न समारंभ ..तसेच नातलगांच्या कार्यक्रमात सहभागी होणे ..पत्नीच्या नातलगांशी सलोखा ठेवणे ..अशा अनेक गोष्टी करणे आपण व्यसनांच्या काळात करणे टाळले आहे ..आता व्यसनमुक्तीचे जीवन जगत असताना या टाळलेल्या अथवा नावडत्या गोष्टी करणे गरजेचे आहे ..त्यामुळे आपली व्यसनमुक्ती बळकट होते ..तसेच कुटुंबीय व समाजाचा गमावलेला विश्वास परत मिळवता येतो …

शिस्तबद्ध व उपयुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने रोज स्वतःसाठी एक दिनक्रम आखणे गरजेचे असते ..आपल्या जवाबदा-या ..कर्तव्ये ..या खेरीज फावला वेळ कसा उपयुक्ततेने व्यतीत करता येईल असा हा दिनक्रम असावा ज्यात आपले शारीरिक आरोग्य ..मनोरंजन ..आपले छंद जोपासण्यासाठी देखील वेळ दिला गेला पाहिजे ..पूर्वी आपण समोर येईल तसे आयुष्य जगत गेलो ..वाट्टेल तसे वागलो ..नेमका चांगल्या गोष्टी करण्यासाठी शिकण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही ..आता व्यसनमुक्त जीवन जगत असताना आळशीपणा ..कंटाळा ..बोर होणे ..वगैरे गोष्टी टाळून एका विशिष्ट दिनक्रमानुसार जीवन व्यतीत केले तर ..आपले झालेले बहुतेक नुकसान लवकर भरून काढता येवू शकते …वेळ सत्कारणी लावता येतो ..आपण आखलेला दिनक्रम कधी कधी तंतोतंत पालन करणे आपल्याला काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य होणार नाही ..मात्र त्यामुळे निराश होऊन प्रयत्न सोडून न देता आपण नियमित दिनक्रम आखून तो पाळण्याचा प्रयत्न सोडता कामा नये ..
वरील स्पष्टीकरण झाल्यावर सरांनी आम्हाला प्रश्न दिला .. तुम्ही इथे राहत असताना …येथील थेरेपीज च्या वेळा सोडून इतर वेळी काय काय करायचे ? याचा एक दिनक्रम ठरवून तो डायरीत लिहा .

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..