नवीन लेखन...

कायदेविषयक लेखन

संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा

सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रामुख्याने वार्षिक सर्वसाधारण, विशेष सर्वसाधारण आणि अधिमंडळ यांची मासिक सभा. सर्वसाधारणपणे नावातून आपण अंदाज घेऊ शकतो को, वार्षिक (वर्षातून एकदा), अधिमंडळ सभा मासिक (महिन्यातून एकदा) परंतु विशेष सर्वसाधारण सभा कधी, कोण, कशाप्रकारे आणि कशासाठी बोलावण्यात येते? याबाबतची माहिती सदर लेखातून आपणास मिळणार आहे. […]

गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा

डेव्हलपर त्याच्या डोक्यावरील भार लवकरात लवकर उतरवायला उत्सुक असतो. तर कधी दिलेली आश्वासनं बिल्डरने पूर्ण करत नाही तोपर्यत काही सदस्य संस्थेचा ताबा घेण्यास तयार नसतात. काही संस्थेचे सदस्य आणि बिल्डर याचे वाद कोर्टात प्रलंबित असतात. तर अनेक सदस्यांना प्रश्न असतो, संस्था नोदणी झाली… पुढे काय? नविन संस्था एक इमारत १५० ते २०० त्याहून अधिक सदस्य असल्याने कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे आणि वाढले आहे. अनेक प्रकारचे करार तपासावे लागतात. तेव्हा अशा स्वरूपाच्या कामाची माहिती असलेला कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने कारभार केल्यास सदस्याचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदतच होईल. आजच्या भागात पहिल्या सर्वसाधारण सभेची माहिती आपल्यासाठी. […]

संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

केंद्र शासनाच्या सूचनेवरून सहकार कायद्यात २०११-२०१२ पासून २०१९-२०२० पर्यत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. बऱ्याच सुधारणा अमलात आणण्याआधीच नविन सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे अनेकदा सदस्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते. बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये काम करण्यास सदस्य उत्सुक नसतात. त्यात वारंवार होणारे बदल याची काहीही कल्पना नसते. संस्थेमध्ये उपविधीची प्रत मागणी केल्यास उपलब्ध होत नाही. काही संस्थाचा पत्रव्यवहार पाहून तर मला असे आढळून आले की, बरेच जण उपविधीला कायदा समजतात. अनेक संस्थांमध्ये तर त्यांचा स्वत: तयार केलेला कायदा चालतो. जे कायद्याने चुकीचे आहे. प्रत्यक्षात (कायदा) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०; (रुल्स) महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१, (बाय लॉज) उपविधी, परिपत्रके, आदेश या सर्व वेगवेगळ्या असून या बाबी एकत्र पहाव्या लागतात. तरीही कधी मनात आले की निवडणूक किंवा सर्व पदाधिकारी यांनी एकाच वेळी राजीनामा देणे आणि सरकारी अधिकृत व्यक्ती संस्थेत आणले म्हणजे खूप चांगले केले असे वाटत असले तरी काही महिन्यांनी पुन्हा संस्थेच्या सदस्यांना पुढाकार घ्यावाच लागतो. […]

सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती

अनेक संस्था पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांत सातत्याने विचारलेला प्रश्न म्हणजे अधिमंडळाच्या सभेस उपस्थिती किंवा संस्थेच्या इलेक्शन वेळी सदस्य कोणाला म्हणावे? कायदा सर्वसामान्यांना माहित असतोच असे नाही. तेव्हा काही पदाधिकारी गोंधळून जातो. त्यामुळे सभेतील विषयांचे वाचन होण्याआधीच वातावरण तापलेले असते. काही कुटुंबातील व्यक्ती मूळ सदस्याचे पत्र घेऊन किंवा कुलमुखत्यार घेऊन येतात. जे पूर्णपणे चुकीचे असते. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की, संस्थेचा सदस्य म्हणून कोण पात्र असतात आणि कोणत्या शर्ती त्या व्यक्तींना पूर्ण कराव्या लागतात. […]

गृहनिर्माण संस्थेचे हेल्थ चेकअप कसे कराल ?

येणाऱ्या नवीन सहकार वर्षात, सदस्य आणि संस्थेचे पदाधिकारी यांत परस्पर सौदाह्याचे, आनंदाचे व सहकार्याचे वातावरण तयार करण्यास तसेच होणाऱ्या चुका कमी करण्याबाबत काय करावे? असा प्रश्न एका सदस्याने विचारला. “Precaution is always better than cure”. याचे उत्तर ज्या प्रमाणे इन्कमटॅक्स साठी CA, आजारी पडलात की डॉक्टर, त्याप्रमाणे आपण स्वत: आपला मौल्यवान वेळ कायद्याची पुस्तके वाचून चुकीचे निर्णय घेण्याआधी योग्य कायदेतज्ञ यांचा सल्ला आपल्याला नक्कीच उपयोगी येईल. बहुतेक लोकांना उपविधी म्हणजे कायदा किंवा एखादा सोशल मिडिया मेसेज हा आपल्या मनासारखा असेल तर बरोबर अशी चुकीची समजूत असते. आज या लेखात तुम्हाला सदस्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती देत आहे. […]

संस्थेच्या पदाधिकारी यांची सहकार वर्ष अखेरची वैधानिक कामे

कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मन:स्थिती बदलायची असते. सहकार वर्ष हे ३१ मार्चला संपते. वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्याच्या कालावधीत संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण करून पुढील दोन महिन्यात सदस्यांची अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलावणे कायद्याने बंधनकारक असते. परंतु पुढील महिन्यापासून करावयाची वैधानिक कामे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था सोडल्यास इतर संस्थेत आनंदी आनंद असतो. पदाधीकार्‍याकडे कारणाची न संपणारी यादी असते. परंतु योग्यप्रकारे वेळीच काम केले तर भविष्यात आपला मौल्यवान वेळ वाचण्यास नक्कीच मदत होईल. […]

साठे खत/खरेदी खत कधी करतात?

घराच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा आपल्या मालमत्तेची कागदपत्रे इंटरनेट, सोशल मिडिया किंवा आपल्या परिचित व्यक्तींकडून घेतलेल्या कागदपत्रात थोडेफार फेरफार करून पैसे वाचवल्याचं आनंद हा तात्पुरता न राहण्यासाठी कायदेतज्ञांकडून करणे हे नेहमीच भविष्याच्या दृष्टीने चांगले असते. कारण प्रत्येक करार त्यातील अटी ह्या वेगळ्या असतात. अन्यथा तुमची छोटीशी निष्काळजी पुढे महागात पडू शकते. […]

आंतरराष्ट्रीय न्याय दिन

संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख सहा अंगांपैकी ‘आंतरराष्ट्रीय न्यायालय’ हे “न्यायविषयक” अंग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस-ICJ) प्रामुख्याने राष्ट्रांमधील वाद ऐकले जातात. आंतरराष्ट्रीय न्यायालय हा संयुक्त राष्ट्रांच्या व्यवस्थेचा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे. ती कधीही बरखास्त होत नाही. […]

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची गणपुर्ती व इतिवृत्त बाबत

आजच्या लेखात तुम्हाला तुमची संस्था योग्य त्या प्रकारे काम करत आहे का ? नसल्यास याबाबत तुम्ही हक्काने व्यवस्थापन सदस्यांना प्रश्न विचारू शकता.
[…]

गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी व कशाप्रकारे घ्यावी?

हकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात. […]

1 2 3 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..