हे कधीतरी घडणार होते आचके देत रुग्णालयात आय सी यु मध्ये असणाऱ्या रुग्नाप्रमाणे शेवटी महाराष्ट्र परिचय केंद्राचे पणजीतलं कार्यालय बंद पडले व शेवटी महाराष्ट्राशी असणारा दुवा निखळला असे खेदाने म्हणावे लागेल. […]
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. […]
सुमारे 8 अब्ज वर्षांपूर्वी, संशोधकांनी मांडले की, दोन बटू आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या. त्या वैश्विक अपघातामुळे त्या दोन आकाशगंगांमधील वायूचे विभाजन होऊन अनेक नवीन बटू आकाशगंगा तयार झाल्या, ज्यात दोन गडद पदार्थ-मुक्त आकाशगंगा आहेत. […]
अवघड मार्ग आणि अनवट वाटांवरुन द-याखो-यात भटकणारऱ्या गिर्यारोहकानी गिर्यारोहणाबरोरच आपली समाजसेवेची आवड जोपासत महाड तालुक्यातील दरडगस्त सह्याद्रीवाडीत इमारती विना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या नव्या इमारतीचा आसरा दिला आहे. […]
कोरोनाच्या अभूतपूर्व वातावरणात अभूतपूर्व असं अधिवेशन संसदेत सुरु झालंय.. त्यामुळे ते आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आणि नुसतं सरकारी बिले पास करण्याच्या सोपस्कारात उरकल्या जाऊ नये. तर, सरकार आणि विरोधी पक्षाच्या राजकारण विरहित सामंजस्यचा एक नवा इतिहास या अधिवेशनातुन घडवला जावा यासाठी हा लेखन-प्रपंच आहे. […]
केरळने अशी कोणती गोष्ट केली की ज्याच्या मुळे त्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज मे महिन्याच्या २० तारखेपर्यंत बऱ्यापैकी मर्यादित राहिलेली आपल्याला दिसते आहे ? […]
मुळात, कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी नुसता कायदा कठोर असून चालत नाही, तर कायदा बनविणारे आणि राबविणारे हातही प्रामाणिक आणि निष्पक्ष असावे लागतात. आपण गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा होईलच. हा धाक गुन्हेगाराच्या मनात निर्माण व्हायाला हवा. तेंव्हा कायदा अशा प्रकाराला काही प्रमाणात रोखू शकेल. पण सध्या तेच होत नाहीये. […]
देशात आज पर्यंत लाखो गुन्हे झाले, मग त्या तुलनेत पोलिसांनी किती जणांचे एन्काऊंटर केले..? टक्केवारीत आकडा उलगडला तर ते प्रमाण 0.01 च्या आसपास येईल. गुन्हा करूनसुद्धा न्यायालयातून निर्दोष सुटणाऱ्यांचं प्रमाण काढलं तर तो आकडा ‘आभाळा’ एवढा भासेल. Extra judicial killing ला माझा पाठिंबा आहे असं बिलकुल नाही, मी फक्त मिडियापुढं बडबडणाऱ्या बुद्धिवंतांच्या सत्येतला विरोधाभास दाखवतोय. […]
बलात्कार आणि खुनासारखं नृशंस अमानवी कृत्य करणाऱया बेदरकार गुन्हेगारांना असाच धडा शिकवला जावा, कोर्ट कचेरयांच्या भानगडीत वेळ न दवडता आशा प्रकरणातील आरोपींना अशीच शिक्षा दिली जावी, ह्या जनभावना देशाच्या विविध स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे ह्या घटनेला अयोग्य मानणाराही एक वर्ग आहे. कायद्याच्या राज्यात पोलिसांनी अशाप्रकारे कायदा हातात घेणे हे या वर्गाला रुचलेले नाही. अर्थात, पोलिसांच्या समर्थनातील आवाजाच्या समोर आज त्यांचा आवाज काहीसा क्षीण आहे. […]
नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल. […]