मराठी भाषेचा, मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्राचा सर्वात मोठा साहित्योत्सव कोणता? यात मतभेद होण्याची शक्यताच नाही. सर्वांचं एका आवाजात उत्तर येईल – ‘दिवाळी अंक’. या उत्सवाचा ‘दिवाळी मुहूर्त’ कायम आहे हे त्याचं आणखी एक वेगळेपण. मराठीत ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषे अक्षर वैभव ! १०६ वर्षे मराठी भाषेचा हा साहित्यजागर होत आहे आणि यापुढेही होत राहील. […]
मराठी वाचनानंदात मग्न असलेल्याला दिवाळी अंक नाहीत नाही, असं होऊच शकत नाही. ही चटक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९मधे लावली आणि दिवाळी अंकाचे हे लोण इतकं पसरत गेलं आहे की, त्याची व्याप्ती आकाराच्या बाबतीत मोजायची झाली तर ती रामायण-महाभारतालादेखील मागे सारील! […]
मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोश रचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या. […]
पुस्तक प्रदर्शनाच्या मॉलमधून फेरफटका मारताना नेमका हाच अनुभव मिळतो. याची जाण मॉलच्या प्रदर्शनीय खरेदीतून ग्राहकाला येऊ लागलेली आहे. त्यातूनच शहर, गांवागावांत, सभासंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमातून वा अन्यत्र सातत्याने भरणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची विक्रमी विक्री उच्चांकाचे परीघ उंचावित अधिकाधिक उलाढाली करू लागली आहे. […]
श्रावण महिना घेऊन येतो आनंद, उत्साह आणि जगण्याची नवी उमेद. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात. वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य,पर्यावरण,संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल. […]
भारतातील लेखक-प्रकाशकांचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ व आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात मोठे प्रकाशक ठरलेल्या सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात मुद्रण कलेच्या माध्यमातून केलेली ‘ज्ञानक्रांती’ आजच्या ‘ऑनलाईन’ जमान्यात समजून घेणे मार्गदर्शक ठरेल. […]
ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय? […]
दुर्गा भागवतांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र लोकसाहित्याचे. मराठीत भाषांतरित झालेल्या लोकसाहित्याबद्दल दुर्गाबाईंच्या खूप तक्रारी होत्या. मराठीत उत्तम अनुवादकांची वाण तेंव्हाही होतीच. भाषांतरावरून भाषांतरे करणे, संक्षिप्त रुपांतरे करणे, रूपांतर करताना मूळ नावे, स्थळे, घटना इत्यादी बदलून टाकण्याची भ्रष्ट प्रथा महाराष्ट्रात पडली त्याविषयी दुर्गाबाई नाखूष होत्या. या नाखुषीतून त्यांनी आगरकरांच्या हॅम्लेटलाही सोडले नाही. […]
या प्रपंचाची सुरुवात नक्की कधी झाली ते सांगणे अवघड आहे. कॉलेजमधून घरी जाताना डेक्कनकॉर्नरवरून जाणे व्हायचे. वाटेतला एक ठिय्या म्हणजे श्री. प्रभाकर साळुंखे यांचा लकडीपुलाच्या कोपऱ्यात लागणारा पुस्तकांचा स्टॉल (अजूनही साळुंखे तिथे नेमाने हजेरी लावतात). माझ्या सुदैवाने मला तिथे न. वि. पणशीकर यांनी संपादित केलेली तुकारामगाथा मिळाली आणि तुकाराम समजून घेण्याचे काम सुरु झाले. जेव्हा हे […]
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत. […]