मुंबईचा सिंह – फिरोजशहा मेरवानजी मेहता
फिरोजशहा मेरवानजी मेहता एल्फिन्स्टन कॉलेजमधून एम्.ए. होऊन इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजींचा प्रभाव पडला. ते बॅरिस्टर होऊन १८६८ मध्ये हिंदुस्थानात आले आणि मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. १८६९ साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बाँबे असोसिएशन मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला. […]