गुजरातमध्ये ‘चांपानेर-पावागड’ ही पर्यटनस्थळ बघायची ठरवून अहमदाबाद मार्गे ‘पंचमहाल’ जिल्ह्यातल्या चांपानेरला पोहोचलो. तसं बडोद्याहून ४८ कि.मी. अंतरावर चांपानेर आहे. पावागडाचा पायथा म्हणजे ‘चांपानेर’ पावागडावरची कालिकामाता खूप प्रसिद्ध आहे. नवरात्रात तर येथे मोठीच यात्रा भरते. […]
मी सर्वप्रथम अमेरिकेत अपूकडे गेले ती 1998 साली.म्हणजे 25 वर्षांपूर्वी…. !पहिल्यांदाच विमानाचा प्रवास..आणि तो देखील इतक्या दूरचा आणि एकटीने करायचा… ! मी मुंबईतही कधी एकटीने प्रवास केल्याचं मला आठवत नाही.सासरी जायचं असो नाहीतर माहेरी जायचं असो. […]
सध्या गड-कोट – किल्ले ह्यासंबंधी खूपच कुतूहल वाढलेले आहे. ह्याठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली आहे आणि हे उत्तमच आहे. अगदी त्याचप्रमाणे पर्यटकांची लेण्यांकडेही रीघ लागू दे, अर्थात अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे आदी लेण्यांकडे रीघ आहेच. पण छोट्या छोट्या उपेक्षित लेण्यांकडेही रीघ लागू दे… […]
पर्यटन विशेषांकासाठी संस्कृत साहित्यातील मेघाचा रामगिरी ते अलका व्हाया उज्जैन असा प्रवास किंवा रघुवंशातील रामाने सीतेसह वानर आदींचा घडलेला लंका ते अयोध्या प्रवास या दोन विषयांबाबत काही लिहाल का? अशी विचारणा झाली. त्याला पूर्वी कधीतरी मीच उल्लेख केलेल्या डॉ. भावे आणि डॉ. सोहोनी यांच्या सदीप व्याख्यानाच्या स्मृतीची पार्श्वभूमी होती पण मग मी म्हटलं, त्या प्रवासांवर स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली आहेत […]
मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य असल्यामुळे घटक निसर्गातील विविधता त्याच्या मनाला फार पूर्वीपासून म्हणजे आदिमानवाच्या काळापासून आकर्षित करीत असावी. शिकार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मानवाला शिकारीच्या शोधात दूरवर जावे लागत असे. एका ठिकाणी मिळणारी शिकार कमी झाली की त्याला ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जावे लागे. […]
आम्ही या वर्षीच्या जानेवारीत अमेरिकेला गेलो होतो. या छोटयाशा तीन आठवडयांच्या ट्रीपमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर इथले सुपर हायवेज – एक्सप्रेसवेज. खरंच फार सुंदर आणि शिस्तशीर आहेत. या रस्त्यांवरून कोणीही अगदी आरामात एका दिवसात (१०-११ तासात) एक हजार किमीचा प्रवास करू शकतो. […]
लेक फॉरेस्ट इथल्या EI Toro Branch Library या लायब्ररीला आम्ही आज भेट दिली. Friends of the library bookstore खरं तर आम्ही लायब्ररीत शिरलोच नाही. या तिच्या दर्शनी भागात बाहेर साधारण चार, साडेचार फूट उंचीच्या तीन रॅक्स होत्या. […]
श्रीनरसोबावाडी हे एक परमपावन सुंदर महाक्षेत्र आहे! कृष्णा व पंचगंगा ह्या दोन नद्यांच्या संगमामध्ये एक चौरस मैल क्षेत्रामध्ये बसलेले आहे. हे महाक्षेत्र कृष्णेच्या पश्चिम तीरावर विराजमान असून दोन्ही नद्यांच्या तीरांना हे शोभनीय आहे. कृष्णेच्या एक्कावन पायऱ्यांच्या भव्य घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षातळी सुंदर शीलामय मंदिर आहे. […]
अमेरिकेत पोलिस यंत्रणेकडे सामान्य नागरिकाचा सहृदय मित्र म्हणूनच पाहिले जाते. घरात काही गडबड झाली आणि विशिष्ट नंबर फिरविला तर पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहोचतात. लहान मुलांच्या बाबतीत तर ते अधिक तत्पर, संवेदनशील आणि संरक्षक असतात. […]
अमेरिकेत शहराशहरात सरकारी आणि स्वतंत्ररित्या चालवलेल्या शाळा असतात. स्वतंत्रपणे चालवलेल्या शाळांमध्ये फी अधिक असते. तुलनेने सरकारी शाळांमध्ये कमी. श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये घालतात. […]