रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. […]
अशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत. […]
नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा. […]
सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे, हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. […]
कोरोनामुळे बदलत असलेल्या परिस्थितिमुळे विविध साधक बाधक बदल आपल्या जीवनशैलीवर झाले व होत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहीले नसून स्वतः चा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणारे व्यावसाईक, स्वतःचे कौशल्य व ज्ञान वाढवून वरीष्ठ पद मिळवू इच्छिणारे नोकरदार,स्पर्धात्मक युगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणारे महत्वाकांक्षी विदयार्थी अशा समाजातील बहुतांश गटाला सध्या ऑनलाईन शिक्षण आणि त्या बाबतीतील कोर्सेसची आवश्यकता भासतेय. […]
एका छोट्याशा प्रसंगातून, एक रोमांचकारी भावनिक आणि जीवनाच्या महान तत्वज्ञानाचे विवरण मी त्या गृहस्थाकडून ऐकत होतो. त्यानी जे सांगीतले, त्यानी मी भारावून गेलो. जीवन म्हणजे काय ? जगायचे कसे व कां हे त्यानी जाणले असावे, हे मला उमगले. मी उठून त्याना अभिवादन केले. […]
आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता. ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची परत फेड व्हावी आणि त्यासाठी एखादी नैसर्गिक घटना घडावी ह्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. कृत्रिमरित्या व आपल्या प्रयत्नाना आपण एखद्या गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. […]
डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे. […]
माझ्या डोळ्यातही एक दैवी असा कॉम्पुटर (Computer ) आहे. असे मला वाटते. तो दैवी माऊस( Mouse ) क्लीक केल्यावर, माझ्या मनावर कोरल्या गेलेल्या साऱ्या आठवणीना उजाळा मिळतो. त्या काळाची त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत सामावलेली ती छबी, आजही चटकन Display अर्थात प्रक्षेपित होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते. […]
मी पहिले पाऊल जेव्हा ऑस्टिन एअरपोर्ट बाहेर जमिनीवर टाकले, तेव्हा आपले नगरपण असेच स्वच्छ असावे असे वाटून गेले. आणि तसे ते दिसेल हि. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेतले तर. आपले महामार्गहि, इथल्या इतके रुंद नसले तरीही, चांगलेच आहेत. येथील रस्त्यावर आपल्या इतके जाहिरातीचे प्रस्त दिसले नाही. रस्त्यावर केवळ दिशादर्शक, गरजेचे फलक मात्र आहेत, आणि तेही वाहन चालकाच्या नजरेच्याटप्प्यात सहज येण्याच्या उंचीवर. […]