नवीन लेखन...

कुटुंबयात्रा !

१९६५ साली आजीच्या आग्रहाखातर वडिलांनी आई,मी आणि धाकटा भाऊ यांच्या समवेत पहिली कुलदेवतेची यात्रा योजिली तेव्हा भुसावळ-तुळजापूर हा द्राविडी (का द्रविडी) प्राणायामी प्रवास होता. […]

मी आणि हदेप्र – हरिभाई देवकरण प्रशाला !

भुसावळमध्ये असताना प्राथमिक शाळेला “बालवाडी वा शाळा” आणि माध्यमिक शाळेला “हायस्कूल ” म्हणणारा मी ऑगस्ट ७४ ला सोलापूर नामक महानगरात पाऊल टाकल्यावर “प्रशाला “या नव्या शब्दाला भेटलो. […]

गुरुदक्षिणा

आज हे पत्र लिहायलाच हवं. एक वर्ष उशीर झालाय. मागील गुरुपौर्णिमेला संकल्प सोडला होता या पत्राचा आणि वर्षभरानंतर तो पूर्ण होतोय. उशिराला कारण काहीच नाही. सारंगकडून तुमचा पत्ता मिळाला पण तो लिफाफ्यावर असणार. आतमध्ये काय? हे सगळं “आतलं ” तुमच्यासारख्या गुरुजनांनी दिलेल्या ओसंडून वाहणाऱ्या पोतड्यांची देणगी आहे. हे व्यक्त व्हायला गुरुपोर्णिमेसारखा मुहूर्तच हवा. […]

” मधल्या सुट्टीतील डबा “

मागे वळून बघण्याच्या वयात आल्यानंतर सगळ्यांनाच स्नेहमेळाव्याची/बालपण भेटण्याची ओढ लागते. आम्ही त्याला अपवाद नाही. माझ्याकडे भेटीचे असे तीन पर्याय आहेत- भुसावळचे शाळूसोबती, सोलापूर हदे चे मित्र आणि सांगलीच्या वालचंदचे स्नेहगडी ! संधी मिळेल तशी मी प्रत्येक पाणवठ्यावर हजेरी लावत असतो. […]

एकावर एक !

बघता बघता आपण नकळत स्वतःला “शिक्क्यांची ” सवय लावून घेतो. उदा- टाटा इंडिका म्हणजे टॅक्सी, मारुती व्हॅन म्हणजे स्कूल व्हॅन, (आमच्या लहानपणी) भाजलेले शेंगदाणे म्हणजे चित्रपटाचा इंटरव्हल, तसेच पुण्यातील भनाम (भरत नाट्य मंदिर) वरचा शिक्का म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा अथवा एकांकिका. […]

कण्हेरी मठ

कोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली – ABP माझा कट्टया वर ” अदृश्य “काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर ! […]

खिद्रापूर !

खिद्रापूर – सांगलीपासून सुमारे ५१ किमी अंतरावर, नृसिंहवाडीपासून जवळ ! फार पूर्वी गेलो होतो पण आताची नजर जरा वेगळी होती. राष्ट्रीय वारसा, पण बऱ्यापैकी दुर्लक्षित ! […]

पतझडीच्या नोंदी !

मुक्ताईनगरच्या प्रवासाची अपूर्वाई माझी भगिनी आणि बंधू यांना जास्त होती कारण १९७५ च्या जडण-घडणीच्या वयापासून ते आता पोक्तपणाच्या (२०२२) वयापर्यंतीच्या वाटचालीत ते या परिसरापासून दूर होते. साहजिकच त्यांची (आणि नेहेमीप्रमाणे उगाचच माझीही) अवस्था- “छोड आए हम वो गलियाँ ” अशी झाली होती. परतल्यावर मला सहज चाळताना चक्क २२/०४/२०१३ ची खालील नोंद आढळली. […]

आनंदाचे बुडबुडे !

त्यामुळे “हॅपी व्हेन ” ऐवजी “हॅपी नाऊ ” ही विचारसरणी चिरकाल आनंद देऊ शकेल. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता आणि बाह्य बदल न करताही आनंदाची पातळी वाढविण्याचे प्रयत्न सुरु ठेवणे हे इष्ट ! […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..