नवीन लेखन...

‘प्रकाशलेलं’ आकाश

आकाशनिरीक्षणाच्या दृष्टीनं उत्तम आकाश म्हणजे कसं? हजारो ताऱ्यांनी गच्चं भरलेलं…  आकाशगंगेच्या पट्ट्याचं सहजपणे दर्शन देणारं… तेजस्वी ताऱ्यांपासून ते अगदी अंधूक ताऱ्यांपर्यंत सर्वांना ‘सामावून’ घेणारं! अर्थात हे वर्णन झालं शहरापासून दूरवरच्या आकाशाचं – जिथे इतर कोणत्याही प्रकाशाचा स्रोत अस्तित्वात नाही, अशा ठिकाणचं. शहरात अर्थात असं आकाश दिसणं शक्यच नाही. […]

कसबा संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. ‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, […]

लाखांची गोष्ट

शहरामध्ये बँकांचे आपसातील व्यवहार जेथे चालतात, त्याला समाशोधनगृह (Clearing House) म्हणतात. बँकेचे ग्राहक विविध बँकाचे चेक, डिव्हिडंड वारंट (Dividend Warrant), ड्राफ्ट वगैरे त्यांच्या खात्यात जमा करावयास देतात. ते चेक, डिव्हिडंड वारंट वगैरे त्या त्या बँकेला देण्यात येतात. ती बँक ते चेक, डिव्हिडंड वारंट ज्यांचे आहेत, त्यांच्या खाते नावे टाकतात. आणि ती रक्कम ते देणाऱ्या बँकेच्या खात्यात जमा करतात. […]

मिले सूर मेरा तुम्हारा….

मला हा लेसन शिकवशील का? आणि धडा काढून दाखवला.नातवानं तो तर शिकवलाच आणि ते नेमके कोणते गाणे होते हे त्याला दाखवायला सांगितले आजोबांना. अभ्यासक्रमात काही धडे वेगवेगळ्या कारणांमुळे निवडलेले असतात. […]

तेथे कर माझे जुळती

सिंगापूर सरकारने अनेक उत्तम योजना राबवत ज्येष्ठ नागरिकांचे महत्व राखले आहे आणि म्हातारपण हे सुखकारक होण्यासाठी हातभार लावला आहे. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी सिंगापूरचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे कायदे आणि नियम तपासले. सिंगापुरात कायद्याने 60 वर्षाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते. […]

‘लॉटरीचे तिकीट’- स्वप्न आणि इच्छा पूर्ती!

….पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या  दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी  लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले . […]

रोमन काँक्रीट

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या रोमन साम्राज्यानं मोठा भूभाग व्यापला होता. या रोमन साम्राज्याच्या खुणा आजही युरोपात भूमध्य सागराजवळच्या देशांत, तसंच उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिआतल्या अनेक भागांत, त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांच्या स्वरूपात दिसून येतात. […]

कोणाच्यो म्हशी?

चांगदेव आणि कुटूमातली सगळीजणा म्हशीक  हाकीत हूती तरी म्हस जाग्यावरना हलत नाय हूती. चांगदेवान जावन बेडरूमातना भायर पडणारा दार उघडल्यान आणि म्हशीक हाकूक लागलो तरी म्हस जावक मागना. लय येळ प्रयत्न करून पण म्हस जागची हलना. अकेरेक चांगदेवान गाव गोळा केल्यान. संत्याकडे निरोप धाडल्यानी.संत्याची लाली म्हस मारकुटी हूती ती उभ्या गावाक म्हायती. म्हस बेडरूमात गेली कशी हेच्यावर चर्चा रंगली. […]

आणखीन एक

दुपारची वेळ, डोळ्याला डोळा नुकताच लागला होता. नको त्या वेळेस घणघण्याची फोन ची सवय. सवयीप्रमाणे तो घणघणलाच. कुस बदलून घेतला. ओळखीचा नंबर नव्हता. माझ्या सारख्या छोटया पडद्यावरच्या अभिनेत्याला सुद्धा असे unknown number घेणे आवडत नसते, ego issue म्हटले तरी चालेल. पण गेले कित्येक दिवस घरात बसून कंटाळलोच होतो. विचार केला, जरा वेळ चांगला जाईल आणि फोन […]

1 2 3 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..