नवीन लेखन...

अखंड खंड

पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते. […]

‘बूमरँग’ अशनी!

अशनी म्हणजे अंतराळात फिरणारे दगड-धोंडे. या अशनींपैकी काही अशनी पृथ्वीवर पोचतात. यांतील छोट्या आकाराचे अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचण्यापूर्वीच जळून नष्ट होत असले, तरी मोठ्या आकाराचे अशनी हे मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचू शकतात. असे अशनी जर वाळवंटासारख्या फिकट रंगाच्या प्रदेशात पडले, तर त्यांचे तुकडे या वाळवंटी प्रदेशात काहीसे सहजपणे सापडू शकतात. […]

ड्रॅक्यूलाचे अश्रू

सन १८९७मध्ये प्रसिद्ध झालेली, ‘ड्रॅक्यूला’ ही ब्रॅम स्टॉकर यांची कादंबरी म्हणजे एक भयकथा आहे. ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की त्यावर अनेक चित्रपटही निघाले. या कादंबरीतलं ड्रॅक्यूला हे पात्र रक्तपिपासू आहे. हे पात्र लेखकानं, रोमानिआमधील वॉलॅशिआ प्रदेशात पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या, व्लाद (तिसरा) या क्रूर लष्करी सरदारावर बेतलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण, या कांदबरीलाही आजच्या रोमानिआची पार्श्वभूमी लाभली आहे आणि तिसरा व्लाद हा स्वतः ‘ड्रॅक्यूल्ये’ या नावानंही ओळखला जायचा. […]

हिरवं थर?

भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत. […]

किपचोगेचं यश

मॅरॅथॉन शर्यत ही अ‍ॅथलेटिक्समधली एक अत्यंत प्रतिष्ठेची शर्यत आहे. सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत धावपटूच्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण कस लागतो. साहजिकच या स्पर्धेकडे फक्त क्रीडातज्ज्ञांचंच नव्हे, तर संशोधकांचंही लक्ष असतं. गेल्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे तीन तासांत पूर्ण केली जाणारी ही शर्यत, आजचे खेळाडू ती जवळपास दोन तासांत पूर्ण करू लागले आहेत. […]

भूकंपाचं भाकीत

तीव्र भूकंप ही प्रचंड हाहाकार उडवणारी नैसर्गिक घटना आहे. तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. भूकंपाच्या काही तास अगोदरच जर या भूकंपाचं भाकीत करता आलं, तर लोकांना योग्य ती सूचना देऊन, ही जीवितहानी कमी करणं शक्य होईल. परंतु भूकंपाचं भाकीत करता येईल, अशी खात्रीशीर भूकंपपूर्व ‘लक्षणं’ संशोधकांना सापडलेली नाहीत. त्यामुळे भूकंपाच्या पुरेसा वेळ अगोदर, भूकंपाचं भाकीत वर्तवणं अजून तरी शक्य झालेलं नाही. […]

महाकाय देवमासा

पृथ्वीवर आज अस्तित्वात असणारा, सगळ्यात वजनदार प्राणी म्हणजे निळा देवमासा. मात्र या देवमाशालाही वजनाच्या बाबतीत अगदी सहजपणे मागे टाकेल, असा एक देवमासा प्राचीन काळी अस्तित्वात होता. प्राचीन काळी म्हणजे खूपच पूर्वी – सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी. हा देवमासा फक्त निळ्या देवमाशापेक्षाच वजनदार नव्हता, तर तो आतापर्यंत पृथ्वीवर होऊन गेलेल्या कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वजनदार प्राणी ठरला आहे. […]

प्रचंड हिरा

हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील कार्बनचं रूपांतर हिऱ्यांत होऊ शकतं. […]

पर्यावरणस्नेही लाकूड!

आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात. […]

सापाचे कान!

साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे. […]

1 2 3 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..