नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

देणगी दिली नाही तरी “भाविकांसाठी” प्रसाद थाळी मिळतेच.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव कडून लाॅकडाऊन मधील गरजूंना महाप्रसाद वाटप..गजानन महाराज ट्रस्ट एकमेव आहे की एक कुटुंब चालवत असूनही ना गाजावाजा ना प्रसिद्धी ना कर चुकवण्यासाठी खटपट ना कसली अभिलाषा इच्छा. खरच कौतुकपालिकडे.विनम्रता,सेवा,स्वछ्यता,शांतता…एक नंबर..एखाद्या 5 स्टार हॉटेल मध्ये मिळणारी नम्रपणाची वागणूक आपल्याला बघायला मिळते. […]

कालिकाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले कालिकाष्टक आदिमायेचे रौद्र स्वरूप साकार करणारे स्तोत्र आहे. असुरांचा समूळ संहार करणारी, अत्यंत भीषण दिसणारी जगन्माता रुंडमाला, शवाकार कुंडले, हातांच्या आकाराची मेखला धारण करते, त्याचबरोबर ती सज्जनांसाठी मधुर हास्य धारण करून अभयदानही देते. हे स्तोत्र अंबिकेचे ध्यान व स्तुती असे विभागलेले आहे.   […]

नवरात्रि

आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो. […]

पंचामृत

हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य. […]

उमामहेश्वर स्तोत्रम् – मराठी अर्थासह

पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. […]

गणपती रहस्य

…… अश्या अनेक रहस्यानी भरलेले गणरायाचे रूप आपल्याला अनेक गुणांनी भरपूर करण्याची प्रेरणा देत आहे. आपण त्यांच्या रूपाला न्याहाळताना त्यांच्या गुणांना स्मृति मध्ये ठेऊन त्यांची पूजा अर्चना करावी व आपल्या जीवनातील विघ्न नष्ट करावे. […]

दिवाळी अंक – सांस्कृतिक संचित !

दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे. […]

शांतिपाठ – आ नो भद्राः क्रतवो – मराठी अर्थासह

ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील एकोणनव्वदावे हे सूक्त शांतिपाठ म्हणून ओळखले जाते. यातील ‘ भद्रं कर्णेभिः ’ व ‘ स्वस्ति न इन्द्रो ’ या दोन ऋचा विशेषत्वाने सर्वसामान्यांना परिचित आहेत. या सूक्ताचे रचयिता गौतम राहूगण ऋषी असून देवता विश्वेदेव आहे. परंतु पूषन व मरुत गण यांनाही आवाहन केलेले असून दहाव्या ऋचेत अदिती देवता सर्वव्यापी असल्याचे म्हटले आहे. हे सूक्त जगती, विराटस्थाना व त्रिष्टुभ अशा तीन छंदात रचलेले आहे. ऋचांमधील अक्षरांची संख्याही वेगवेगळी दिसते. ऋग्वेदाखेरीज इतरही धर्मग्रंथांमध्ये हे सूक्त समाविष्ट आहे. […]

गुरुपौर्णिमा

अलौकिक बुद्धीमत्ता, विद्वत्ता असलेली व्यक्ती जागतिक वाड्.मयातही सापडणं दुर्मिळच आहे. अशा ह्या श्रीव्यासांचे पुण्यस्मरण या गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं करणं औचित्यपूर्ण आहेच, ते भारतीय समाजाचं कर्तव्य आहे. […]

जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे. […]

1 2 3 57
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..