नाच ग घुमा (२)

नाच ग घुमा नाच ग घुमा कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा ऑर्केस्ट्रा नाही आला रिदम नाही मला कशी मी नाचू ह्या कोपर्‍यावरचा त्या कोपर्‍यावरचा टेलर नाही खुला नवा ड्रेस नाही मला कशी मी नाचू ह्या रोडचा त्या रोडचा पार्लर नाही खुला मेकप नाही मला कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा शूमार्ट नाही खुला […]

मंगलाष्टक

वाद्ये मंगल वाजती सभोवती जमली सगी सोयरी विद्याभुषित ही सुसंस्कृत वधू (नाव) दिसे साजरी सालंकृत सलज्ज पीतवसना भासे जणू शारदा घेऊनी वरमाळ उत्सुक मनी कुर्यात् सदा मंगलम् ।। बुद्धीचा वर लाभला उभयता सद्भाग्य हे केवढं सन्मार्गावरूनी असेच जगती जा ह्याहूनही पुढे नांदा सौख्यभरे सदैव उधळा सद्वर्तनाची फुले ।। शुभमंगल (चाल बदलून (तदैव लग्नम्) लक्ष्मी मिळो ज्ञान […]

भोंडले (३)

आडबाई आडवणी गिझरचं पाणी काढवणी विजेने केला पोबारा माझी चुकली नऊ बारा

हळदीचे गाणे (कोळी बाजाचे)

हर्षद – प्राची जोरी बाई गो जोरी ही लग्नाची कामे करूनी थकली बाई गो दमली आयशी वराची गजाननाला आवतन केलं माय आयली डोंगराशी हिरवा शालू नेसली वरमाय चोळी घातली बुट्ट्याशी अंबार्‍यावर वेनी शोबे वेनी गो फुलांची कानात कुर्‍या बुगर्‍याबाल्या नाकात नथनी सोन्याची भांगामंदी बिंदी खाली टिकली मोठी कुंकवाची टिक् ठूशी नी बानू ल्याली नाकात नथनी मोत्याची […]

भोंडला (बसचा) (७)

अरडी ग बाई, परडी रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची ही गर्दी बसची बस आली बस आली पकडा पकडा पुढच्याला मागे ढकला ढकला असेच होतात अपघात टाळणे तुमच्या हातात थांब्यावरती थांबा थांबा शिस्तीत लावा रांगा रांगा उतारूंना उतरू द्या पुढच्याला पुढे होऊ द्या प्रवास तुमचा होईल छान समूहाचे ठेवा भान अंगी बाणा शिस्त शिस्त शिस्तीवरती ठेवा भिस्त

आधुनिक मंगळागौर (१) – गोफ

गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू गोफ नको बाई गोफ नको त्यापेक्षा टिव्ही पाहू गरे घ्या गरे पोटाला बरे नाही खाई त्याची म्हातारी जगे जगली तर जगली आहे तशी चांगली वृद्धाश्रमात राहते बापडी.

भोंडले (2)

अक्कण ओटा चिक्कण ओटा अस्सा ओटा सुरेख बाई ग्रॅनाइटचा असावा अशा ओट्यावरती बाई मिक्सर लावावा अस्सा मिक्सर सुरेख बाई सुमीतच्या मिक्सरमध्ये इडली रवा फेटावा अस्से सुरेख पीठ बाई फ्रिजमध्ये ठेवावे अस्सं पीठ थोडं थोडं इडलीपात्री उकडावं. अश्शा इडल्या सुरेख बाई चटणीसवे वाढाव्या अस्सा बेत सुरेख बाई कष्टांना वाचवतो अश्शा पोळ्या द्वाड बाई टाळाव्या शक्यतो.

घाणा (मुलीच्या लग्नाचा) (३)

आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला (नाव) ताईच्या लग्नाचा ।।धृ।। आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला आधी वंदू कुलदेवीला गजाननाला नमुनी स्मरू आप्त पूर्वजांना …….. ।।१।। आल्या काक्या, आल्या आत्या, मावशी, मामी, ताई आल्या आम्ही घाणा जो भरीला आम्ही घाणा जो भरीला…….।।२।। आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला पहिली हळद […]

भोंडला (फेरीवाल्यांचा) (६)

अरडी ग बाई, परडी, रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची, ही गर्दी फेरिवाल्यांची फेरीवाल्या फेरीवाल्या माल दे, माल दे हा मोल घे मोल ठेवला हातावर, गाडी होती नाक्यावर आता ह्याला शोधू कशी, बाईसाहेब पडतात अशा फशी

पोरकी

आई ग …… तू असतीस तर दारी मोगरा फुलला असता स्वागतकक्षी फुलदाणीमध्ये गेंद टपोरा झुलला असता । हृदयाच्या पायघड्यांवरूनी नेले असते देवघराशी हळदीच्या पाऊलखुणांची उठली असती घरभर नक्षी । मायेच्या नजरेने मजला पुसलें असते गूज कालचे लाज लाजरी नजर हासरी उत्तर देते तुजला त्याचे । ताटा भोवती असती महिरप पाटा खाली असते स्वस्तिक वेढी विरोद्या लग्नचुड्याचे […]

1 2 3