कृषी-शेती
कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन
रंग बदलणारं झाड – करू
रंग बदलण्याची गोष्ट निघाली तर सरड्याचे नाव पहीले घेतले जाते मात्र नागपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या आभोरा जंगलातील खोलेश्वर(कोलेश्वर) पहाडावर एक असं झाड पाहावयास मिळतं की ते बदलत्या रूतूनुसार आपला रंग बदलतं. ह्या जादूई वृक्षास परीसरात करू चे झाड म्हणून ओळखल्या जाते. […]
‘ई-नाम’ प्रणाली शेतकरी हिताची ठरेल का?
शेतकरी केंद्रिबदू मानून बाजार समित्यांची रचना करण्यात आली. मात्र, ह्या समित्या आज राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेली इ -नाम प्रणाली बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरु शकेल काय? हा एक चिंतनीय प्रश्न आहे. […]
कॅपॅसिटर कृषिपंपाचा तारक, तर ऑटोस्विच मारक
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवले पाहिजे. […]
आगरातला बळी राजा
देशावर किंवा घाटावर जशा एकेक शेतकऱ्याच्या 20 एकर 50 एकर जमिनी असतात तशा आमच्या ठाणे जिल्ह्यात फारशा लोकांच्या नाहीत. आता कोणी राजकारणी लोकांनी घेतल्यात शेकडो एकर पण आम्हा सर्वसाधारण आगरी शेतकऱ्यांच्या जमिनी या जेमतेम चार एकर पासून जास्तीत जास्त आठ ते दहा एकर पर्यंतच. आता आमच्या पिढीच्या वाटणीला एखादा एकर आली तरी खूप जमीन आहे असे वाटावे. […]
निसर्गप्रकोप
‘दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या ‘कर्मा’ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं ‘दैव’ त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात. […]
ढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती
आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे. […]
राब
केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]
बाव (विहीर)
आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]