नवीन लेखन...

नार्को ॲ‍नालिसिस

या औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते. […]

प्राण्यांचं स्थलांतरण

मानवाच्या सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी राहायला आवश्यक जमीन, उद्योगधंद्यांना आणि इतर कामासाठी लागणारी जमीन, या वाढीव लोकसंख्येला पुरविण्यासाठी पिकवाव्या लागणाऱ्या अन्नासाठी आणखी जमीन, असा हा जमिनीवर अधिकाधिक अतिक्रमण करणारा विकास प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि वनस्पतींसाठी घातक ठरत आहे. […]

कसरत करणारा विदूषक

खेळण्याला असलेल्या विद्युतघटातून (बॅटरी) जोपर्यंत विजेचा पुरवठा सुरू असतो, तोपर्यंत हा विदूषक सतत हालचाल करीत राहतो. […]

अंगावरची यंत्रं

सुरुवातीला संगणक प्रचंड मोठा होता, मोठमोठ्या खोल्या भरून जायच्या, त्यानंतर तो टेबलावर आला, नंतर तो मांडीवरचा संगणक बनला, मग हातात मावेल एवढा छोटा झाला; आणि आता तर तो आपल्या अंगावर मिरवायला लागलाय. आपली महत्त्वाची कामे असोत, आपल्या ज्ञानात वृद्धी करायची असो, की आपले मनोरंजन करायचे असो, हे सगळे आता ही संगणकावरील आधारित अंगावरची यंत्रं करताहेत. यांचीच माहिती देतोय हा लेख… […]

पोस्टकार्डातून विज्ञान

प्रा. जयंत नारळीकर हे लोकप्रिय वक्‍ते आहेत. त्यानिमित्त त्यांचा महाराष्ट्रभर संचार सुरू असतो. भाषण संपल्यावर अनेक विद्यार्थी नारळीकरांची स्वाक्षरी मागायला यायचे. या विद्यार्थ्यांना नाराज न करता, त्यांनी नारळीकरांना पोस्टकार्ड पाठवून प्रश्न विचारावा, त्याला नारळीकरांच्या स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले उत्तर मिळेल, त्याखाली स्वाक्षरी असेल, असा पर्याय दिला. त्याला जो प्रतिसाद मिळाला, त्यातील निवडक प्रश्न व त्यांची नारळीकरांनी दिलेली […]

नारळीकर आणि मराठी विज्ञान परिषद

डॉ. नारळीकर १९७२ मध्ये भारतात आले आणि लगेचच त्यांचे मराठी विज्ञान परिषदेबरोबर जे गहिरे नाते जुळले ते आजपर्यंत अबाधित आहे एव्हढेच नाही तर आता चांगलेच मुरले आहे. याच ह्रद्य नात्याच्या प्रवासाचा स्मरणरंजनात्मक आढावा घेतलाय या लेखात श्री. अ. पां. देशपांडे यांनी. […]

कृष्णविवर

१९७४च्या नवव्या मराठी विज्ञान संमेलनाच्या निमित्ताने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात ‘कृष्णविवर’ ही विज्ञानकथा बक्षीसपात्र ठरली. आपल्या नावाचा दबाव निर्णयावर येऊ नये म्हणून ना. वि. जगताप या नावाने आणि मंगलाताईंच्या हस्ताक्षरात डॉ. नारळीकर यांनी पाठवलेली तीच कथा आज इथे  पुनर्प्रकाशित करून सादर केली आहे. […]

पेरुपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो. […]

पपईपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे. […]

चिकूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..