नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

सुएझ कॅनॉल आणि जागतिक ट्रॅफिक जॅम

इजिप्त हे जगातील पहिले साम्राज्य आहे ज्यांनी या पृथ्वीवर प्रथमतः मानवनिर्मित कॅनॉल बनवला. हा कॅनॉल मेडिटेरीनियन समुद्र आणि रेड सी (लाल समुद्र) यांना जोडतो. हाच कॅनॉल याच्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व आणि पश्चिम जग जोडणारा एक दुवा मानला जातो. या कॅनॉल ची खुदाई आणि बांधकाम वेगवेगळ्या शासकांच्या काळात शेकडो वर्षे होत आले. कॅनॉल च्या उत्तर भागाला पोर्ट साईड तर दक्षिण भागाला सुएझ ही ठिकाणं आहेत. […]

जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मराठी शब्दकोश

जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे.
[…]

झोप का हवी

झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे. […]

संधिप्रकाशातील सावल्या – ४ : तू भ्रमत आहासी वाया

गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं. […]

फायर ऑनबोर्ड

तेलवाहू तसेच केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या अकोमोडेशन वर मोठ्या आकारात नो स्मोकिंग ही सूचना लिहलेली असते. लहानपणापासून मुंबईहुन मांडव्याला आणि अलिबागला जाताना लाँच मधून जाताना मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या जहाजांवर एवढ्या मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग का लिहलंय याबद्दल प्री सी ट्रेनिंग कोर्सला जाईपर्यंत नेहमीच कुतूहल वाटायचं. […]

बालकप्रिय डोनॉल्ड डक

१९३४ साली प्रसिद्ध चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वॉल्ट डिज्नी यांच्या कल्पनेतून डोनॉल्ड डकची निर्मिती सुचली. चित्रकार डिक लूंडी यांनी डोनाल्ड डकची प्रतिमा चित्रित केली होती. […]

प्लॅन्ड सीझर

मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला. […]

आकाशवाणी मुंबई – ९४ वर्षं पूर्ण

आपण गेले कित्येक वर्षे ज्यावर संगीत, माहिती व इतर गोष्टीचा आनंद घेत आहोत, ज्याने आपले बालपण तरुणपण आनंदात गेले त्या आकाशवाणी ला आज ९४ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. त्यामुळे दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘नमस्कार! हे आकाशवाणीचे….. केंद्र. […]

गुरुपौर्णिमा

गुरु शब्दा मध्येच गुरुच्या महिमेचे वर्णन आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. म्हणजेच गुरुचा अर्थ होतो, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा. […]

टच स्क्रीन

बहुतेक सर्व जहाजांवर एकच मेन इंजिन असते. हे मेन इंजिन जहाजाच्या नेव्हीगेशनल ब्रिज, इंजिन कंट्रोल रूम तसेच प्रत्यक्ष इंजिन जवळील कंट्रोल वरून चालू करता येते. पुढे जाण्यासाठी अहेड मुव्हमेन्ट आणि मागे किंवा रिव्हर्स येण्यासाठी अस्टर्न मुव्हमेन्ट असा शब्द प्रयोग केला जातो. जहाज सुरु करून त्याचा वेग कमी जास्त करण्यासाठी इंजिन कंट्रोल कॉन्सोल नावाचा एक लिव्हर असतो ज्याला अहेड आणि अस्टर्न म्हणजेच पुढे आणि मागे नेण्यासाठी डेड स्लो, स्लो, हाफ आणि फुल्ल तसेच मॅक्स फुल्ल अशा दोन्हीही बाजूला इंजिनचा स्पीड सेट केलेला असतो. […]

1 2 3 119
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..