नवीन लेखन...
डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

पर्याय परिसंस्थेचे : पर्याय डी. स्कूल

धायरी पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळाआहे. इव्हान आलीच यांनी युरोप मध्ये डी-स्कुलींग ही चळवळ सुरू केली होती.स्कूल मध्ये जे आपण कप्पे केलेत विषयांचे असो वर्गांचे असो वयांचे असो स्कूल ड्रेसचे असो यांच्या पलीकडचं जे आहे ते सर्व डीस्कुलींग मध्ये येतं. […]

अनावश्यक भागांच्या मालिका..

आजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत. पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे. कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे. […]

व्यक्तिमत्व घडविणार्‍या सुट्ट्या आवश्यकच आहेत

सुट्टी म्हणजे स्वातंत्र्य आहे स्वैराचार नव्हे हे मुलांना पटवून द्यायला हवं, त्याप्रमाणेच त्यांना गुंतवायला हवं. रिकामं घर सैतानाचं घर असतं हे ही लक्षात घ्यायला हवें.सुट्टीत मुले खेळतात, संवाद करतात, निरीक्षण करतात, पाहुणे आल्यावर शिष्टाचार शिकतात, आजची पिढी अलिप्त कोरडी होत आहे त्यांना लोकांमध्ये मिसळणं, भावभावनांची जाण येणंआवश्यक आहे. […]

उंबरठ्याच्या आतली घुसमट

मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे. तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था  बेचैन  करणारी असतें. […]

परीक्षेची विश्वासार्हता

परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या विद्यार्थ्यांनी त्यात अनेक पळवाटा शोधून काढल्या आहेत. कॉपी करण्याची भ्रष्ट परंपरा वृद्धिंगत होत आहे. कॉपीची वाळवी हळूहळू सर्व जीवन पोखरेल याचीच भीती वाटत आहे. अनेक शैक्षणिक संस्था मध्ये परीक्षा योग्य पद्धतीने घेतल्या जातात म्हणून मूल्यमापन शब्द अजूनही अस्तित्वात आहे. […]

कुठे आहे शिक्षण? कुठे आहे मूल्यमापन?

ज्यांचे शिक्षण झाले किंवा नाही माहित नसतांना त्यांचे मूल्यमापन करण्याचे आव्हान सध्या आहे. कॉपी रोखणे जसे ऑफलाईन मध्ये आव्हान होते तसेच आव्हान ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये ही आहे. ऑफलाइन परीक्षेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना यश मिळत असे पण ऑनलाईन परीक्षेमध्ये अभ्यास न करणारें ही  वरचढ ठरत आहेत […]

तुम न जाने किस जहां मे खो गयें..

जीवनाच्या अनेक संचिता पैकी लताचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवती भोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्वें असतात, स्वर असतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं. मोठ्या माणसांच असणं डोक्यावर छत्र असतं. लतांची गाणी अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहे, जिच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखद आहे. सौंदर्य आणि स्वर आपल्या आवाक्यात जरी नसले तरी पाहण्यात व ऐकण्यात ते आपलेच […]

एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे. […]

तुम न जाने किस जहां मे खो गयें..

लतांनी प्रेमिकांच्या आयुष्यात बहार आणली आहे . लहान मुलांना नाचायला शिकवले. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आई मी पावसात जाऊ कां? जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून, वृद्धांना संध्याछायेची आठवण करून दिली आहे .एक-दोन-तीन-चार या जावेदच्या मासिक बाराखडीच्या गाण्याला लतांनी रंगत आणली. […]

बदलती जीवन शैली व शिक्षण

एका अदृश्य शक्तीने दोन वर्ष शाळा बंद ठेवल्या व भविष्यातही त्याचं अस्तित्व राहणारच आहे, हे लक्षात घेऊनच आता मुल्यमापनाच्या निकषांचा नव्याने विचार करावा लागणारच आहे. अशीच वर्ष वाया गेली तर विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्वें पोकळीत वाढतील व हे व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरेल. तातडीने मूल्यमापनाच्या संबंधी खालील काही मार्गदर्शक सूचना पालकांना कळवाव्या लागतील. १) तज्ञांच्या सहाय्याने  मूल्यमापन आराखडा तयार […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..