नवीन लेखन...

गाण्यातून उमगणारी लता

लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा—प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम.प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते. लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे. […]

पुणे ते मुंबई – आगामी चित्रपटासाठी फॉर्म्युला

एका कल्पक दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटासाठी पुढील फॉर्म्युला तयार केला आहे. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांना आवश्यक असा सर्व मसाला त्यात आहे. पुणे ते मुंबई या आगगाडीच्या एका प्रवासात हा बोलपट काढता येतो. या चित्रपटाचे कथानक व शूटिंग पुणे स्टेशनवर सुरू झाले असून बोरीबंदर स्टेशनवर ते संपले आहे. […]

देवा तुझ्या दारी आलो

‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच  परिमाण मिळाले. […]

ओंकार प्रधान रूप गणेशाचे

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगातून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे. […]

विनायका हो सिद्ध गणेशा

तमाशातील गण गौळण किंवा वगामधील नमन असो, येथेही गणपतीचे स्तवन आणि गुणगान केलेले पहायला मिळते. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात सादर होणारे ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ हे सगळ्यांना परिचित असून यात गणपतीला रंगमंचावर नृत्य करतानाही दाखवले आहे. […]

बाप्पा मोरया रे

मराठी किंवा हिंदी चित्रपट संगीतात अनेक संगीतकारांनी लोकसंगीताचा वापर मोठ्या कल्पकतेने करून घेतला आहे. ज्या संगीतकारांनी चित्रपटातील गाण्यांना लोकसंगीतातील ठेका किंवा संगीत वापरले ती गाणी अमाप लोकप्रिय झाली. […]

तू सुखकर्ता तू दुखहर्ता

गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच. […]

गजाननासी वंदन करुनी

मराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. हे गाणे स्वतः कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले. […]

अशी चिकमोत्याची माळ

लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे, पाय थिकरवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. […]

तुझ्या कांतिसम रक्तपताका

गणपतीच्या पारंपारिक आरतीबरोबरच मराठी चित्रपटातील गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.’अन्नपूर्णा’ या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे असेच लोकप्रिय आणि अजरामर झालेले गाणे. […]

1 2 3 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..