नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

उंबरठ्याच्या आतली घुसमट

मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे. तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था  बेचैन  करणारी असतें. […]

सांगितली “आजोबांची” कीर्ती !

राहुलच्या किर्तीमुळे, यू -ट्यूब मुळे शास्त्रीय संगीताकडे वळलेली तरुण पिढी काल मोठ्या संख्येने चित्रपट गृहात होती. अन्यथा १९८३ साली निवर्तलेल्या या सूर्यासारखे दाहक गाणाऱ्या गायकासाठी चाळीस वर्षांनी नवी माणसे (जी कदाचित त्यावेळी जन्मलेलीही नसतील) फिरकली नसती. […]

‘दि कश्मीर फाईल्स’ – सत्य ‘खरं’ असतं !

“इंफोटेंमेंट” सदरातील चित्रकृतीने त्या चौकटीबाहेर जाऊन समोर धरलेला आरसा विद्रुप आणि असह्य होता. मल्टिप्लेक्सच्या थंडगार अंधारात हे साधं बघणंही अस्वस्थ करणारं होतं आणि बजाज स्कुटर /गॅस सिलेंडर मुळे वैतागणाऱ्या मला त्या मंडळींच्या जागी स्वतःला इमॅजिन करणेही अशक्य होतं. […]

शिवरायांनी केलेली जगातील सर्वोतम गुंतवणूक

आपण असं शिकायला हवं जणू आपण नेहमीसाठी जगणार आहोत आणि असं जगायला हवं जणू उद्याच मरणार आहोत. विद्येसारखा बंधू नाही. विद्येसारखा मित्र नाही. विद्येसारखे धन नाही, आणि विद्येसारखे सुखही नाही.
[…]

‘पांघरूण’ – बा मांजरेकरा, हे ‘क्षालन’ शब्दातीत झाले आहे रे !

चित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय. ” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे. […]

‘जागल्यांचे’ हाकारे !

” कोटा फॅक्टरी ” ने अभियांत्रिकी शिक्षण /प्रवेश परीक्षा आणि तरुणांचे कोमेजणे दोन सेशन्स मधून प्रभावीपणे मांडले. आता बघितली – “द व्हिसल ब्लोअर ! ” […]

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला. […]

‘अनुभूती’ कुटुंब न्यायालयीन खटल्यांची

पंधरा कथा असलेले आणि केवळ ८८ पानांचे हे पुस्तक, मराठी कायदेविषयक साहित्यातील एक अमूल्य ठेवा बनून राहिले आहे. लेखिका बागेश्री ताई , या कुटुंब न्यायालयाच्या निवृत् न्यायाधीश आहेत . तसेच  गेली चाळीस वर्षे मॅरेज  कौन्सिलिंग नंतर न्यायदान आणि त्यानंतर ज्येष्ठांचे कौन्सिलिंग करीत असताना त्यांना जे अनुभव आले ते केसेस  आणि कथांद्वारे त्यांनी लिहिले आहेत. […]

रूहमें फासले नहीं होते !

आपल्या पाडसांपासून तात्पुरते/कायमचे दुरावलेले नव्याने जुनंच जगायला लागतात- रुहमें फासले नहीं होते ! “क्लब ६०” हा असा दुर्लक्षित शिक्षक ! वयाच्या उताराला लागल्यावर त्या टप्प्याचे शिक्षण देणारा !! […]

1 2 3 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..