नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

पाकिस्तान : माझी साहसयात्रा

मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो. ते नेहमी पुण्यात यायचे तेव्हा मला भेटायचे. ते माझे मित्र बनले होते. कराचीत गेल्यावर त्यांना मी फोन केला, तेव्हा ते तातडीने मी ज्या ‘वायएमसीए’च्या अतिथीगृहात उतरलो होतो तिथे आले. त्यांनी मला कराचीचे संपूर्ण दर्शन घडवले. […]

हार्दिक

कोणाचे सूर कोणाशी जुळतील हे सांगता येत नाही. लेखकाशी सूर जुळले की संवेदनशील वाचक पत्रातून खुला होतो. पत्रातून आनंद आणि वेदना झिरपते. संवाद संपलेल्या काळातही असंख्य वाचक आजही लेखकाला पत्र लिहितात. प्रत्यक्ष पत्रातून आपलं जीवन लेखकासमोर उघडे करतात, त्याच्याकडून मार्गदर्शन मागवतात. […]

ब्रेकिंग न्यूज

तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो … बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे . […]

त्रिदल

मी लिहिलेल्या आठ संगीत नाटकांपैकी तीन नाटकांचे त्रिदल हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे . आज त्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे . संगीत घन अमृताचा ,संगीत शांतिब्रह्म , संगीत राधामानस या तीन संगीत नाटकांचे , खल्वायन संस्थेने प्रकाशित केलेले माझे पुस्तक म्हणजे त्रिदल […]

सागरावरील माहितीपट

पॉल वॉट्सन हा ‘ग्रीनपीस आणि सी शेफर्ड’ चा संस्थापक असून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने सागर संरक्षणाच्या प्रयत्नात घालवला आहे. समुद्री जीवांची कत्तल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध त्याने मोहिमा काढल्या आहेत. […]

मार्शिलँड

जगण्यासाठी , अस्तित्वासाठी जिवाच्या आकांताने संघर्ष करणाऱ्या तरुण पिढीची , मन सुन्न करणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी ही कहाणी . या कथानकाचा शेवट मी सांगणार नाही , तो वाचायलाच हवा , तेव्हाच आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि आपण किती सावध व्हायला हवंय ते कळेल . […]

रानवा

प्रत्येक आंदोलन हे राजकीयपक्षाना आपापली किंमत वसूल होई पर्यंत महत्वाचं वाटत असतं. प्रत्येकाची बोली असते.टार्गेट असतं. ते पूर्ण होईपर्यंत आंदोलन ताणलं जातं. गुहागर, लोटेमाळ, जयगड,रत्नागिरी, जैतापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात येणारा रिफायनरी प्रकल्प…कुठेही जा, प्रत्येक जण आंदोलनाच्या माध्यमातूनओरबाडून खात असतो. […]

सागराविषयीचे माहितीपट, चित्रपट

पृथ्वीचा ७० टक्के भाग सागराने व्यापला आहे. पृथ्वीवरील ५० टक्के जीवन महासागरात आहे आणि पृथ्वीवरील ८० टक्के जीवांना अन्न पुरवण्याचे काम सागर करतो, तर पृथ्वीवरील ऑक्सिजनचा ७० टक्के पुरवठा सागरी वनस्पती करतात. अशा या उपयुक्त महासागरावर अनेक माहितीपट, लघुपट व चित्रपट निर्माण केले गेले आहेत. […]

माय तुहे किती आठव आठवू…

माय तुहे किती आठव आठवू… आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब परीक्षण – डॉ.धोंडोपंत मानवतकर ” माय तुहे किती आठव आठवू ” ही आईच्या कर्तव्यस्मृतींचा भावबंध रेखाटलेली सुंदर काव्याकृती डॉ.सर्जेराव जिगे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारली आहे. डॉ.जिगे यांचे समकालीन असणारे ग्रामीण कवी, लेखक, वाचक यांना ती प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याच आईची गाथा वाटेल…इतकी सहज सुंदर झालेली आहे. आईचे […]

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित पैलूंचं दर्शन – रिंगणाबाहेरून

‘पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ यांनी स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त ज्या इतर क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली, त्याचा प्रांजळ आलेख त्यांनी ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकात तपशिलांसह मांडला आहे. ‘मौज प्रकाशन गृहा’ ने तो सहजसुंदर रूपात बंदिस्त करून प्रकाशित केला […]

1 2 3 4 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..