नवीन लेखन...

मीच एवढा शहाणा कसा

आपल्या आजबाजूला पाहिलं की आपणच एकटे एवढे शहाणे कसे, असा प्रश्न नेहमीच आणि हमखास पडतो. उदाहरणार्थ पावसाचंच घ्या ना. पावसाळा म्हटलं की अनेकांचा उर नुसता भरुन येतो. जरा चार थेंब पडले की व्हाट्सॲपवर कांदाभजी आणि वाफाळलेल्या चहाच्या कपांचा पाऊस पडतो. […]

चष्मे हे जुलमी गडे

चष्मा म्हणजे चाळिशी किंवा चाळिशी म्हणजे चष्मा अशा भ्रमात किंवा संभ्रमात राहण्याचे दिवस आता डस्टबिनमध्ये जमा झालेले आहेत. एकेकाळी चष्मा डोळ्यांवर चढला किंवा केसांत रुपेणी छटा झळकली की आयुष्याचा मध्यांतर जवळ आला, या कल्पनेने हुरहूर दाटून घेत असले. आता आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून रडणारी मुले सुद्धा चष्म्यात दिसतात. ती चष्मा काढून रडतात आणि रडून झाले की डोळे पुसून पुन्हा चष्मा घालतात. […]

मीच एव्हढा शहाणा कसा – मनोगत

आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं. […]

संत ज्ञानेश्वर – शुभारंभाचे दोन शब्द

‘व्यवस्थापन’ या विषयावर १९७०च्या दशकानंतर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. मोठमोठ्या औद्योगिक समूहाबरोबरच, मध्यम व लघु उद्योगांनीही सातत्याने नावीन्यपूर्ण, उपाययोजना, कल्पना यांचा समावेश असलेली व्यवस्थापनाची विशिष्ट प्रणाली आपलीशी केली आहे. […]

संत ज्ञानेश्वर आणि ‘व्यवस्थापन’

व्यवस्थापन म्हणा किंवा सर्वसाधारण प्रचलीत शब्द ‘मॅनेजमेंट’ म्हणा, यात अनेक बाबींचा समावेश होतो. सेल्फ डिसील्पीन म्हणजेच स्वयंशिस्त हा व्यवस्थापन-शास्त्राचा मूळ पाया आहे आणि या पायावरच पुढची व्यवस्थापनशास्त्राच्या माध्यमातून ‘यशाची इमारत’ उभी राहणार आहे. […]

यश हेच चलनी नाणे (मनोगत)

चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे आणि सुंदर अथवा मोलाचे असे काहीही नाही. तो ‘सेन्ट्रल पॉईंट’ (लक्षवेधक गोष्ट) आहे. अर्थात, सगळेच चित्रपट, सगळेच कलाकार यशस्वी ठरतात असे अजिबात नाही. […]

अभिनेत्री

हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटांवर अधिराज्य गाजवले. अशाच काही तारकांची ओळख सदानंद गोखले यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. […]

मंदार आणि मंजिरीच्या कविता

भाऊ आणि बहिणीच्या कवितांचा एकत्रित कवितासंग्रह प्रसिद्ध होण्याचा हा प्रयोग विरळाच या कविता मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून लिहिले आहेत […]

सात बारा व हक्क नोंद

वडिलोपार्जीत स्थावर मालमत्ता, शेती, जागा, किंवा पै पै जमवून मिळवलेली मालमत्तेची नोंदणी कायद्यानुसार योग्यवेळी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्यासंबधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात. हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. […]

अतर्क्य

चमत्कार रहस्य यांची सरमिसळ असले या असलेल्या या संदीप दांडेकर यांच्या कथा आहेत एकूण तेरा कथांचा हा संग्रह अतर्क्य मांडून वाचकांची भयकथा नची भूक भागवतो मात्र या कथा लिहिताना लेखकाने विज्ञान मानसशास्त्र इतिहासाचा अभ्यास केला आहे. […]

1 2 3 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..