नवीन लेखन...

लहानपणाचा ठेवा

गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली. […]

लहानपणाच्या सुखद संस्कारक्षम आठवणी

बहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत. […]

पैली ते सात्वी

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली. […]

लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले. […]

अनोळखी दिवस

वडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती. […]

रम्य ते बालपण : चंद्रशेखर ओक

‘लहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांनी किती यथार्थपणे म्हटले आहे. खरंच बालपण किती रम्य असतं याची जाणीव आपणास काळाच्या ओघात जात असताना पदोपदी होत असते. […]

बाई आली पणात

सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती. […]

आयुष्य

स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही. […]

अजाणतेपणातील वांडपणा

माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का? […]

भटकंतीतील भुतनी

अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच! […]

1 2 3 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..