नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

टीव्हीच्या आठवणी…

पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं.. […]

स्नेहमेळावा – ४७ वर्षांनंतर !

सुधीर मोघेंच्या गीताच्या ओळी – ” एकाच या जन्मी जणू , फिरुनी नवी जन्मेन मी ! ” खऱ्या अर्थाने लागू पडतात शाळा-महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यांना ! […]

‘कुटुंब’ – खरं एकत्र कुटुंब

आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं. […]

आठवतो का काळ ही भावनो

आठवतो का काळ ही भावनो? काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची , […]

राज कपूर – निळ्या डोळ्यांचा जादूगार !

त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते. […]

सांगळीवरचा प्रवास

सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते. […]

२८ मार्च १९९३ – मु.पो.साखराळे

माझे पहिले-वहिले पुस्तक ” माणूस नांवाचे निगेटिव्ह वर्तुळ ” (एकांकिका-संग्रह) आमच्या महाविद्यालयाच्या नवनिर्मित सेमिनार हॉल मध्ये प्रकाशित झाले. महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या मराठी पुस्तकाचे “अभियांत्रिकी” महाविद्यालयात प्रकाशन व्हावे,हे दुर्मिळ ! बहुधा त्या सेमिनार हॉलमध्ये मी साखराळे सोडल्यावर असा युनिक साहित्यिक कार्यक्रम पुन्हा झाला नसावा. […]

मी आणि हदेप्र – हरिभाई देवकरण प्रशाला !

भुसावळमध्ये असताना प्राथमिक शाळेला “बालवाडी वा शाळा” आणि माध्यमिक शाळेला “हायस्कूल ” म्हणणारा मी ऑगस्ट ७४ ला सोलापूर नामक महानगरात पाऊल टाकल्यावर “प्रशाला “या नव्या शब्दाला भेटलो. […]

नदीबाई माय माझी..

परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो. […]

1 2 3 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..