नवीन लेखन...

चाळीतली दिवाळी

दसरा झाला की वेध लागायचे ते दिवाळीचे.घराची साफसफाई तर दसर्‍यालाच झालेली आसायची,घर कसल ते दहाबाय दहाची खोलीच ती,वर एक पोटमाळा त्यातच आईने जुन्या कपडयांच बोचक,ताईच्या लग्नात आलेली आहेराची भांडी,वापरात न आलेल सामान अस बरचस काहीबाही सामान कस नीट लावून ठेवलेल आसायच.एक लोखंडी तिजोरी वजा कपाट आसायच त्यावरही सामान ठेवलेल असायच.

एक काॅट आसायची,कोणी पाहुना आला तर त्या काॅॅटवरच सोफा समजुन बसायला द्यायच कारण इथ जागाच अपुरी आसल्याने दुसर काही बसायला द्यायची सोयच नव्हती.

कीचन कसल ओ,ती तर ऐक काळीकुट्ट शहाबादी फरशी आसायची, तोच तर माझ्या आईचा कीचन ओटा आसायचा. त्यावरच एक तो भलामोठा पितळीचा स्टो कसा लख्ख आणि चकचकीत आसायचा.त्यावरच आईने गावा कडुन आणलेला मातीचा मटका आगदी रूबाबात ठेवलेला आसायचा.त्यावर हक्क फक्त आई आणि बाबांचा,त्याला आम्हा लहानाना हात लावायचीही परवानगी नसायची,त्या मटक्यातून पिलेल्या पाण्याची चवच काही वेगळी आसायची.त्याच ओट्याखाली धान्याचे डबे आणि गॅस शिलेंडर कसे ऐटीत बसलेले असायचे.

रोज वापरत असलेले कपडे दरवाज्याच्या पाठीमागे एका लाईनीत अडकवलेले असायचे.
चौकटीच्या बाहेरच आपआपल्या घरचे कपडे वाळण्यासाठी रस्या बांधलेल्या आसायच्या,तिथे जागा आसली तरी दुसर्‍या कुणाला कपडे वाळत घालायची मुभा नसायची.दिवाळीची सुरुवात होण्या अगोदरच त्या इवल्याशा घराची रंगरंगोटी व्हायची..

चार दिवस आगोदरच सबंध चाळीची साफसफाई व्हायची तेंव्हा मात्र सगळेजन एकत्र येऊन साफसफाईला मदत करायचे.. चाळीतील वातावरण आगदी अल्हाददायक असायचा. आम्ही मुल रेशनदुकानावर लाइन लावून आसायचो.कारण रॉकेलची भराभरती केली तरच फराळाची रंगत येणार असायची,त्या काळी रेशनदुकानदार काळ्या बाजारात राॅकेल विकायचा ते ही पाठीमागच्या दरवाज्याने तो टायमिंग ही वेगळा ठरलेला असायचा.तो सांगेल तेव्हांच राॅकेल मिळायचे दर महिन्याला आम्ही राॅकेल घेण्यासाठी दुकानासमोर लाईन लावायचो त्या लायनीत राॅकेलच्या डब्याला हा डब्बा आपलाच आहे हे ओळखण्यासाठी आई एखादी कापडाची चिंधी,डब्यावर स्वस्तिक अस काही ना काही लावून ठेवायची कारण का तर सगळ्यांचे डबे सारखेच आसायचे.

रेशनदुकानावर आणि सार्वजनिक नळावर बायकांची भांडन पाहायला मजा मात्र नक्कीच यायची.पण ती भांडनही तेवढ्यापुरतीच असायची,दिवाळीत फराळ म्हटल की खासक रून मुलींची जय्यत तयारी आसायची.पळपोट लाटणे घेऊन
मुली अख्या चाळीतल्या लोकांचा फराळ करायला तयार असायच्या.दिवाळीच्या दोनचार दिवस आगोदर चाळभर नुसता फराळाचा घमघमाट आसायचा.चाळीच्या बाजुलाच आसलेली बेकरी आणि तिथे आसणारी बायकांची धांदल म्हणजे नानकटाई,बिस्किटे आणि बरेचसे जिन्नस तिथे करून मिळायचे.

चाळीचा कंदील म्हणजे आम्हा मुलांचा जीव की प्राण.आम्ही मुल मात्र आमच्याच चाळीचा आकाश कंदिल दुसर्‍या चाळीपेक्षा किती मोठा आणि आकर्षक होईल याकडेच लक्ष द्यायचो.प्रत्येकाच्या खोलीबाहेर स्वं:ताच्या हातानी तयार केलेले विविध रंगीबेरंगी कंदील आसायचे.तो कंदील बनवण्यासाठी बाबांची मदत तर मोलाची आसायची.

दिवाळीच्या सुट्टीत चाळीतील जिण्याशेजारीच किल्ला बांधायची लगबग आसायची.त्यासाठी लागणारे सारे साहित्य ऐक ऐक जन जमा करायचा आणि दोन तिन दिवसात किल्ला तयार व्हायचा.

दिवाळी दिवशी लवकर उठून आई आम्हा भावंडाना उठने लावून कडक कडक गरम पाण्याची अंघोळ घालायची.दररोज आम्ही लाइफबाॅय साबनाने अंघोळ करणारे दिवाळीत मात्र सुवासाने मन मोहून टाकणाऱ्या मोती साबनाचे अपरुपच वेगळे.अंघोळ झाली की पहीला कार्यक्रम असायचा तो कारीठे फोडण्याचा, पायाच्या अंगठ्याने फोडलेल्या कारीठ्याचे बी कपाळी लावून देवपूजा व्हायची,तोवर ताई वटणातल्या दारात लालभडक गेरुच्या साह्याने रंगवलेल्या जाग्यावर दिड बाय दोनच्या आकारात छानशी ठिपक्यांची रांगोळी काढायची. तिची खूप ईच्छा आसायची की भल्या मोठ्याल्या जागेत रांगोळी काढण्या ची,पण ईलल्याशा जागेत ते शक्य नसायच मग आई तिची समजुत काढायची तुझे लग्न झाल की नवर्‍याच्या घरी मोठी रांगोळी काड,चाळीतल्या बायका सकाळ संध्याकाळ दरवाज्या बाहेर सुंदर अश्या रांगोळ्या काढायच्या की त्यातले रंग पाहून मन भरून जायच.वरती रंगीत आकाशकंदील आणि खालती अशी सुंदर रांगोळी हे चित्र प्रत्येक खोलीबाहेर दिसायच.

चाळीतील लोक म्हणजे कसे आगदी फराळासारेखे आसायचे. काही जण चकली सारखे राखट आसले तरी त्यांचे मन मात्र बुंदिच्या लाडवासारख गोड असायच. कोण बुंदीच्या लाडुसारखा गोड गुळमाट तर कोण चकली सारखा तिखट डोंब.त्यातलेच काहीजण शंकरपाळी सारखे खुसखुशीत तर काहीजण चिवड्या सारखे चटकदार ही होते. चाळीतल्या खोलीचे दरवाजे कधी कुणासाठी बंद नसायचे एक मेका साहाय्य करू या म्हणी प्रमाणे चाळीत कुणाला कसली गरज पडली तर हेेच निरनिराळ्या स्वभावाचे सारेजण एकवटून त्याला मदत करायचे.हिच तर होती चाळ संक्रुती पण चाळ गेली आणि टोलेजंग टाॅवर आले.सनवार गेले आणि आली फॅशन. दिवाळीच्या सुट्टीत चाळीतील पटांगणात जुने पिक्चर पडद्यावर लावले जायचे ते पाहण्यात जी मजा होती ती आता मल्टिप्लेक्स मध्ये हि येत नाही….

आज या आठवणी लिहीताना माझ्या शाळेतील कविता आठवली.संत तुकडोजी महाराजानी कीती छान शब्दात लिहुन ठेवलय…
राजास जी महाली,सौख्य कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली,या झोपडीत माझ्या!…
खरच ते सुख,तो आनंद मिळाला त्या झोपडी वजा खोलीतच.

प्रकाश नावलकर…
दोहा कतार

आम्ही साहित्यिक या फेसबुक गृप वरुन…

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 334 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..