नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

वाहिन्यांचे लोकशाहीकरण आवश्यक

प्रसारमाध्यमे हा भारतीय व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसारमाध्यमांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. […]

रामभाऊ म्हाळगी – खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी

निवडणुकीच्या वेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी निवडून आलेला प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने सर्व जनतेचा असतो त्याप्रमाणे रामभाऊ म्हाळगी हे जनतेचे लोकप्रतिनिधी होते. आणि जनता त्यांना आपला लोकप्रतिनिधी मानत होते. केवळ याच कारणासाठी आजही ठाणे लोकसभा क्षेत्रातील जनता तसेच रामभाऊंशी ज्याचा ज्याचा संबंध आला ते आजही त्यांना विसरु शकत नाहीत. रामभाऊंकडे आलेली कामे कुणाची आहेत. […]

अभ्यासपूर्ण भाषणांचे महत्त्व संपले

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात संसद सर्वोच्च स्थानी आहे. संसदेचे पावित्र्य राखण्याचे काम खासदारांनी करणे अपेक्षित असते. आजवर अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी जनतेचे आणि देशासमोरील महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. […]

गल्ली ते दिल्ली

खासदार म्हणून दिल्लीत आल्यानंतर लोकप्रतिनिधीपदाच्या वाढत्या जबाबदारीचे ओझे जाणवत होतेच, शिवाय या नवख्या वातावरणात तसेच अनेक अनुभवी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा सहवास लाभणार याची हरहूरही होती. तशी इथली जीवनशैली बरीच वेगळी आहे. त्याच्याशी जुळवून घ्यावे लागणार होते. […]

आमचं आयपीएल, आमचं राष्ट्रकुल

आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगला सुरूवातीला खूप वाहवा मिळाली. पण, ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील वादानंतर आयपीएलचे खरे स्वरूप लोकांसमोर आली. त्या आधी आयपीएलकडे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी आदर्शभूत मॉडेल म्हणून पाहिले जाऊ लागले होते. पण, भ्रष्टाचाराच्या आगीत या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाला. […]

गल्लीत शिकले – दिल्लीत रमले

वडिलांबरोबर राजकारणाचे धडे गिरवायला मिळाले तरी आज खासदार म्हणून स्वतंत्रपणे वाटचाल करावी लागत आहे. सर्वात तरुण खासदार म्हणून नावलौकीक मिळाला असला तरी वाढत्या जबाबदारींची जाणींवही होती. हीं जबाबदारी पेलताना पक्षातील कार्वकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील सदस्यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळे गल्लीतून सुरू झालेली दिल्लीची वाटचाल उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सफल राहिली आहे. […]

व्यंगचित्राची ताकद

भारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. […]

अग्रलेखांचा दबदबा

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. […]

स्वार्थी राजकारणी आणि लोकांचा बेजबाबदारपणा

“आज सर्व सुजाण नागरिकांनी या लोकप्रतिनिधींना आपला देश, किंवा आपले राज्य कसे चालवलं पाहिजे ? कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे ? याच विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरण आणि ते पूर्ण करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करून ते सत्यात उतरवणं म्हणजे खर जागृत राजकारण होय.” […]

1 2 3 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..