नवीन लेखन...

रामभाऊ म्हाळगी – खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी

निवडणुकीच्या वेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी निवडून आलेला प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने सर्व जनतेचा असतो त्याप्रमाणे रामभाऊ म्हाळगी हे जनतेचे लोकप्रतिनिधी होते. आणि जनता त्यांना आपला लोकप्रतिनिधी मानत होते. केवळ याच कारणासाठी आजही ठाणे लोकसभा क्षेत्रातील जनता तसेच रामभाऊंशी ज्याचा ज्याचा संबंध आला ते आजही त्यांना विसरु शकत नाहीत. रामभाऊंकडे आलेली कामे कुणाची आहेत. कोणत्या पक्षाच्या माणसाची आहेत. कोणत्या जाती-धर्माच्या माणसाची आहेत याकडे त्यांनी कधीही पाहिले नाही ते त्या माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असत. म्हणूनच विरोधी पक्षातील लोकही रामभाऊंबद्दल आदर बाळगून असत. त्यांच्या प्रामाणिकतेमुळेच सर्व प्रकारचा आधार वाटत होता.

ठाणे लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने रामभाऊ म्हाळगी निवडून आल्यानंतर आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडणारे, आपल्या कार्याने, जनसंपर्काने तसेच वक्तृत्वाने स्वतःचे असे आगळे स्थान निर्माण केले. या सर्वाचे मूळ त्यांच्या कॉलेज जीवनात असतानाच दिसून येते. स. प. महाविद्यालयात पी.टी ऑर्गनायझर, लॉ. कॉलेजमध्ये वादविवाद मंडळ व मॅगझिन सेक्रेटरी म्हणून निवड झाली होती. तेथूनच त्यांच्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ झाला. गोवा विमोचन समितीच्या वर्किंग कमिटीचे सेक्रेटरी, संयुक्‍त महाराष्ट्र समितीच्या जनरल कौन्सिलचे सदस्य, महाराष्ट्र दुष्काळ निवारण (सर्व पक्षीय) समितीच्या जनरल कौन्सिलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मध्य रेल्वे स्टेशन मास्टर्स संघटनेचे उपाध्यक्ष, पुणे बार कौन्सिलचे उपाध्यक्ष इत्यादी त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.

ते १९५७, १९६७ व १९७२ साली महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. विधानसभेतील एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळविली होती. या शिवाय एस.टी. दरवाढ, फादर फेअर प्रकरण, भाडे नियंत्रण कायदा, सरकारी रुपयांची उधळपट्टी, सहकारी क्षेत्रातील अनागोंदी, दडपशाही, दलितांवर व महिलांवर होणारे अत्याचार, डॉक्टरांचा संप, पूरग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त यांचे प्रश्‍न, बोट दरवाढ आणि रिमांड होममधील कैद्यांच्या समस्या वगैरे कितीतरी छोटया मोठया प्रश्‍नांपासून सीमाप्रश्‍न, नद्यांच्या पाण्याचा प्रश्‍न, दर वर्षीचे अर्थसंकल्प, सामाजिक व राष्ट्रीय (एकात्मता, आसाममधील डोंगरी राज्य मागणी वगैरे व्यापक प्रश्‍न आणि असंख्य तात्कालिन विषयावर रामभाऊंनी मांडलेले विचार तसेच विधायक सूचना यामुळे ते विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी पक्षाला त्यांच्या आदर होता. एक आदर्श संसदपटू म्हणून त्यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केले होते.रामभाऊ म्हाळगी हे ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून लोकसभेत गेले तरी त्यांचा राजकारण व सामाजिक समस्यांचा आभ्यास हा काही ठाणे जिल्हयापुरता मर्यादित नव्हता, तर ते सर्वच समस्यांचा नेहमी विचार करत असत. त्यांनी लोकसभेतील कार्याचे अहवाल नियमितपणे मतदारांसाठी प्रसिद्ध केले होते. आपण काय काम करतो हे आपणाला निवडून देणाऱ्या मतदारांना सांगणारा हा लोकप्रतिनिधी काही .वेगळाच होता. त्या अहवालावरुन ‘रामभाऊंच्या कामाची व्याप्ती लक्षात येत असे.

मिसाबंदी. व भारत सुरक्षा कायदा बंदीच्या वारसांना मिळावयाच्या पेन्शनबाबत त्यांनी २ ऑगस्ट १९७८ रोजी लोकसभ्षेत अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली होती. आणिबाणीच्या काळात कारागृहात मृत झालेले व कारागृहातून सुठल्यानंतर ३ महिन्यात मृत झालेले किंवा शारीरिकदृष्ठया विनाश पावलेले असे बंदीचे तीन प्रकार पाडून रामभाऊंनी पुनर्वसनासाठी कलमवार योजना सुचविली होती. तसेच बिनसरकारी नोकरीतील घेतेलेल्या ४००० मिसाबंदीच्या बाबतीत शासन काय करीत आहे असा परखड प्रश्‍नही त्यांनी विचारला होता. रामभाऊ म्हाळगीचे रेल्वे अर्थसंकल्पावर मराठीतूब केले अभ्यासपूर्ण भाषण त्यावेळी लोकसभेत फार गाजले होते. उपनगरी रेल्वे प्रवाशांवरील दरवाढमागे घ्या असे म्हणून ते नुसते थांबले नव्हते, तर उपनगरी रेल्वे तोट्यात का चालते याचा परामर्श त्यांनी त्यावेळी घेतला होता. केंद्रात अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्पया दोन्ही प्रकरणी त्यांनी जनभावनांचे जे प्रगटीकरण केले ते त्यांच्या वाढत्या जनसंपर्काचे द्योतक म्हणावे असे होते. ते स्वतःही कधी जात पात मानत नव्हते मला आठवते की अशाच एका लोकसभ्षेच्या निवडणुकीत प्रचारासाठी ठाण्यातील राबोडी भागात फिरत असताना दुपारची वेळ झाली होती. रामभाऊंना तहान लागली होती. त्यांनी कार्यकर्त्यांजवळ इथे कुठे पाणी मिळेल का? अशी चौकशी केली. कार्यकर्त्यांनी त्यांना संगितले की आपण आता जिथे आहोत ती रोहिदास समाजाच्या लोकांची वस्ती आहे. आपण पुढे गेल्यावर पाणी घेऊ. तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या कार्यकर्त्यांला सुनावले की ही वस्ती रोहिदास समाजाची असली म्हणून काय झाले. इथे माणसेच रहातात ना? तात्काळ रामभाऊ जवळच असलेल्या एका रोहिदास समाजाच्या घरात जाऊन, त्या घरात घटकाभर बसून त्या घरातील व्यक्‍तींनी दिलेले पाणी पिऊनच त्या घरातून बाहेर पडले आणि पुन्हा प्रचाराला लागले.

रामभाऊ म्हाळगी ठाण्यात आल्यावर जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा आमच्या घरी फोन करुन माझ्या आईला आग्रहाने सांगत असत की, मी आज ठाण्यात आलेलो आहे. मला तुमच्या हातची तांदळाच्या उकडीची भाकरी खाण्याची इच्छा झालेली आहे. माझ्यासाठी भाकरी बनवून ठेवा. मी तुमच्याकडे जेवायला येत आहे!

पण रामभाऊंनी येताना कधी हा विचार केला नाही की यांचे घर तर मांस, मच्छी खाणारे यांच्याकडे आपण कसे जेवायचे?

रामाने खारीच्या पाठीवर फिरविलेली बोटे. लोकसभेची निवडणूक होती. रामभाऊ म्हाळगी निवडणूक लढवित होते. त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी भिंती रंगविणे, बॅनर्स रंगविणे हे काम मी करीत असे. रामभाऊंचा एक विशेष भव्य व सुंदर कटआऊट करावा म्हणून त्या कटआऊटचे मी काम करत होतो. रामभाऊंना ही बातमी कळली की आपल्या प्रचारासाठी एक सुंदर कटआऊठ बनत आहे ते पाहण्यासाठी रामभाऊ स्वतः मी काम करीत असलेल्या ठिकाणी आले. तो कटआऊट पाहून ते खूपआनंदी झाले ताबडतोब त्यांनी मला जवळ घेतले, प्रेमाने माझ्या पाठीवर हात फिरवून माझे कौतुक केले. निवडणुकीसाठी अनेक दिवस करीत असलेल्या कामाचा शीण ताबडतोब निघून गेला आणि मी पुन्हा जोमाने प्रचाराच्या कामासाठी लागलो आणि मनात विचार करु लागलो. एवढया मोठया लोकसक्षेच्या निवडणुकीच्या कामात खार बनून मी जे काही थोडे फार काम केले त्या कामासाठी मला प्रत्यक्ष रामाने माझ्या पाठीवर हात फिरविला. वाठ पहातोच असा दुसरा कुठला हात आपल्या पाठीवर फिरेल का? विचार केल्यावर लक्षात येते राम तर फक्‍त एकदाच जन्माला येतो, पुन्हा नाही.

विद्याधर ठाणेकर

Avatar
About विद्याधर ठाणेकर 10 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..