नवीन लेखन...

महाडचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. वसंतराव पुरुषोत्तम सुळे 

जन्म – २६ मे १९२६ ते मृत्यू – २ जानेवारी १९८६

१९७५ ते १९८६ या कालावधीत महाड मध्ये होमिओपॅथी डॉक्टर म्हणून लौलिक मिळविलेले डॉ. वसंतराव सुळे म्हणजे माझे वडील मी व माझ्या तीन बहिणी लीना, ज्योत्स्ना व मीना त्यांना त्यांना पप्पा म्हणत असू म्हणून आख्ख महाड गाव त्यांना त्या काळात डॉ. पपा सुळे म्हणूनच ओळखत असे.

आता होमिओपॅथीचा प्रसार अगदी खेडोपाडी झाला आहे. परंतु ३५-४० वर्षांपूर्वी महाड सारख्या छोट्याशा गावात पूर्णवेळ होमिओपॅथी डॉक्टर म्हणून काम करणं म्हणजे मोठे आव्हान होते. पण पपाचा स्वतःच्या ज्ञानावर आणि होमिओपॅथीवर प्रचंड विश्वास होता.

त्यामुळे अथक परिश्रम करुन त्यांनी होमिओपॅथी औषधोपचारांना. महाड मध्ये विश्वासाचे स्थान मिळवून दिलं आज महाड मध्ये किमान ५-१० होमिओपॅथी डॉक्टर्स कार्यरत आहेत व त्यांची प्रॅक्टीस सुद्धा चांगली चालत असणार. पण याची मुहूर्तमेढ रोवली ती डॉ. सुळे यांनी अनेक जुनाट व असाध्य रोगांवर स्वतः अभ्यास करुन नव-नवीन औषधे तयार करुन त्यांनी असंख्य रुग्ण बरे केले आहेत. त्यामुळे सुरुवातीला साबुदाण्यांच्या गोळ्यांचा डॉक्टर अशी संभावना व चेष्टा होणाऱ्या डॉक्टर सुळ्यांनी १९८० ते मृत्यूपर्यंत एक प्रथितयश डॉक्टर म्हणून महाड़ मध्ये नाव कमावलं.

डॉ. सुळ्यांचा उण्यापुऱ्या ६० वर्षांच्या आयुष्याचा जीवनपट म्हणजे वेगवान घटनांची एक मालिकाच होती गुजराथ मध्ये कलोल येथे जन्म. नंतर बडोदा येथे बालपण व शिक्षण वयाच्या १८ व्या वर्षी घरातून पळून जाऊन ब्रिटीश आर्मीच्या वैद्यकीय विभागात नोकरी. इंटर सायन्स पर्यंत शिक्षण तसेच इंग्रजीवर प्रभुत्व व वैद्यकीय व्यवसायाची तीव्र आवड यामुळे आणि उंच व मजबूत शरीर प्रकृती मुळे त्यांनी आर्मीच्या नोकरीत सार्जंट मेजर पदापर्यंत मजल मारली होती. पण त्यांच्या वडिलांच्या आग्रहामुळे तीन वर्षांनी त्यांना आर्मीची नोकरी सोडावी लागली.

त्यानंतर गुजराथ सरकारच्या आरोग्य खात्यात नोकरी व वयाच्या २२ व्या वर्षी विवाह मुंबई येथील प्रमिला महादेव कर्णिक यांच्याशी (नंतरच्या शोभना वसंत सुळे) त्यानंतर वयाच्या तीशी पर्यंत मी व माझ्या तीन बहिणी अशी संतती. नोकरी निमित्त सुरत जिल्ह्यात बारडोली जवळ व्यारा सोनगड या दुर्गम भागात ४ वर्षे वास्तव्य. पुढे वणी नाशिक इथे सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी. मग अकोला जिल्ह्यात वाशिम इथे त्यानंतर महाराष्ट्र गुजराथ वेगळे झाल्यावर १९५७ पासून पेण, अलिबाग, महाड, बिरवाडी, इत्यादी ठिकाणी रायगड जिल्ह्यात वास्तव्य व महाड येथे कायम वास्तव्य.

पण नोकरीत मन न रमल्यामुळे १९७२ मध्ये वयाच्या ४६ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेऊन प्रथम अॅलोपॅथी व नंतर होमिओपॅथी प्रॅक्टीस डॉक्टर सुळ्यांनी केली. आपण पूर्ण मेडिकल शिक्षण घेऊ शकलो नाही. ही त्यांची खंत होती पण त्यांची नातवंडे डॉ. मंजिरी, डॉ. शौनक, डॉ. सुप्रिया व नातसुन डॉ. शिल्पा यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली असेच म्हणावे लागेल.

– नंदकुमार वसंत सुळे – पुणे

कायस्थ वैभव या अंकातून संकलित

संकलक : शेखर आगसकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..