गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे. […]
माझ्याप्रमाणे, माझ्यासारख्या लाखो वाचकांच्या मनावर अजूनही राज्य करणारे शब्दप्रभू. स्वर्गीय लेखक , साहित्य गंगेच्या प्रवाहात वाचकांना न्हाऊ घालणारे शब्दशिरोमणी. […]
इलाहाबाद चा अमिताभ गंगा किनाऱ्यावरील छोरा म्हणून स्वतःची टिमकी वाजवतो. काल त्याला भुसावळच्या नितीनने बरौनीच्या गंगाकिनारी जाऊन आव्हान दिले. बिहारच्या आदरातिथ्याच्या शेवटच्या टप्प्यात कलकत्त्याच्या संदीप, भुसावळच्या नितीनला घेऊन गेला पुरातन सीमारीया घाटावरील मंदिरात ! रात्रीचे भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटप झाल्यावर तिथल्या महंतांनी विचारले- ” कौन गाँव देवता ? ” […]
एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत. […]
जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा … […]
संत विसोबा खेचर हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे नाईक किंवा सराफ. ते पांचाळ सोनार समाजातील होते. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ महामुनी असे होते. […]
पिकतं तिथं विकत नाही ,अशी एक म्हण आहे. पण सोलापुरात ती खोटी ठरते.. इथे जे पिकतं ,तेच विकतं… कमी पाऊस आणि काळी माती असणार्या सोलापूर परिसरातील ज्वारी ,बाजरी,तूर,हरभरा,भुईमूग ही प्रमुख पिके… त्यामुळे “ज्वारीची भाकरी ” हा सोलापुरी जेवणातील मुख्य पदार्थ.. सोलापुरातील पंचतारांकित हॉटेला पासून ते साध्याशा धाब्यावर मिळणारा नि श्रीमंत आणि गरीब घरातही खाल्ला जाणारा! दुपारी […]
‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले. […]
आपल्याकडे गावोगावी, शहराशहरात असतात तशी वाण्यांची दुकाने अमेरिकेत दिसत नाहीत. इथे ‘राल्फस्’, ‘वॉलमार्ट’, ‘कोलह’, ‘टारगेट’, ‘मायकल’, ‘स्पेक्ट्रम’.. अशा मोठमोठ्या मॉल्सची साखळी असते. त्यामध्ये जगाच्या भिन्न भिन्न कोपऱ्यात तयार होणाऱ्या असंख्य वस्तू वेळोवेळी येत असतात. […]