कुकर…
आज सकाळी चहा घेत बसले होते.. गॅस वर कुकर लावला होता.. या कुकर चं काय एवढं असं विचाराल.. तर हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका बरं का.. 20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..अहो बरोबरच आहे !.. आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच.. वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात. […]