नवीन लेखन...

अर्थ, वाणिज्य विषयक लेख

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज : भारतीय उद्योगांना अर्थ उभारणीचा राजमार्ग

आज जगातील प्रत्येक विकसित व विकसनशील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. भारतात पहिला संघटित शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो आशियातील सर्वात जुना बाजार आहे. […]

बँक आणि छोटे उद्योजक

उद्योजक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर खरी सहाय्यभूत ठरले, ती बँक उद्योजक आणि बँक यातील अतूट नाते व्यक्त केले आहे ‘त्रिगुण टुर्स’चे प्रवीण दाखवे. […]

रंजक किस्से

त्याकाळी व्यापारी मंडळी त्यांच्याजवळील भली मोठी रक्कम बँकेत आणून भरत. रोखपालाकडे गर्दी असेल तर नोटांची पिशवी व चलन रोखपालाकडे ठेवून जात. गर्दी ओसरली की सवडीने, रोखपाल ती पिशवी उघडे आणि रोकड मोजून घेई. समोर संबधित दुकानदार नसेच! सारी काम विश्वासावर! ही नेहमीचीच प्रथा! […]

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी..

सक्षम होणे, सामर्थ्यवान होणे, जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळणे, सन्मानाने जीवन जगणे या बाबींचा आर्थिक स्थैर्याशी आणि आर्थिक स्वातंत्र्यांची जवळचा संबंध आहे. महिलांना जर खरोखरच सक्षम आणि सामर्थ्यवान व्हायचे असेल तर त्यांची अर्थसाक्षरता वाढवत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. […]

अर्थसंकल्प आणि पैसा

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प फायदेशीर ठरत असल्याने भारतासारख्या विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तुटीचा अर्थसंकल्प भाववाढ घडवून आणणारा असल्याने त्यावर योग्य नियंत्रण नसेल तर चलनवाढीचे भय संभवते. […]

दाम करी काम…

देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते. […]

पैशाचे डिजिटल रूप

रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारतामधील पैशाच्या आधुनिकीकरणाला सर्वात मोठा हातभार लावलेला आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या दोन संगणकीकृत सुविधांमुळे रोख पैशा ऐवजी सरसकट कार्डाचा वापर करता येणे शक्य झाले. […]

गुंतवणूक : भविष्यकालीन अर्थवाहिनी

डीआयसीजीसी (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) योजने अंतर्गत नोंदणी करणाऱ्या बँकांमधील ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळते. परंतु या योजनेत प्रायमरी सहकारी संस्थांचा समावेश नाही. बचत, चालू, रिकरिंग खाते व मुदत ठेव या सर्व प्रकारच्या ठेवींना डीआयसीजीसीचे पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच उपलब्ध आहे. […]

काळ्या पैशाचे गणित

काळ्या पैशाचा संग्रह सामान्यपणे ‘हाय डिनॉमिनेशन’ चलनी नोटांमध्ये केला जातो. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चलनी नोटांमध्ये व्यवहार करण्यासाठी चलनी नोटांमध्ये आर्थिक व्यवहार रोखीने करताना, व्यवहारात चलनी नोटांच्या रोख किमतीवर मर्यादा घालण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करून व्यवहार केल्याचे आढळून आल्यास त्याला दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. […]

पैसा म्हणजे काय?

दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. मूल्यमापन हे पैशाचे महत्त्वाचे कार्य आहे. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. […]

1 2 3 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..