नवीन लेखन...

बँक आणि छोटे उद्योजक

मराठी माणूस उद्योगधंद्यात उतरत नाही असे म्हणतात. परंतु मी चांगली नोकरी सोडून व्यवसायात उतरलो कारण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा बनवूया असं मला वाटत होतं. मलाही घरून आर्थिक सहकार्य नव्हतं तरीही मी अनेक व्यवसाय केले व ते यशस्वी करून दाखवले आणि त्याला कारण म्हणजे वेगवेगळ्या बँकांनी मला दिलेले सहकार्य असे म्हणावे लागेल. सुरुवातीला सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे बँकेमध्ये जेव्हा संगणकीकरणची लाट आली होती तेव्हा कन्सल्टंट म्हणून मी काम केलं. त्यामुळे बँकांशी माझा पहिला संबंध व्यवसायाच्या निमित्तानेच आला. सॉफ्टवेअर व्यवसाय करत असताना माझ्याकडे जवळजवळ शंभर जणांचा स्टाफ होता आणि अनेक बँकांच्या विविध शाखांमध्ये संगणकीकरण करण्याचं काम माझ्याकडे होत. बँकांसाठी मी काम करत होतोच. पण बँकेने मला ५०,५० संगणक विकत घेण्यासाठीसुद्धा कर्ज दिल होत. त्यामुळे नंतर मी बँकेचा ग्राहकही झालो होतो. त्यानंतर मी पर्यटन व्यवसायामध्ये शिरलो. यात खरं तर खूप भांडवलाची गरज नसते. परंतु तरीही एक चांगलं प्रपोजल दिल्यामुळे मला इंटरनॅशनल बुकिंग करण्याकरिता बँकेने सीसी लोन दिलं होतं. त्यामुळे अॅडव्हान्सेस म्हणजेच लोन, डेली काम या सर्वांचा बँकिंगमधला खूप अनुभव माझ्या गाठीशी आहे.

पूर्वीसुद्धा जर आपले पेपर्स व्यवस्थित असतील किंवा आपण एखादा चांगला उद्योग करत असू, आपल्या उद्योग व्यवसायाच अकाउंटिंग आणि विश्वासार्हता बाजारात योग्य असेल तर कर्ज मिळायला काहीच त्रास होत नाही असं माझं नक्की म्हणणं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान-मोठ्या उद्योजकांना कर्ज मिळण्यासाठी इतक्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत की, त्यांना छोट्या उद्योजकानी खरंच धन्यवाद द्यायला हवेत. परंतु होतं असं की मराठी तरुणांना बऱ्याच वेळा या योजनांची माहितीच नसते. मराठी मुलं उद्योग व्यवसायाला भांडवल लागतं, आमच्याकडे कुठे भांडवल आहे? असं म्हणून त्यात पडत नाहीत. परंतु अनेक प्रकारची कर्ज आणि समाजातल्या तळागाळातल्या तसेच विविध लोकांना कर्जाच्या वेगवेगळ्या मुद्रा योजनेसारख्या योजना त्यांनी दिल्या आहेत. काही काही योजनातून विनातारण कर्ज मिळू शकतं. परंतु हेच बऱ्याचशा तरुणांना माहीत नसत. त्यामुळे बँकांकडे कोण जाणार? तिथे ओळखी शिवाय कुठे कर्ज मिळत? असा एक समज सर्वांमध्ये झाला आहे. परंतु आपलं प्रपोजल जर अतिशय ट्रान्सपरंट, व्यवहार पारदर्शक आणि सचोटीचे असतील तर बँकेतून आपल्याला निश्चितच कर्ज मिळू शकतं असा माझ्या स्वतः चा अनुभव आहे. मी बँकेतून अनेक वेळा कर्ज घेतली आहेत आणि ती व्यवस्थित फेडली आहेत. व्यवस्थित प्रपोजल तयार केलं, आधीच ट्रॅक रेकॉर्ड नीट असेल, तर मला कर्ज मिळतं असा माझा अनुभव आहे आणि मी प्रत्येक कर्ज अतिशय प्रामाणिकपणे महिन्याच्या महिन्याला फेडतो त्यामुळे माझा रेकॉर्डही चांगला आहे. जी लोकं प्रामाणिकपणे उद्योगधंदा करतात, त्यांना बँकेतून सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज मिळतात असं मला वाटतं. तरुण कधीकधी माझ्याकडे येतात, की आम्हालाही उद्योग धंदा सुरू करायचा आहे पण काय करणार? भांडवल नाही. अशा अनेकांना मी कर्ज मिळवून देण्यासाठी मदतही केली आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की, मोदी सरकारने खरोखर तरुण नवीन लघुउद्योजकांना खूप योजना दिल्या आहेत. अक्षरशः ती एक परवणीच म्हणावी लागेल. फक्त त्या योजनांची माहिती तरुणांना पाहिजे आणि त्यांचं प्रपोजल त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची बाजारातील ही मात्र तरी चोख ठेवली पाहिजे असं मला वाटतं. मला सांगायला हरकत नाही, पण बऱ्याच सरकारी योजनांची कर्ज ही बुडवण्यासाठीच असतात, असा छोट्या कर्जदारांचा समज असतो. सरकार जणू काही आपल्याला भेटच देत आहे, असा त्यांनी समज करून घेतलेला असतो. परंतु तो चुकीचा आहे. तुम्ही छोटसं कर्ज असलं तरीसुद्धा ते प्रामाणिकपणे फेडलं, तर तुम्हालाच पुढचं कर्ज मिळण्यासाठी सुद्धा तुमचा आधीचा रेकॉर्ड उपयोगी पडत असतो. त्यामुळे ‘कर्ज ही आपल्यासाठी सोय असून दान नाही’ हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा कर्ज बुडवणाऱ्या कर्जदारांमुळेच नंतर मग बँकही कर्ज देताना खूप विचार करते. त्यामुळेच तुम्ही पैसे परतफेड करा बँक तुम्हाला पुन्हा लोन देईल, तुम्ही पैसे परतफेड करा, बँक तुम्हाला परत लोन देईल. ही साखळी सुरूच राहते. एकदा का एखाद्या बँकेची कडून आपण छोटे कर्ज घेतलं ते व्यवस्थित फेडलं तर पुढे आपल्याला घरासाठी हीच बँक कर्ज देऊ शकते, गाडी घेण्यासाठी हीच बँक आपल्याला कर्ज देऊ शकते. म्हणजेच एकदा का एखाद्या बँकेशी आपलं नातं जडलं की आपल्याला आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी त्याच बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ शकतं, असा माझा विश्वास आहे. आणि अगदी खरं सांगू का, बँकिंग व्यवसाय आहे म्हणूनच तर छोटे-मोठे उद्योग आज उभे राहत आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो की, दोन दिवसापूर्वीच माझ्या बँकेचे ब्रँच मॅनेजर मला रस्त्यात भेटले होते आणि मला म्हणाले की, ‘साहेब तुम्हाला एखादं कर्ज हवं असेल तर जरूर माझ्याकडे शाखेमध्ये या मी तुम्हाला कर्ज द्यायचा प्रयत्न करीन. बँकांना सुद्धा खरंतर एक ठराविक टारगेट दिलेलं असतं आणि त्यांनाही कर्ज खेळणाऱ्या इतकीच कर्ज देण्याची ही गरज असते.

माझ्या पर्यटन व्यवसायामध्ये तर बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्ड अशा योजनांचा खूपच लाभ होतो. एकदा मी दुबईला ट्रिप नेली होती आणि मला अचानक पैशांची गरज लागली. त्यावेळी देखील मी दुबईतल्या भारतीय बँकेत जाऊन पैसे काढले होते. कधी कधी असं होतं की, एखाद्या हौशी पर्यटकाला भरपूर शॉपिंग करायचं असतं आणि त्याच्या हातात तेवढे पैसे नसतात. डेबिट कार्डही भारतात चालण्या पूरतच असतं. अशावेळी त्यांची फॅमिली माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करते आणि आम्ही त्या पर्यटकाला ते पैसे तिथे विथ ड्रॉ करून देतो. असा मुद्रा योजनेसारख्या अनेक लहान-मोठ्या योजनांमुळे मराठी तरुणाला उद्योजक व्हायचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकेल असं मी आवर्जून सांगू इच्छितो. राष्ट्रीयकृत बँकाच नाही तर काही अतिशय विश्वसनीय सहकारी बँकांमध्ये सुद्धा सुलभरीत्या कर्ज उपलब्ध होऊ शकत. माझा अनुभव बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक अशा राष्ट्रीयकृत बँकांबद्दल खूपच चांगला आहे. आपण दररोज २४ तास, ३६५ दिवस वीज वापरतो. या विजेच बिल आपल्याला येतेच ते बिल आपण इमानदारीत दर महिन्याला भरतो. कारण विज बिल भरलं नाही तर वीज तोडली जाऊ शकते आणि ती तर आपली आता प्राथमिक गरज बनली आहे. अगदी तसंच बँकेचं कर्ज घेतल्यानंतर तीही आपली प्राथमिक गरज आहे असं समजून दर महिन्याला कर्जाचा हप्ता नियमितपणे फेडला, तर त्या व्यक्तीला आणि बँकेचा दोघांचा ही सहज सुलभ, विश्वासार्ह, पारदर्शक व्यवहार होऊ शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. बँकेचं कर्ज आहे ना, भरू पुढच्या महिन्यात, या महिन्यात नाही भरलं तर काय बिघडलं? असा ॲप्रोच कर्ज घेताना ठेवू नये. त्यामुळे ज्यांना वडिलोपार्जित व्यवसाय मिळालेला नाही, ज्यांना शून्यातून व्यवसाय उभा करायचा आहे, त्यांना बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. बँक म्हणजे केवळ व्यक्तिगत पैसे भरणे, काढणे किंवा फिक्स डिपॉझिट ठेवणं इतकीच उपयोगाची नसून एखाद्याचे भवितव्य घडवण्यासाठी सुद्धा मागे उभे राहते हे बँकिंग क्षेत्राचं मोठं योगदान आहे असं मला खचितच वाटत.

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..