नवीन लेखन...

कोकणातील अष्टविनायक

कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून सर्व थरातून फार वर्षांपासून गणेशाची उपासना कोकण प्रांतात होते. आंबा, नारळ, फणस, सुपारीसारख्या प्रसिद्ध फळांप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाला तरी हटकून आपल्या गावी जाणारच. परशुरामाने स्थापन केलेल्या या कोकणभूमीमध्ये काही प्रसिद्ध गणेशस्थाने आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार जरी मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी ती स्थाने अत्यंत सुंदर, देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र स्थाने आहेत. […]

रंगांतील श्रीगणेशभक्ती

सर्व कलांचा अधिपती श्रीगणेश आहे. सर्व विद्यांच्या मुळारंभी देखील श्रीगणेशच आहे. मला आठवते, आमच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री गणेशाची उपासना आहे. घरातील वडीलधारे बोलायचे ते कळत नसायचं पण ऐकायला यायचं. समजायचं फक्त ‘श्रीगणेश’ या वैशिष्ट्यपूर्ण आकार धारण केलेल्या देवतेचं नाती. […]

मराठवाड्यातील अष्टविनायक

अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. या सर्व गणेशस्थानांमध्ये देवांनी, असुरांनी, ऋषींनी, भक्तांनी गणेशाची आराधना केलेली असून त्याचे प्रतीक म्हणून गणेशमूर्तीची स्थापना केलेली आढळते. […]

सिद्धीविनायक यात्रेतील आठवणी

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील २१ सिद्धीविनायक यात्रेला जाण्याचा योग आला. औरंगाबादहून नागपूरच्या रस्त्याला लागलो. मध्ये यवतमाळच्या अलीकडे जानक एक आठ- नऊ वर्षांचा मुलगा सारखा आमच्या मागून धावत येत होता. धावताना काही खाणाखुणा करीत होता. […]

कथा गणेशाच्या

जपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे. […]

यात्रा छप्पन्न काशी विनायकांची

प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काशीक्षेत्र त्याला मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, अन्न-पाणी, आसरा, भक्ती, ज्ञान देत राहील आणि अंतःसमयी त्याला मोक्ष प्राप्त करुन देईल, असे म्हटले जाते. काशीक्षेत्राचे महत्त्व सांगणारे असे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ आहेत. […]

परिक्रमा श्री अष्टविनायकांची

भारताची भूमी आध्यात्मप्रवण आहे. भारतीय लोक स्वभावतःच धर्मनिष्ठ आणि पापभीरू आहेत. देवावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. इथे अनेक देवदेवता आणि त्यांची देवळे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश-श्रीकृष्णा… प्रमाणेच इथे ‘श्रीगणपती’ या देवालाही लोकमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. गणांचा अधिपती म्हणून याला गणपती म्हणतात. कुणी सुखकर्ता तर आणखी कुणी विघ्नहर्ता असेही म्हणतात. […]

विदर्भातील अष्टविनायक

‘विदर्भातील अष्टविनायक’ प्रेक्षणीय आहेत. त्यांच्याशी विविध दंतकथाहि जोडल्या गेल्या आहेत. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये वैविधता आढळते. […]

दोन वेळा विंबल्डन जिंकणारी पहिली ‘काळी’ टेनिसपटू आलथिआ गिब्सन

टेनिसक्षेत्रात जागतिक पातळीवर गेली काही वर्षे सेरेना आणि व्हिनस विल्यम्स या काळ्या (किंवा निग्रो) बहिणी अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून वावरत आहेत. त्यांची नावे, त्यांचा खेळ, त्यांची चपळाई, त्यांचे टेनिसच्या खेळातील वादातीत प्रभुत्व आणि जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धे तील त्यांचे अढळ-अजिंक्यपद, या सर्वांची आपल्याला आता सवयच झालेली आहे. […]

अमेरिकेत भेटली आपली झाशीची राणी!

अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात विविध प्रकारचे वाङ्मय वाचण्याचा माझा प्रयत्न होता. चरित्रात्मक आणि व्यक्तिचित्रणात्मक वाङ्मयप्रकारात मला विशेष रस वाटतो. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, ग्रंथ आणि पुस्तिका मी चाळत असताना एका पुस्तिकेत मला ‘लक्ष्मीबाई- दि रानी ऑफ झांसी’ हा लेख आढळला. […]

1 2 3 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..