साहित्यिक पत्रकारिता
मराठी साहित्य परंपरेला पत्रकारितेचा परिसस्पर्श झाला आणि साहित्य सृष्टी सुवर्णकांती प्रमाणे झळाळू लागली. साहित्य वाचकांशी संवाद साधणारं एक प्रमुख साधन. साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांगणातून मुक्त संचार करीत वाचक आणि लेखक परस्परांशी संवाद साधतात. लेखकाच्या भावभावनांना, त्याच्या विचारांना वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचणारं एक प्रभावी माध्यम म्हणजे साहित्य रचना. […]