नवीन लेखन...

भारतीय विज्ञान तंत्रज्ञान-गरुड भरारी

स्वदेशी म्हणजे जे काही आहे ते सारे माझ्या देशाचे. मग ते आचार असोत, विचार असोत, संस्कार असोत, संस्कृती असो. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपल्या देशाने आपली नाममुद्रा उमटवलेली नाही. आपण केलेल्या प्रत्येक संशोधनात भारतीयत्वाची झलक दिसते. […]

प्रसार माध्यमे आणि बालजगत

अलीकडे प्रसार माध्यमांचा जनमानसावर जबरदस्त पगडा असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. या प्रसार माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे लहान मुलेसुद्धा त्याच्या प्रभावापासून सुटलेली नाहीत. या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमांमुळे जग खूप जवळ आले असून यातील स्पर्धा, गती, विविधता आणि नावीन्याने आजची मुलं दिवसेंदिवस उत्सुकता, कुतूहलापोटी या प्रसार माध्यमांच्या अधिकाधिक जवळ जात आहेत. […]

अमृताते पैजा जिंकायच्या तर….

परखाच एका मुलाखतीमध्ये मला प्रश्न विचारला गेला की भाषेच्या क्षेत्रात एकच गोष्ट बदलायची असेल तर तुम्ही काय बदलाल? क्षणाचाही विलंब न लागता उत्तर आलं की ‘भाषा शिक्षणाची पद्धत.’ […]

भारतीय स्वातंत्र्य आणि स्वदेशी 

स्वातंत्र्याचा लढा व स्वदेशी चळवळ हा विषय समजून घेताना इ.स. १८५० च्या पूर्वी देखील जे स्थानिक उठाव झाले त्याचीही पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. यात शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केल्याचे दिसून येते. […]

इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि तरुणाई

दूरचित्रवाणीच्या तंत्राचा शोध लागून आता सुमारे १०० वर्षे पूर्ण होतील. काही काळापूर्वी ज्या टीव्हीला इडियट बॉक्स म्हणून हिणवले जायचे तोच टीव्ही आता इंटेलिजंट बॉक्स झाला आहे. जगात आणि भारतात जेव्हा हे तंत्रज्ञान पसरत होते तेव्हा शिक्षण, माहिती आणि मनोरंजन हेच टीव्हीचे उद्दिष्ठ असल्याचे जाणीवपूर्वक सांगितले जायचे. […]

स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने

भारतासह जगभरात ठिकठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जागतिक स्तरावर स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरींचा उत्सव साजरा केला जातो. सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात तर महिला दिनाचा प्रचार नामांकित ब्रँडच्या वस्तू खपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. […]

स्वदेशी संकल्पना

आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कामात स्वराज्य आणि स्वदेशी हे दोन मंत्र महत्त्वाचे होते. या दोहोंचा परस्परांशी संबंध होता व असे म्हटले आहे की, स्वदेशीशिवाय स्वराज्य अपूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीचा अर्थ वेगळा होता आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्याचा अर्थ वेगळा झाला. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी स्वराज्य आणि स्वदेशी आवश्यक आहेत आणि स्वातंत्र्यानंतर आर्थिक स्वावलंबनासाठी स्वदेशी आवश्यक आहे असा विचार मांडण्यात आला. […]

प्रसार माध्यमे आणि स्त्रीप्रतिमा

महिलांचे शिक्षण, त्यासाठी समाजातील प्रयत्न, स्त्रियांना मिळणाऱ्या शैक्षणिक संधी, नोकरी-व्यवसाय यासंदर्भात तत्कालीन वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी ‘समाजमन’ तयार करण्याचे कार्य केले. आज प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता यादीमध्ये प्रथम येण्याचे मुलींचे प्रमाण अधिक आहे. […]

वैवाहिक आयुष्य बहरविण्यासाठी

प्रेम हा विवाह जीवनाचा पाया आहे. प्रेमात शारीरिक आकर्षण हा फार मोठा भाग आहे, पण त्याचबरोबर प्रेम हे मानसिक व भावनिक पातळीवर रुजले असेल तरच शारीरिक पातळीवर टिकू शकते. लग्नामुळे दोन वेगवेगळ्या आर्थिक, कौटुंबिक, स्वाभाविक आणि काही वेळा वेगवेगळ्या जातीधर्मातील व्यक्ती आयुष्य एकत्रित घालवण्याच्या ओढीतून एकत्र येतात, स्त्री पुरुषांमधल्या नैसर्गिक आकर्षणामुळे विवाहाने एकत्र बांधले जाणे ही एक वेळ सोपी गोष्ट आहे […]

1 3 4 5 6 7 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..