नवीन लेखन...

भारतीय लोकजीवन आणि कृषी परंपरा

मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच. […]

लोककलेतून स्वदेशी वारे

लोककला आणि स्वदेशी या दोन संज्ञांचा विचार करत असताना एक लक्षात येते की, या दोन संज्ञा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. परस्पर निर्मिती, योग यातून दिसून येतो. ‘स्थानीयता’ या दोन्ही संज्ञाचा मूलाधार आहे. […]

व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला माज-हिंदुपंच

मराठीतल्या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाचे नाव आहे हिंदूपंच. त्याचा पहिला अंक २१ मार्च१८७२ रोजी प्रसिद्ध झाला. ठाणे शहरातून एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न तब्बल १४ वर्षांपूर्वी झाला. त्याला निश्चितपणे ऐतिहासिक महत्त्व आहे. गोपाळ गोविंद दाबक हे त्याचे मालक चालक संपादक होते. पुढे त्यांची जबाबदारी कृष्णाजी काशिनाथ ऊर्फ तात्या फडके यांच्यावर आल्यावर त्यांनी त्या पत्राचा प्रभाव चांगलाच वाढवला. […]

देशी हुन्नर आणि स्वदेशीपणा

स्त्यावरून चालताना आपले पाय अचानक थबकतात… कळत नाही पण आपण आपोआप थांबतो.. कारण कुठेतरी बारीक आवाजात लतादीदींचे सूर कानावर पडतायत. जहांगीर आर्ट गॅलरी पाहून मन थक्क होतं… रेषा, वर्तुळ, चौकोन, मानवी भावमुद्रा, विविध रंगांची उधळण. मन प्रसन्न होतं. […]

मुद्रित माध्यमांचा उदय आणि विकास

सहाय्यक प्राध्यापक वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मुद्रित माध्यमांचा इतिहास रंजक असला तरी तो मानवाच्या प्रगतीचा साक्षीदारही आहे. तंत्रज्ञानातील बदलाबरोबरच मुद्रित माध्यमांतील स्थित्यंतरे समजून घ्यायची असतील तर निश्चितपणे हा इतिहास नेमकेपणाने लक्षात घेणे आवश्यक आहे. […]

भारतीय संस्कृती परंपरा आणि वारसा

भारतीय संस्कृतीलातीत सनातन विश्वधर्मावर आधारलेली आहे. वैदिक वाङ्मयात ऋत नावाची एक संकल्पना आहे. ही ऋत संकल्पनाच या विश्वधर्माची मूळ बैठक होय. आपण गणपती अथर्वशीर्षात ऋतं वच्मि सत्यं वच्मि म्हणतो, हेच ते ऋत होय. ऋत म्हणजे अंतिम सत्याचा मार्ग, विश्वाचा शाश्वत नियम. […]

आभाळ हळूहळू काळवंडत जाते आहे…

आयुष्याच्या उतारवयात आदर काय असतो आणि त्याची महती काय असते हे लख्खपणे जाणवायला लागते. या वयात आसक्ती आणि ओढ काय असते आणि त्यातून मोकळं कसं व्हायचं ते समजतं. निसर्गाचे नियम हेच जगण्याचे नियम असतात. प्रवाहासोबत वाहत राहणे, मनाचा समतोल टिकवून ठेवणे हेच यापुढचे जगणं असणार आहे. […]

माध्यमांचे अंतरंग  एक दृष्टिक्षेप

माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र यात एकच मोठा फरक आहे तो म्हणजे माणसात जिज्ञासा अथवा कुतुहल असते इतर प्राणीमात्रात ती नाही. या जिज्ञासेपोटी माणूस विचार करीत गेला आणि त्याचा मेंदू अधिक तल्लख झाला. माणूस केवळ स्वतः चा विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलीकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला. ‘माध्यम’ हा शब्द मुळात ‘मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे. […]

पाश्चिमात्य जगत आणि आत्मनिर्भरतेचा जागर

राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद किंवा विश्ववाद रायचा आकडा. राष्ट्रवादात यांच्यात छत्तीसचा राष्ट्र प्रथम, देशाच्या सीमांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे, उद्योगांचे आणि आस्थापनांचे हित प्रथम त्यासाठी स्वदेशीला प्राधान्य; आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट… कारण देश आत्मनिर्भर झाला तरच तो जागतिक महासत्ता होऊ शकेल हा विश्वास. […]

श्री मोरया गोसावी आणि चिंचवड परंपरा

मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले. […]

1 5 6 7 8 9 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..