मूलांक २
मूलांक २ (जन्म २, ११, २०, २९ तारखेला) असलेले लोक शांत, संवेदनशील, बुद्धिमान आणि मनमिळाऊ स्वभावाचे असतात, जे चंद्रदेवाच्या प्रभावाखाली असतात; ते मनाने सुंदर असून इतरांकडे लवकर आकर्षित होतात, पण आत्मविश्वासाची कमतरता असू शकते, म्हणून त्यांना प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची गरज असते. हे लोक शांत, संवेदनशील, सर्जनशील आणि सहकार्य करणारे असतात, ज्यांना इतरांसोबत वेळ घालवायला आवडतो; ते कठीण परिस्थितीत धीर धरतात, पण त्यांना कामासाठी सतत प्रोत्साहनाची गरज असते, असे अंकशास्त्र सांगते. त्यांचे स्वामी ग्रह चंद्र असून, ते भावनिक, बुद्धिमान आणि समतोल लोक मनाने श्रीमंत असतात. हे लोक बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी ठरतात.
मूलांक २ ची वैशिष्ट्ये
जन्म तारीख: कोणत्याही महिन्यातील २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेले लोक मूलांक २ चे असतात. स्वामी ग्रह: चंद्र ग्रह. कल्पनाशीलतेचा तो कारक आहे आणि कल्पनेशिवाय विकास अशक्य.
• गुण: गुण प्रधान, मायेचा पूर्ण आस्वाद घेणारे असतात आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहतात. मनात सतत कुठेतरी अध्यात्माप्रति कोमल भाव आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा बाळगून असतात. उदार स्वभावामुळे यांच्या संपर्कात अपरिचित व्यक्तीही सुखावतो. नियमांशी कधीही तडजोड करत नाहीत आणि शिस्तप्रिय असतात. पोहणे, नृत्य करणे, बागकाम आणि इतर कलात्मक गोष्टींमध्ये विशेष रस असतो. यांना प्राणी आणि पर्यावरणाविषयी विशेष प्रेम असते. अनेकवेळा लोक यांच्या याच सहृदयता स्वभावाचा गैरफायदा घेतात.
• सकारात्मक बाजू: कठीण परिस्थितीत हार मानत नाहीत, संयमाने काम करतात, आणि कल्पनांवर ठाम राहतात. हे लोक अभ्यासात हुशार असतात, इतरांना मदत करणारे आणि चांगले मित्र बनतात.
• स्वभाव: शांत, कोमल, संवेदनशील, भावनिक, बुद्धिमान आणि मनाने सुंदर, मनमिळाऊ, सहानुभूतीशील, आणि संतुलित.
• व्यक्तिमत्त्व: मनाने सुंदर, इतरांकडे लवकर आकर्षित होतात, आणि सुंदर वस्तूंना महत्त्व देतात. मुळातच मनाशी या ग्रहाचा संबंध असल्याने संवेदनशील, भावुक अशी या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करता येइल. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कायमच या व्यक्ती सतर्क असतात. आपली जीवनशैली, खानपान कसं असावं याबाबतीतील समज अत्यंत दृढ असतो. भौतिक गुणांपेक्षा मानसिक गुण अधिक प्रदर्शित होतात. समाजात सहज स्विकार्य असे हे व्यक्तिमत्त्व असते.
शिक्षणामध्ये उत्तम
मुळांक 2 असलेले लोक उत्तम शिक्षण प्राप्त करतात. उत्कृष्ट कल्पनाशक्तीमुळे हे लोक चांगले प्रदर्शन करू शकतात. यांच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास हे लोक पैसे कमावून तो सेव्हिंग कसा करत येईल याचा जास्त विचार करतात. यामुळे यांची आर्थिक स्थिती चांगली राहते. यांनी कुठेही नोकरी केली तरी यशस्वी होऊ शकतात. भेलीही स्वतः उत्तम व्यावसायिक होऊ शकले नाही तरी धन कमावण्याच्या योजना बनवण्यात माहीर असतात. या लोकांनी जर 1, 4 आणि 7 मुळांक असलेल्या लोकांसोबत व्यवसाय केला तर जास्त यश प्राप्त होऊ शकते.
• भाव: स्वभाव मूडी असतो. एखाद्या समस्येने कासाविस होत असल्याने छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठीही ऊहापोह करतात. थोडक्यात वर्णन करायचं तर चंद्राच्या कलेप्रमाणेच स्वभाव बदलत राहतो. मात्र इतरांविषयी नेहमीच सहृदयी असे हे व्यक्तिमत्त्व असते, त्यात कोणताही दिखाऊपणा नसतो. अवगुण: जीवनात कोणत्याही एका कार्यात संतुष्ट नसतात, वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. हाती घेतलेल्या कामात जराशी अडचण आली तरी ते काम सोडून दुसऱ्या कार्यात लक्ष घालतात. भोळा आणि सरळ स्वभाव अनेक कार्यात बाधा निर्माण करणारा ठरतो. त्यामुळे स्थायी भाव यांच्यात अधिक जाणवतो. उदासीनता हा मुख्य अवगुण आहे.
• सकारात्मक बाजू: कठीण परिस्थितीत हार मानत नाहीत, संयमाने काम करतात, आणि कल्पनांवर ठाम राहतात. हे लोक अभ्यासात हुशार असतात, इतरांना मदत करणारे आणि चांगले मित्र बनतात.
• सर्जनशीलता: हे लोक खूप सर्जनशील असतात.
• कौटुंबिक जीवन: दांपत्यजीवन सुखी असते आणि कुटुंबासाठी वेळ देणे महत्त्वाचे असते.
• आर्थिक बाजू: कष्टाचे फळ मिळते, पण आर्थिक बाजूसाठी योग्य नियोजन आवश्यक असते.
• आकर्षण: सुंदर आणि कलात्मक गोष्टींकडे लवकर आकर्षित होतात.
• मूलांक क्रमांक 2 असलेले लोकांना संपत्तीचं जतन करायला आवडतं. ते केवळ नोकरीतच नाही तर व्यवसायातही खूप नाव कमावतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करू शकतात. मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते. ज्या लोकांचं कार्यक्षेत्र सर्जनशीलतेशी संबंधित आहे अशा लोकांना समाजात चांगली प्रसिद्धी मिळते.
• नकारात्मक बाजू: अनेकदा आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आणि भावनिक होऊन इतरांकडून फायदा घेतला जाऊ शकतो. त्यांना कामासाठी सतत पाठिंब्याची गरज असते आणि यश न मिळाल्यास निराश होऊ शकतात.
• स्वामी ग्रह: चंद्र, ज्यामुळे अध्यात्मिक आणि आत्मविश्वास वाढतो.
• शुभ रंग: पांढरा, बदामी, आकाशी.
• शुभ दिवस: सोमवार, गुरुवार.
संबंध आणि संगत
• मूलांक २ च्या लोकांसाठी प्रेमळ आणि भावनिक आधार देणारे लोक महत्त्वाचे असतात. मूलांक ८ आणि ९ च्या लोकांशी त्यांचे पटत नाही असे मानले जाते.
आरोग्य
पचनसंस्था, थायरॉईड किंवा हार्मोन्सशी संबंधित किरकोळ समस्यांचा त्रास होऊ शकतो, म्हणून नियमित तपासणी आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठी प्रियजनांशी बोलणे आणि विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे.
• स्वरूप: एकूणच नाजूक व्यक्तिमत्त्व असलेल्या या व्यक्ती असतात. शारीरिक स्वरूप आकर्षक आणि मजबूत असते. त्यांचे आरोग्य मात्र मध्यम स्वरूपाचे असते. सतत शारीरिक विकार होत राहतात.
• भाग्यशाली तिथी: २, ४, ११, १३, १६, २०, २५, २९ आणी ३१या तारखा या व्यक्तींसाठी भाग्यशाली आहेत. ७, १६ आणी २५ या तारखाही क्वचित शुभफलदायी ठरतील.
• भाग्यशाली वर्ष: ४, १३, २२, ३१, ४०, ४९, ५८, ६७, आणी ७६ ही वर्षे भाग्यशाली असतील. २५, ३४, ४३, ५२, ६१ व ७० ही वर्षे अधिक उत्तम आहेत. १२, १८, २१, २७ व ३० व्या वर्षी विशेष सावधानता राखावी.
• भाग्यशाली करिअर आणि व्यवसाय: ग्लॅमरची विशेष ओढ असल्याने या व्यक्ती तशाच फिल्डमध्ये म्हणजे अभिनय, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात यश संपादन करू शकतात. या व्यतिरिक्त लेखन, संगीत, कला, नृत्य या क्षेत्रात यश मिळू शकते.भाग्यशाली करिअर आणि व्यवसाय: ग्लॅमरची विशेष ओढ असल्याने या व्यक्ती तशाच फिल्डमध्ये म्हणजे अभिनय, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात यश संपादन करू शकतात. या व्यतिरिक्त लेखन, संगीत, कला, नृत्य या क्षेत्रात यश मिळू शकते.
• प्रेम आणि मैत्रीसाठी भाग्यशाली अंक: ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यातील २,४,७,११,१३,१६,२०, २२, २५, २९, आणी ३१ या तारखांना झाला आहे, त्या व्यक्ती मूलांक २ साठी भाग्यशाली आहेत. मैत्री, प्रेम आणि विवाहासाठी या व्यक्ती 2 मूलांकासाठी योग्य आहेत. मात्र ३,९,१२ आणी २७ तारखेस जन्मलेल्या व्यक्ती मैत्री, प्रेम, सामंजस्य आणि विवाहासाठी योग्य नाहीत.
• भाग्यशाली रंग: क्रिम, पिवळा आणि गुलाबी रंग या मूलांकासाठी शुभ रंग आहे. लाल, पांढरा आणि गडद हिरवा या व्यक्तींसाठी भाग्यशाली रंग आहेत. काळा, वांगी कलर या रंगांपासून दूर राहा. हे रंग समस्या निर्माण करू शकतात.
• शुभ रत्न: मूलांक २ च्या व्यक्तींनी मोती रत्न धारण करावे. किंवा चांदीचा चंद्र गळ्यात धारण केल्यास विशेष लाभ होईल.
कल्याणकारी मंत्र: या व्यक्तिंनी कल्याण आणि प्रगतीसाठी चंद्रमंत्रासोबत गणपती मंत्राचाही जप करावा.
• मंत्र- ॐ सौं सोमाय नम:।
• ऊं वक्रतुण्डाय हुम्।।
• 2026 वार्षिक राशिभविष्य: मूलांक 2 –
• आर्थिक व्यवहारात सावध राहा
अंकशास्त्रानुसार मूलांक 2 असणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष संमिश्र फलदायी असणार आहे. करिअरमध्ये स्थिरता असेल आणि आर्थिक बाबतीत भागीदारीतून फायदा होऊ शकतो. मूलांक 2 असणारे जे जातक मीडिया, डिझाईन किंवा सर्जनशील क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी मिळकतीची दालने खुले होतील. दरम्यान कायदेशीर गोष्टींमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत कुणावरही जास्त विश्वास ठेवू नका. विवाहितांनी परस्पर समजुतीने वागल्यास दांपत्य जीवनात मधुरता टिकून राहील. वागणुकित समजूतदारपणा ठेवा तरच जोडीदारासोबतचे तणाव दूर होतील. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या कारण 2026 मध्ये तणाव आणि अनिद्रेचा त्रास होवू शकतो. कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2026) आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, आर्थिक बाबतीत नवीन वर्ष तुमच्यासाठी फार सामान्य असणार आहे. या वर्षात तुमच्या हातात पैसा येईल पण पैशांबरोबर तुमचा खर्चही वाढेल. विशेषत: भावनेच्या भरात येऊन पैसे खर्च करु नका. तसेच, एखाद्याला खुश करण्यासाठी किंवा मन मोकळं करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसा उडवू नका. थोडक्यात सांगायचं झाल्यास,आंथरुण पाहून पाय पसरा. कसं असेल आरोग्य?
(Yearly Health Numerology 2026)
नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमचं आरोग्य एकदम चांगलं असेल. मात्र, तुम्हाला या वर्षात मानसिक शांततेसाठी तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी काही संकल्प करावा लागेल. या काळात ध्यान, योग आणि प्राणायाम करणे तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
सारांश:
२०२६ हे वर्ष मूलांक २ साठी एक महत्त्वाचे वळण असू शकते, जिथे त्यांना नवीन ऊर्जा, चांगली आर्थिक स्थिती आणि यश मिळेल, परंतु भावनिक समतोल राखणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.)
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
१४.०१.२०२६


खूप विस्तारीत आणि सखोल माहिती सांगितली गेली आहे
उत्तम