नवीन लेखन...

कारण आपल्या रक्तातच “खाबूगिरी” भिनली आहे!

तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी कितीही प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी असला तरी त्याच्या पाठीशी उभे राहणे आपल्याला सहज शक्य नाही…

२० लाखांची गाडी घेऊन ५० रुपयांचा टोल वाचवण्यासाठी धडपडणारे आपण…..
१ कोटीचा फ्लॅट घेऊन सोसायटीचा ५०० रुपयांचा मेंटेनन्स वाढला तर आंदोलन करणारे आपण…
हॉटेलमध्ये ५००० रुपयांचे बिल देणारे, पण जीएसटी टाळण्यासाठी “कॅशमध्ये चालेल का?” विचारणारे आपण…
देवाला हजारो रुपयांचा हार वाहणारे, पण कर भरताना मात्र जीवावर येणारे आपण…

पाचशे रुपयांचा मोबाईल कव्हर ऑनलाइन स्वस्त शोधण्यासाठी दोन तास घालवणारे आपण…
पण मतदानाच्या दिवशी दोन किलोमीटर जाऊन मतदान करायला कंटाळा करणारे आपण…

सिग्नल तोडून वेळ वाचवणारे, फूटपाथ वर बाईक चालवणारे आणि अपघात झाला की प्रशासनाला दोष देणारे आपण…

रांगेत उभे राहण्याऐवजी ओळख वापरून पुढे जाणारे आपण… स्वच्छतेवर भाषण करणारे, पण गाडीची काच उघडून कचरा रस्त्यावर फेकणारे किंवा पिचकारी टाकणारे आपण…

स्वतःच्या मुलासाठी सर्वोत्तम शिक्षण हवे असते…
पण शाळेजवळील अतिक्रमण, गुटखा विक्री किंवा भेसळ याविरोधात आवाज उठवत नाही.

रुग्णालयात चांगले उपचार हवे असतात…
पण बनावट औषधांवर कारवाई करणाऱ्यांच्या मागे उभे राहत नाही.

आपल्याला भ्रष्टाचार नको असतो,
पण आपले काम लवकर व्हावे म्हणून “काहीतरी सेटिंग” शोधत असतो.

आपल्याला भेसळ नको असते,
पण “स्वस्तात मस्त” मिळाले की गुणवत्ता विसरतो.

आपल्याला प्रामाणिक अधिकारी हवा असतो,
पण तो नियम सर्वांसाठी सारखे लागू करू लागला की अस्वस्थ होतो.

ज्याने बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली तो वाईट…
ज्याने अतिक्रमण काढले तो कठोर…
ज्याने भेसळखोरांवर धाडी टाकल्या तो प्रसिद्धीखोर…
आणि ज्याने काहीच केले नाही तो “चांगला अधिकारी”!

हा आपल्या समाजाचा मोठा विरोधाभास आहे.

तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी म्हणजे आरशासारखे असतात. त्यांच्याकडे पाहिले की व्यवस्थेतील दोषांपेक्षा आपले दोष जास्त दिसू लागतात.
म्हणून अनेकांना ते खटकतात.

भेसळ फक्त दूध, तूप, तेल, मसाले किंवा औषधांमध्ये नाही…
भेसळ आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीतही शिरली आहे.

समाज बदलायचा असेल तर फक्त मुंढे साहेबांची नाही, तर स्वतःचीही मानसिकता बदलावी लागेल.

मुंढे साहेबांची २७ वी बदली होऊ नये म्हणून आवाज उठवण्यापेक्षा, आपल्या २७ वाईट सवयी बदलल्या तर समाज अधिक वेगाने बदलेल!

कारण देशाला तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहेच… पण त्याहून जास्त गरज आहे तुकाराम मुंढेंना साथ देणाऱ्या नागरिकांची!

“जोपर्यंत प्रामाणिक अधिकारी एकटा लढतो आणि स्वार्थी लोक संघटित राहतात, तोपर्यंत बदल कठीण आहे. ज्या दिवशी सज्जन माणसे एकत्र येतील, त्या दिवशी व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..