नवीन लेखन...

तर्पण

पितृपक्ष सुरू झाला की एक शब्द सतत कानावर पडत रहातो तो म्हणजे तर्पण ! पण हे नक्की काय हे बर्याच लोकांना माहीत नसतं .तर्पण म्हणजे तृप्त करणं . पाणी, जव, कुशा आणी काळे तीळ हातात घेऊन आपल्या समस्त ज्ञात अज्ञात पूर्वजांना आवाहन करुन त्यांच्या शांती, तृप्ती आणी मुक्ती साठी केलेली प्रार्थना म्हणजे तर्पण!

आपल्या कडे जे काही जन्मजात असतं ते असतं आपल्या मातुल पितुल कुळातल्या अनेक पिढ्यांच्या अणु रेणु तुन आलेलं गुणावगुणांचं संचीत. आपल्याला माहिती असलेल्या मागच्या काही पिढ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा पितृपक्ष  , तर्पण, पिंडदान वगैरे केले जातात.
खरंतर हे सगळं असतं ते जिवंत माणसाच्या मन:शांती साठी कारण 99% वेळा गेलेली माणसं नक्की काय इच्छा मनात ठेवून गेली आहेत हे कोणालाही कळत नसतं.

आत्मा नवं रूप धारण करून जन्म घेतो , जगतो, हसतो, खेळतो, रडतो, नवं जग घडवतो आणी वेळ संपली की निघून जातो . एक शरीर सोडल्या नंतर 84 लाख योनीत फिरून मग परत मनुष्य जन्म मिळवतो. त्या मुळे पितृपक्षा च्या निमित्ताने जमेल तितक्या जिवांना अन्नदान व्हावं , त्या निमित्ताने तरी कोणीही उपाशी राहु नये हा साधा सरळ सिद्धांत त्या मागे आहे.

आता काही जण म्हणतात की आई वडीलांना जिवंत पणी सुखी ठेवावं  , नंतर हे सगळं करण्याला काही अर्थ नसतो वगैरे. एका अर्थाने ते बरोबर आहे. पण जिवंत पणी प्रत्येकानं आपलं वागणं गोड आणी स्वभाव फ्लेक्झीबल ठेवला नं तर मुलं जिवंत पणी ही विचारात आणी मृत्यू नंतरही मनापासून तुमची आठवण काढतात.

लाखात काही दिवटे जिवंत आई बापाला छळुन आपल्या कर्तृत्वाचा स्पेशल उजेड पाडणारे असतात ही, पण त्या साठी पण आपल्या उपनिषदां मधे खुप छान समजावलं गेलं आहे.

थोडक्यात नेकी कर और दर्या मे डाल वाली फिलॉसॉफी आपल्या धर्मानी खुप वेगवेगळ्या रूपानी आपल्या ला समजावताना पृथ्वी वरच्या जमेल तेवढ्या जिवां साठी पोट भरायची सोय करुन दिली आहे. आणी वर हे करताना ग ची बाधा होऊ नये म्हणून पितृ सेवा, गो सेवा अशी गोंडस नावं पण दिली आहेत.

खरंतर आई वडील मग ते आपले असोत किंवा नवर्याचे , त्यांचं ऋण फेडणं कधीच शक्य नसतं. कसलं आणी कशाकशाचं फेडणार? पण तरीही मला वेगळ्या प्रकारानी ती ऋणं फेडण्याचा प्रयत्न करणारी माणसं खुप आवडतात. कोणी मानसिक अपंगत्व असलेल्या दिराला आई बनुन सांभाळतात, कोणी आपलं वय झालं तरी आपल्या पेक्षा मोठ्या आणी एकट्या असलेल्या दिरांना आपलं म्हणत प्रेमानी स्विकारतात.
कोणी पत्नी चं निधन झालं तरीही तिच्या आई वडीलांची तितक्याच प्रेमाने काळजी घेतात ,कोणी एखाद्या गरजवंताच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात , तर कोणी एखाद्या अपंगाला पायावर उभं रहायला मदत करतात ! तर्पण तर्पण म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं हो?…..

सुखदा सिंग

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..