मराठीसृष्टी वेब पोर्टलच्या वापराची नियमावली

मराठीसृष्टी डॉट कॉम हे मराठी संकेतस्थळ, मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी बनविलेले आणि सुमारे दशकभराहून जास्त काळ यशस्वीपणे चालविलेले असून हे एक सर्वसमावेशक मराठी पोर्टल आहे. मराठीतून इंटरनेटवर लिहू इच्छिणार्‍या कोणाहीसाठी हे संकेतस्थळ खुले आहे.

मराठीसृष्टी डॉट कॉमची कार्यपध्दती, वापर व वावर या संबधातील धोरणे व नियमावली अशी ;

१] मराठीसृष्टी डॉट कॉम हे कोणतीही व्यक्ती, पक्ष अथवा संघटना ह्यांचे मुखपत्र म्हणून काम करत नाही आणि करणारही नाही.

२] मराठीसृष्टी डॉट कॉमच्या सुविधेचा वापर करण्याचे अधिकार त्याच्या नोंदणीकृत सभासदांना असतील. सभासदाने ज्याअर्थी सभासदत्वाची मराठीसृष्टी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे त्याअर्थी सभासदाला मराठीसृष्टी डॉट कॉमची धोरणे व नियम मान्य आहेत, असे गृहित धरले जाईल. ह्या धोरणे व नियमांचे पालन करणे नोंदणीकृत झालेल्या सभासदांना बंधनकारक राहिल.

३] सभासदत्व नोंदणी करताना सभासदाने मराठीसृष्टी डॉट कॉमला दिलेली माहिती सत्य आहे ह्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी त्या सभासदाची राहील. संकेतस्थळाने सभासदत्व देताना मागवलेली माहीती पुरवणे सदस्यास बंधनकारक राहिल.

४] नोंदणीकृत सभासदाचे सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याचे अधिकार संकेतस्थळाकडे राहतील. सभासदत्व खालील परिस्थिती मध्ये स्थगित अथवा रद्द होऊ शकते.

४.१) संकेतस्थळाची ध्येय, धोरणे, उद्दिष्टे व नियम ह्यांच्याशी विसंगत असे कोणतेही वर्तन करणे.

४.१.१) ह्या संकेतस्थळावर इतर मराठी संकेतस्थळावरील चर्चा / वाद / विसंवाद / मतभेद आदी बाबींचा संदर्भ घेऊन त्याची टिप्पणी करणे व इथे त्यावरुन वादंग माजवणे ह्याला मनाई आहे. ह्याच धोरणाला अनुसरुन इतर संकेतस्थळावरचे अनावश्यक संदर्भ असलेले प्रतिसाद त्वरित अप्रकाशित करण्यात येतील.

४.१.२) सभासदत्व घेताना दिलेली कोणतीही माहीती खोटी अथवा चुकीची आहे हे सिध्द झाल्यास.

४.१.३) सभासदाने अन्य सभासद / वाचक अथवा अन्य कोणतीही सन्माननीय व्यक्ती, पक्ष, संघटना, जाती, धर्म, विविध धर्मातील देव देवता, भारताची राज्यघटना, राष्ट्रगीत, राष्ट्राची मानचिन्हे, राष्ट्रध्वज, राष्ट्रपुरुष, श्रध्दा व संकेतस्थळ (मराठीसृष्टी डॉट कॉम) ह्याबाबत उपमर्दकारक, अवमानकारक अथवा द्वेषमुलक किंवा भावना भडकवणारे अथवा चिथावणी देणारे लिखाण केल्यास अथवा अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केल्यास अथवा अशा कृत्यांना प्रोत्साहन दिल्यास.

४.१.४) एखाद्या सदस्याने अन्य सदस्यांना खोटी आश्वासने देऊन अथवा भुलथापा मारुन फसवणूक अथवा आर्थिक गैरव्यवहार केल्यास.

४.१.५) स्त्री सदस्यांशी सामाजिक संकेत व सभ्यता यांना धरून नसणारे संभाषण, वा अन्य कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केल्यास अथवा त्यांच्या भावना दुखावतील असे कृत्य केल्यास त्या संबधित स्त्री सदस्यांने सबळ पुरावे दिल्यावर कोणतीही चौकशी न करता सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याचे सर्व अधिकार संकेतस्थळाचे असतील.

५] साहित्यलेखन

संकेतस्थळावर सदस्यांने सादर केलेले लिखाण / छायाचित्रे / नकाशे / प्रतिक्रिया / प्रतिसाद / व्यक्तीगत निरोप / कथा / कविता ह्या प्रकारचे लिखाण व अन्य कोणत्याही प्रकारचे लिखाण अथवा कोणत्याही प्रकारे सादर केलेली माहीती (ह्यापुढे ह्याला साहित्य असे संबोधले जाईल) या बाबतची धोरणे;

५.१) स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मराठीसृष्टी डॉट कॉमवर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मराठीसृष्टी डॉट कॉमच्या सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा. सदस्याने सादर / प्रकाशित केलेल्या साहित्याच्या सत्यतेची संपूर्ण जबाबदारी सदस्याची असेल व ह्याबाबत मराठीसृष्टी डॉट कॉम जबाबदार नसेल.

५.२) सदस्यांनी सादर केलेले साहित्याचे मुद्रण अथवा पुर्नमुद्रण / कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क सदस्यांचे व केवळ त्या सदस्यांचे असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास ते साहित्य वापरण्यासाठीचे हक्क संबंधित सदस्याकडे असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी सदस्यांची असेल व ह्यासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

५.३) सदस्यांचे साहित्य संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर सर्व मुद्रणाधिकार / प्रताधिकार/ पुर्नमुद्रण अधिकार आदी सर्व अधिकार त्या सभासदाचेच राहतील. मात्र मराठीसृष्टी डॉट कॉम च्या स्वत:च्या कोणत्याही उपक्रमांसाठी हे लिखाण वापरण्याचे हक्क मराठीसृष्टी डॉट कॉम स्वत:कडे सुरक्षित ठेवत आहे. मराठीसृष्टी डॉट कॉम द्वारे प्रकाशित होणारी पुस्तके / इ-बुक्स / नियतकालिके / इतर वेबसाईटस यामध्ये हे लिखाण वापरण्याची मुभा मराठीसृष्टी डॉट कॉमला असेल.

५.४) संकेतस्थळावर प्रसिध्द अथवा प्रकाशित केलेल्या साहित्यामुळे होणार्‍या कायदेशीर परिणामाची जबाबदारी संबधित सभासदाची असेल. ह्या बाबत मराठीसृष्टी डॉट कॉम संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाची कुठल्याही प्रकारे जबाबदारी नसेल.

५.५) सभासदत्व रद्द अथवा स्थगित झाल्यावर संकेतस्थळावरील साहित्य मिळवण्याचा सभासदाचा अधिकार ही रद्द अथवा स्थगित करण्यात येईल.

५.६) सभासदांचे वरील सर्व अधिकार लक्षात घेऊन सुध्दा कोणतेही आक्षेपार्ह साहित्य कोणत्याही आणि संबधित सभासदाला न विचारता अप्रकाशित करण्याचे अधिकार मराठीसृष्टी डॉट कॉमकडे राहतील व ह्या बाबतची कार्यपध्दती निश्चित करण्याचे व तिच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार मराठीसृष्टी डॉट कॉमचे असतील.

५.७) एखाद्या सदस्याचे सदस्यत्व जर रद्द अथवा स्थगित झाले तर वर उल्लेखलेल्या धोरणांशी सुसंगत असलेले त्याने प्रकाशित केलेले साहित्य संकेतस्थळावर तसेच राहील.

६] मराठीसृष्टी डॉट कॉमची मांडणी त्यावर वापरण्यात येणारी प्रणाली / मोड्युअल / स्क्रिप्ट / तांत्रिक व अन्य सुविधा वाढवण्याचे अथवा बंद करण्याचे सर्व अधिकार मराठीसृष्टी डॉट कॉमकडेच राहतील. तसेच मराठीसृष्टी डॉट कॉमवर सध्या वापरण्यात आलेल्या पायाभुत सुविधा व सभासदांसाठी असलेल्या सुविधा सध्या सायबरशॉपी, गमभन, इंटरपोल सोल्युशन्स इत्यादिंच्या सौजन्याने पुरवण्यात येत आहेत ह्याची नोंद घ्यावी.

७] मराठीसृष्टी डॉट कॉमच्या सर्व सदस्यांकरता सर्व स्थानिक कायदे बंधनकारक असतील. सदस्यानी दिलेली माहिती पोलिसांनी कुठल्याही तपासाकरता मागितल्यास पुरवण्यास संकेतस्थळ बांधिल आहे, याची नोंद घ्यावी.

८] ह्या संकेतस्थळाचा वापर सदस्यांनी त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर करावयाचा असून कुठल्याही प्रकारच्या नुकसानीला / तोट्याला / अडचणीला मराठीसृष्टी डॉट कॉम जबाबदार असणार नाही. संकेतस्थळावर पुरवण्यात आलेल्या सर्व सुविधा as is, where is बेसिस वर पुरवण्यात येतील.

९] तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळावरील साहित्य नष्ट झाल्यास, गहाळ झाल्यास, गायब झाल्यास अथवा त्याचे विकृतीकरण झाल्यास मराठीसृष्टी डॉट कॉम जबाबदार राहणार नाही. तसेच संकेतस्थळावरील ताण नियंत्रित करण्यासाठी साहित्य अथवा माहिती नष्ट करण्याचे अथवा खोडण्याचे सर्व अधिकार मराठीसृष्टी डॉट कॉम कडे राहतील, शक्यतो असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी सदस्यांना सुचना देण्याचा प्रयत्न केला जाईल.

१०] मराठीसृष्टी डॉट कॉमवर साहित्य प्रकाशित करताना सदस्यांने अन्य संकेतस्थळे / स्त्रोत / प्रणाली / दुवे ह्याचा वापर केल्यास तो वापर संबधित सदस्य व संबधित संकेतस्थळ / प्रणाली / स्त्रोत्र / दुवे ह्यांचे मालक ह्यांच्यातील संबधानुसार असेल व त्यासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम जबाबदार नाही.

११] वरील पैकी कोणतेही धोरण / नियम एखाद्या विवक्षित स्थळी गैरलागू ठरत असल्यास तेवढा भाग वगळता ऊर्वरित सर्व भाग सदस्यांना बंधनकारक राहील.

१२] मराठीसृष्टी डॉट कॉम व सदस्य ह्यांच्यातील संबध हे ठाणे, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत येथे अस्तित्वात असलेल्या व भविष्यात जसजसे अस्तित्वात येतील तसतसे कायद्याच्या आधिन असून सभासदत्व व अन्य संदर्भातील सर्व कायदेशीर प्रकरणे ठाणे येथील स्थानिक न्यायालयाच्या कार्यकक्षेखाली येतील.

१३] मराठीसृष्टी डॉट कॉमच्या मालकीचे ट्रेडमार्क / लोगो / बोधचिन्हे व सुविधा ह्यांचे सर्वाधिकार संकेतस्थळाकडे राहतील व त्यांच्या गैरवापराकरता कायदेशीर कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार मराठीसृष्टी डॉट कॉमकडेच राहतील.

१४] मराठीसृष्टी डॉट कॉमच्या नोंदणीकृत सभासदाला स्वतःचे साहित्य प्रकाशित करणे व अन्य सभासदांशी संपर्क साधणे, परस्पर सहकार्याचे, सामजंसाचे व विश्वासाचे वातावरण पुरवणे व त्यासाठी योग्य त्या सोयी पुरवणे ह्याची हमी मराठीसृष्टी डॉट कॉम देते.

१५] मराठीसृष्टी डॉट कॉमचा सदस्यांशी असलेले सहकार्य व सामजंस्य खालील परिस्थितीत बंद होऊ शकते;

१५.१) सदस्यांचे सभासदत्त्व स्थगित अथवा रद्द झाल्यास.
१५.२) सदस्याने सभासदत्त्व रद्द / बंद केल्यास.
१५.३) सदस्याने सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याची विनंती केल्यास.
१५.४) मराठीसृष्टी डॉट कॉमला तात्पुरती अथवा कायमस्वरुपी हानी झाल्यास.
१५.५) मराठीसृष्टी डॉट कॉमचे मालकी हक्कांची विक्री / हस्तांतरण / भागीदारी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे बदल झाल्यास.
१५.६) कोणत्याही कारणाने मराठीसृष्टी डॉट कॉम बंद झाल्यास.

१६] वरील सर्व नियम व धोरणे लक्षात घेऊन व त्याचा मतितार्थ ध्यानात ठेऊन देखील मराठीसृष्टी डॉट कॉमची ध्येय, उद्दिष्टे व नियम कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही व कोणत्याही प्रकारे बदलण्याचे हक्क मराठीसृष्टी डॉट कॉम व्यवस्थापनाचे राहतील.