नवीन लेखन...

मी न काही भुललो

तू माळल्या बकुळीचा गंध अंतरात दरवळतो अजुनही आली कित्येक बेधुंद वादळे स्मरण तुझे अंतरी अजुनही सारेसारे आजही तसेच आहे मी न काही भुललो अजुनही जिथे जिथे जाते नजर माझी तुझेच ते ध्यासभास अजुनही तूच रुजलिस अशी हृदयांतरी स्पंदनी चैतन्य तुझेच अजुनही ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०३ २४/११/२०२२

आठव

तुझे हास्य मधुरम लाघवी शमविते या विरह वेदनांना मी आजही जगतोच आहे आठवित तुझ्या आठवांना झुळझुळती शब्द अबोली जागवीती अंतरी भावनांना उमलुनी येते एकेक कविता शमविते अंतरीच्या वेदनांना शब्दा शब्दात तुझे प्रसवणे जाणवते अक्षरात गुंफताना उमजतो मौन मी अंतरातले आठवीत तुझ्याच आठवांना ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०२ २३/११/२०२२

विठ्ठलविठ्ठल

दिंडीत वैष्णवांच्या धावघावती पाऊले या लोचनी एकची परब्रह्म उभे सावळे… नादात टाळमृदंगाच्या सारे विठ्ठलनामी रंगले तनमन विठ्ठल विठ्ठल सारे वाळवंटी रमलेले… शुन्यात सत्य ब्रह्मरूप विटेवरी रुपडे सावळे राऊळ, गाभारी त्राता अंत:पुर! उद्धारलेले… देवा नको रे येणेजाणे मन तुझ्यात रे तृप्तले संतत्वात तुझीच साक्ष ब्रह्मानंदी आत्म दंगलेले… — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र.३०१ २२/११/२०२२

काव्य हा साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार

वाङ्गमय निर्मितीला प्राचीन परंपरा आहे. अनेक प्रकारचे वाङ्गमय सर्वश्रुत आहे..कुठल्याही राष्ट्राची आद्य ओळख म्हणजे तेथील संस्कारीत साहित्य . प्राचीन संस्कृत साहित्य म्हणजे भारतभूमिचा विशाल , अथांग सागर असलेला साहित्यसंस्कारीत वारसा आहे . या साहित्य संस्कारांची शास्रीय , प्रतिभावंत परंपरेची महनीयता ही आद्य कवी व्यासांच्या समर काव्यापासून मानली जाते . अशा सहित्यश्रुंखलेची व्याप्ती प्रचंड आहे . संस्कृत […]

विश्वरूप

कोमल वेलिवर कळीने उमलावे फुलुनी फुलावे गंधुनी गंधाळावे… प्रसन्न चराचरी मनमन दरवळावे नेत्री विठ्ठलविठ्ठलु भक्तितुनी पाझरावे… परब्रह्म ते सावळे गाभारी प्रकट व्हावे कृतार्थ आत्मरूप विठ्ठल चरणी रमावे… विश्वरूप ते गोजीरे टाळमृदंगात भजावे दिंडीपताका वैष्णवी शिरी धरूनी नाचावे… ****** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०० २१/११/२०२२

तुझा बाबा

झोपेतून उठताच बाबा बाबा करी हाती माझ्या आहे तुझ्या पाळण्याची दोरी रडू नको बाळा तुला देतो मी झुला आभाळाच्या उंची वरी नेतो मी तुला तेथूनच बाबा ला तू न्याहाळत रहा हाता मध्ये आहे त्याच्या खेळणी पहा…. ना ना ना ना ना ना…. ना ना ना ना ना ना…. उगी उगी बाळा आता थांब ना तू जरा […]

गृहीणी

ती च्या भोवती त्या चं अस्तित्व असतं अनेक नात्यांना गुंफत घर तीचं सावरतं असतं म्हणुनच ती चं नाव गृहीणी असं असतं सारं कुटुंब त्यांच्याच कायम ऋणात असंतं ज्यांचं नाव गृहीणी असतं त्यांच्या अंगी वास्तल्य वसतं गृहीणी आहे म्हणुनच कायम घराला घरपण असतं त्यांच्या अस्तित्वामुळेच वसुधैव कुटुंम्बकम् असतं — उमेश तोडकर

शल्य

आता सारेच नावापुरते आस्था आपुलकी नाही हास्य केवळ तोंड देखले मनस्वी खरा आनंद नाही ” या, या, कसे आहात ? बरेच दिवसात गाठ नाही सारे काही ठीक आहे नां ? शब्दात या कुठे प्रेम नाही सारेच आता भावशून्य ओढ अंतरी उरली नाही भावनांचीच पायमल्ली नाती तशी उरली नाही दिवस येतो आणि जातो आपले कुणी वाटत नाही […]

अस्तित्व

खरं तर प्रत्येकाच एक विशिष्ठ अस्तित्व असतं आत्मसन्मान जपताना जीवनच पणाला लागतं जगतानाही खरं तर कुणीच कुणाचच नसतं सारी नाती व्यवहारिक हे सर्वत्र जाणवतं असतं सोबती सुखाचे असतात दुःखात तसं कुणी नसतं प्रत्येकाचे संचित वेगळे प्रारब्ध भोगायच असतं मन संवेदना सारख्याच सारं काही सोसणं असतं काही किती जरी लपवलं सत्य ! समोर येतच असतं ******** — […]

चैतन्य

**** बरस बरसला घन रिमझिमल्या धारा चंद्र नभीचा भिजला सुस्नात झाली वसुंधरा धुंद सुगंध मृदगंधला सभोवती दरवळणारा श्वासात श्रावण श्रावण पवन तो झुळझुळणारा जीवास चाहुल तृप्तिची सुखावितो विंझणवारा सृष्टित साक्ष चैतन्याची साक्षात स्वर्ग भुलविणारा ******* — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २९७ १९/११/२०२२

1 2 3 417
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..