नवीन लेखन...

वटपौर्णिमा (कथा)

मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस […]

तुकोबा

तुका…..! युगे युगे गुलामगिरीत जगलेल्या, अन माणसालाच जनावर बनवुन, त्यांच्यावर अंमल करणार्‍या, वर्णवादी व्यवस्थेवर आसुड ओढुन, तु तुझ्या अभंग ओव्यांनी, येथील भुमिपुत्रांच्या मेंदुवरील, जळमट पाश काढुन, तु माणसाला माणसात आणलं…! गारूड केलं तुझ्या ओव्यांनी, ईथल्या जनसामान्यावर…! झाडा पाखरांत रमणारा तु, आडाणी देवभोळ्या समाजाचे शोषण बघुन व्यथीत झाला, आणि त्यांच्या देवालाच, आव्हाण देऊ लागलास, तेंव्हा मात्र हादरली […]

पाटलाचा वाडा

गावाच्या खालतुन सोंडु पाटलाचा चिरेबंदी वाडा लय दिमाखात उभा व्हता.सोंडु पाटील मंजे मुलखातली नामीगिरामी आसामी व्हता.तरूणपणात बारा गावचे आखाडे पाटलानं आपल्या खिशात घातले व्हते.घरी शंभरक एकर जमीन,दहा बारा बैल जोड्या,पाच पंचेविस दुभते जनावर आन पन्नासेक एकर फळबाग आसा गड्याचा जुमला व्हता. […]

आंधळी गोफण

आंधळी गोफन…! घेऊन पोटी गारगोटी, फिरे आंधळी गोफनं, कोणा हेरे गारगोटी, काय कोणालं मालुम…! गारी गारीवर लिहलेलं, तिच्या सावजाच नांव, गर गर घुमे आसमंती, घेया सावजाचा ठाव….! फीरे आंधळी गोफन, तिचा ठाव सायंऽ सायंऽ, कोण कुठे ते पारध, ना ही कुणा ठाव काय….! ती तं आंधळी गोफन, तिचा आंधळाच नेम, येई जो ही सपाट्यात, आंधळ्या आयुधाचा […]

सोनं येचितो मातीत….

सोनं येचीतो मातीतं…. सोनं येचतो मातीतं… संगणीच्या संगतीतं… मोती घामाचे पिकवितो… काळी मायच्या कुशीतं…. पशु पक्षी वृक्षवल्ली काळ्या मायची लेकरं सार तिच गणगोतं तिलं सृष्टीचा संसारं…. पिकं शेतात डोलते पाना फुलांनी सजते फुले काळीज बळीचं मनं हारखुन जाते….. मका पोटुशी पोटुशी… डोकं जवारी काढते… गहु मिशांना ताविते… फुलं सुर्याच डोलते… पक्षी झाडाशी बोलती, गाय गोठ्यात हंबरी, […]

वारूळ…

रच रचले वारूळ, कण मातीचे येचुन, मुंगी संसार थाटते, मुंगोबाच्या संगतीनं….! मुंग्या कामावरं जाती, शिस्तीत परेड काढती, वरसाचा अन्नसाठा, कण कणं साठवती. राणी मुंगीच शासन, गजबजेल वारूळं, प्रजा सैन्य नी कामगार, राणी करते संभाळ. तिचा ईलुसाच जिव, ईलुसे वारूळाचे जग, उन,पाऊस नि वादळं, त्यातही धरीते ती तग. आपत्ती येती आणि जाती, कित्येक सभ्यता संपविती, लाखो सालाची […]

वेट लॉस तमाशा…

शेजारचा कुचळ आगलाव्या मला ट्रॅक सुटवर घराबाहेर पडतांना बघुन म्हणाला.हा आगलावे म्हणजेना,एक नंबरचा डॅंबिस मानुस…कधीही सरळ बोलणार नाही.ह्याच स्वतःच्या घरच्यापेक्षा ईतरांच्याच घरात जास्त लक्ष असत.अगदी ह्याचा एक कान शेचजार्‍याच्या भिंतीला कायमच चिकटलेला असतो. […]

शिकार

चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच […]

खेड्यातले येडे

लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं. […]

प्रवास

नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..