नवीन लेखन...

फिरकीच्या तालावर!

टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडीयाला अपशकून करणार्या इंग्लंड संघाचा पुरेपूर बदला घेत टीम इंडियाने विश्वचषकाकडे अंतिम पाऊल टाकले आहे. कर्णधार रोहीतने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखत इंग्लंडला आपल्या बॅटचे पाणी पाजले तर गोलंदाजीत अक्षर, कुलदीप द्वयीने अक्षरशः धुमाकूळ घालत इंग्रजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. […]

सात आश्चर्ये

एका शाळेमध्ये एकं शिक्षिका आपल्या वर्गातल्या मुलांना जगातील सात आश्चर्ये काय आहेत ते लिहायला सांगते. सगळी मुले बहुतांशाने अशी यादी बनवतात. १. ग्रँड कॅनियन २. ग्रेट वॉल ऑफ चायना ३. पनामा कॅनाल ४. ताज महाल ५. एम्पायर स्टेट बिल्डींग ६. पिरामिडस ऑफ इजिप्त ७. सेंट पिटर्स बॅसिलिका सगळ्या मुलांच्या वह्या तपासून झाल्यावर शिक्षिकेच्या लक्षात येते की […]

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज

“पर्यावरणाचा र्‍हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय “. या र्‍हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात.
पर्यावरण र्‍हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो . […]

ध्यानधारणा

दुदैवाने एक दिवस आश्रमात ध्यानधारणा चालू असताना एक मांजर खारीपाशी गेली आणि तिने तिला खाऊन टाकले. ते पाहून सगळेच हळहळले. रमण महर्षिंनी तिच्या पिल्लांना मायेने उचलून एका पिंजऱ्यात ठेवले. तो पिंजरा उपासनेच्या कक्षात ठेवला ज्यायोगे त्या पिल्लांवर उपासनेच्या दरम्यानही लक्ष ठेवता येईल. […]

कांगारूंचे गर्वहरण

सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला आहे. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे. […]

प्रार्थनेचे सामर्थ्य

वाणी तिच्याकडे नखशिखांत पहातो. ती बाई तशी फाटकीच दिसत असते. हिचा नवरा लवकर बरा नाही झाला किंवा आजारपणातच दगावला तर माझे पैसे परत मिळण्याची काहीच शक्यता नाही असा विचार करुन तो त्या बाईला फटकारतो. “माझ्या दुकानाच्या बाहेर हो. तुला मी काही देणार नाही. तू माझे पैसे परत करु शकशील असे मला वाटत नाही.” […]

जोडीदार

एक दिवस सकाळी बायको नवऱ्याला नाश्ता देत असते. नवरा नाश्ता खाता खाता तिला शांतपणे म्हणतो “मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आपले नाते आता शिळे झाले आहे. माझे माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे.” […]

त्या रात्रीचा थरार

माणसाचं मन असंच असतं. प्रसंगी आकाशात झेपावणाऱ्या गरूडापुढे झेपावते तर कधी जमिनीवरून सरपटणाऱ्या सापासारखे जमिनीवरून सरपटते. सर्कशीतल्या वाघाला एका चाबकाच्या फटकाऱ्या बरोबर नाचायला लावणारे माणसाचे मनं एखादी पाल अंगावर पडली तरी क्षणात थरथरते. […]

हे चित्र कधी बदलणार ?

गोष्ट एका सर्व सामान्य गरीब बाईची आहे. ती इंडोनेशियामध्ये केळीच्या बागेमधून काम करायची. एकदा बागेच्या मालकाने तिला केळी चोरताना पाहिले. त्याने तिच्या विरुध्द कोर्टात दावा गुदरला. […]

लेबल

एका मुलाच्या शाळेतून पालकांना चिठ्ठी येते. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिकांने येऊन भेटायला सांगितले असते. आई वडील शाळेत जातात. मुख्याध्यापिकांना भेटतात. त्या पालकांना सांगतात “तुमचा मुलगा स्लो लर्नर आहे. त्याला तुम्ही दुसऱ्या शाळेत घाला. […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..