नवीन लेखन...

ओळख मूलांकाची – मूलांक ९

मूलांक ९ ची सविस्तर माहिती:
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व मूल्यांक वरून ओळखले जाऊ शकते. प्रत्येक मूल्यांकाची स्वतःची खासियत असते. मूल्यांक ९ चे लोक कसे असतात ते जाणून घेऊया अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूल्यांकबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मूल्यांकाचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट केले आहे. मंगळाच्या प्रभावामुळे ९ व्या क्रमांकाचे लोक इतरांपेक्षा वेगळे असतात. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टींनी त्याला इतरांपेक्षा वेगळे केले. अंकशास्त्रात, ९ मूल्यांक असलेल्या लोकांना खूप महत्त्व दिले गेले आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला होतो, त्यांची मूळ संख्या ९ आहे.

या अंकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. यामुळे हे व्यक्ती रुबाबदार असतात. यांच्या आवाजात एक भारदस्तपणा असतो.
स्वामी ग्रह: मंगळ (धाडस, ऊर्जा आणि कृतीचे प्रतीक)

स्वभाव-
उत्साही आणि धाडसी: अत्यंत ऊर्जावान, धाडसी आणि कष्टाळू असतात रागीट: त्यांना लवकर राग येतो, पण तितक्याच लवकर शांतही होतात. भावनिक तीव्रता: कठीण काळातही जिद्द न सोडणारे, लढवय्ये असतात स्पष्टवक्ते: जे मनात आहे ते बोलून दाखवतात, खोटेपणा आवडत नाही. या लोकांचा स्वभाव आक्रमक, जिद्दी, शिस्तप्रिय आणि संयमी असतो. त्यांच्या स्वभावात विनम्रता नसते. कट-कारस्थानं न करण्याचा स्वभाव असतानाही कोरडय़ा स्वभावामुळे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. व्यापक दृष्टिकोनाच्या अभावामुळे मूलांक ९च्या व्यक्ती इतरांना सहज माफ करत नाहीत तसंच माफी मागायलाही त्यांना जमत नाही. पण इतरांना साहाय्य करण्याची यांची मानसिकता असते. प्रेमाच्या बाबतीत प्रामाणिक पण रागीट स्वभावामुळे काहीवेळा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत प्रामाणिक पण रागीट स्वभावामुळे काहीवेळा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

व्यक्तिमत्व-
यांचे व्यक्तिमत्व खूपच तेजपूर्ण आणि ऊर्जायुक्त असते. कठोर परिश्रमांना ते घाबरत नाहीत. यांची संकल्पशक्ती खूपच प्रबळ असते. यांच्यात आक्रमकपणा आणि क्रोध सहज दिसतो. संतापावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. चलाखपणा त्यांना जमत नाही. दूरदृष्टी त्यांच्यात क्वचितच आढळते. मूलांक ९ हा सत्ता, शक्ती, शौर्य आणि साहसाचा अंक आहे. शासन आणि प्रशासकीय प्रवृत्ती त्यांच्यात सहज आढळते. ते सहज संतापतात आणि भाषेवरचं नियंत्रण गमावून बसतात. पण नंतर लगेच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्नही करतात. इतर लोक यांच्या कठोर इच्छाशक्तीला अहंकार समजतात, परिणामी त्यांना खूप शत्रू निर्माण होतात.

उर्जावान आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात मुळांक ९ चे जातक जीवनात राहतात उर्जावान-
मंगळला तेजपुंज ग्रहाचा प्रतीक मानले गेले आहे. यामुळे मुळांक 9 असलेल्या लोकांवरही याचा प्रभाव दिसते. हे लोक अत्यंत उत्साही आणि उर्जावान असतात. आपले आयुष्य अगदी मजेत आणि उत्साहात जगतात.

प्रभावी व्यक्तिमत्त्व-
मंगळ ग्रहाप्रमाणे या जातकांचे व्यक्तिमत्त्व ओजपूर्ण असते. हे लोक शरीराने सुदृढ आणि उंच असतात. यांच्या आवाजात भारदस्तपणा आणि रुबाब असतो. यांच्या एका आवाजाने लोक आहे त्या जागेवर थांबतात.

संकटात लढण्यास सक्षम-
मुळांक ९ असलेले लोक धाडसी असतात. यांना कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज राहतात. लवकर समस्येतून मार्ग काढतात. शरीर आणि मनाने बलशाली राहतात मुळांक ९ असलेले जातक शारीरिक आणि मानसिक स्तरावर बलशाली राहतात. हे लोक मोठ्यातील मोठे काम चुटकीसरशी करतात. या लोकांवर मंगळ ग्रह तसेच हनुमानाचा आशीर्वाद राहतो.

लवकर येतो राग-
मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे या लोकांना लवकर राग येतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरही भडकतात आणि या कारणामुळे अनेकदा वादालाही सामोरे जावे लागते. थोड्या वेळाने शांतही होतात. झालेले वाद विसरून जातात.

सिद्धांताचे पक्के-
या लोकांचे स्वतःचे काही कायदे आणि नियम असतात. हे प्रामाणिकपणे नियमांचे पालन करतात. हे अत्यंत शिस्तप्रिय असतात. यांना चुकीच्या गोष्टीला सहमत होणे अजिबात आवडत नाही. कोणाचाही हक्क हिरावून घेत नाहीत.

आर्थिक स्थिती परिवर्तनशील-
या जातकांच्या आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार येत-जात राहतात. या लोकांकडे पैसा भरपूर असतो परंतु खर्चही जास्त करतात. यामुळे सेव्हिंग कमी होते. तरीही यांच्या भाग्यामुळे यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळते. यामुळे यांची आर्थिक स्थिती चांगली राहते.

बालपणात सुख मिळत नाही मंगळ ग्रहामुळे यांच्या बालपणात अनेक अडथळे निर्माण होतात. कधीकधी यांचे शिक्षणही अपूर्ण राहते. कुटुंबाकडूनही जास्त प्रेम मिळत नाही. भावंडांसोबत यांचे फारसे जमत नाही. हे जातक नातेवाईकांच्या सांगण्यावरून कळत-नकळतपणे भावंडाना मदत करतात.

संबंधामध्ये अस्थिरता –
हे लोक आपल्या सिद्धांतामध्येच मग्न राहतात. यांच्यासाठी यांचा स्वाभिमान मोठा असतो. यामुळे लग्नानंतर यांचे गृहस्थ जीवन व्यवस्थित चालत नाही. यांना मुलांकडूनही जास्त सुख मिळत नाही. या मूल्यांकाचे लोक कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यात निपुण असतात. या मूल्यांकचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती करतात. ते कामाच्या ठिकाणी त्यांच्या कौशल्य आणि क्षमतांनी सर्वांना प्रभावित करतात. आपल्या प्रतिभेच्या जोरावर हे लोक आपल्या करिअरमध्ये उच्च पदे मिळवतात. हे लोक स्वभावाने खूप कलात्मक असतात. ९ मूल्यांकाच्या व्यक्तींना कला आणि विज्ञानामध्ये खूप रस असतो. हे लोक आर्थिकदृष्ट्या खूप समृद्ध आहेत पण ते तितकेच काटकसर देखील आहेत. हे लोक खूप मोकळे मनाचे असतात. त्यांची चांगली वागणूक, उच्च शिक्षण आणि उत्कृष्ट काम यांच्या जोरावर त्यांना खूप सन्मान मिळतो. हे लोक नेहमीच धोका पत्करण्यास तयार असतात

या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते –
त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. हे लोक जीवनात खूप पैसे कमावतात, त्यांच्याकडे जमीन आणि संपत्तीही भरपूर प्रमाणात असते. ते स्वत:च्या मेहनतीवर अवघं साम्राज्य उभं करतात. हे लोक बराच जमीन-जुमला आणि संपत्ती खरेदी करुन ठेवतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना आर्थिक लाभ मिळतो.

शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात-
९ मूलांकाचे लोक उच्च शिक्षण घेतात, ते शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात. कोणताही विषय आत्मसात करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची असते. हे लोक शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात आणि चांगलं शिक्षण घेतात.

यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो-
यांचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे या जन्मांक ९ असणाऱ्या व्यक्ति मानवतावादी, दयाळू आणि क्षमाशील असतात. त्यांच्याकडे समाजाच्या भल्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि आदर्श असतात. या व्यक्ति नम्र आणि निस्वार्थी असतात. इतरांच्या भल्यासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. ते उदारहृदयी असतात आणि आपल्याकडे जे कांही आहे ते इतरांना देण्याची त्यांची वृत्ती असते. आपल्या भोवतालच्या लोकांबद्दल त्यांना प्रचंड प्रेम असते आणि त्यांची काळजी वाहण्याची या व्यक्तींची प्रवृत्ती असते.

यांच्याकडे प्रचंड सहनशक्ती असते. तसेच त्यांच्याकडे कल्पनाशक्ती आणि नवनिर्मिती हे गुणही असतात. हे जास्तच आध्यात्मिक असतात. त्याचप्रमाणे यांचा ऑकल्ट सायन्सेस (गूढ विद्या) कडे ओढा असतो. मोठे प्रोजेक्ट, मोठ्या व अवजड उद्योगात, जमिनीशी संबंधित उद्योगात यांना मोठे यश मिळते. या व्यक्ति कला, साहित्य, संगीत इत्यादी क्षेत्रातही आपला ठसा उमटवू शकतात.

लकी करिअर्स-
सैन्य अधिकारी, आर्किटेक्चर, फॅशन डिझायनिंग, मोठा व्यवसाय, इंजिनिअरिंग, मेडिको, रियल इस्टेट (कन्स्ट्रक्शन,इन्व्हेस्टमेंट) अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार तापट असतात, यांना कुठल्याही गोष्टीचा राग एकदम पटकन येतो आणि त्यावरुन ते समोरच्यावर लगेच भडकतात. नेहमी नाकाच्या शेंड्यावर राग असतो
या जन्मतारखेच्या लोकांचं व्यक्तिमत्व इतकं खास असतं की आपली वेगळी ओळख हे निर्माण करतात. तसेच, हे लोक आपल्या मूलभूत स्वभावानेच लीडर असतात. हे लोक कधीच कोणावर अवलंबून राहत नाहीत. त्यामुळे हे लोक कोणत्याही टीममध्ये असले तरी हे नेतृत्व आपल्या हाती घेतात.

या जन्मतारखेचे लोक इतरांना मदत करतात पण त्यासाठी ते आपली पद्धत वापरतात. यांचं राहणीमान आत्मनिर्भर असते. तसेच, आपल्या मूल्यांशी हे फार तटस्थ असतात. मूलांक ४ असणाऱ्या लोकांबरोबर यांचं जास्त पटत नाही. यामुळेच या जन्मतारखेचे लोक फार वेगळ्या विचारसरणीचे असतात. तसेच, त्यांच्या व्यवहारात एक प्रकारची अदब पाहायला मिळते.

शुभ दिवस: मंगळवार, रविवार, सोमवार शुभ रंग: लाल, गुलाबी, मरूनभाग्यशाली तिथी- प्रत्येक महिन्याची ३, ६, ९, १२, १५, १८, २१, १४, २७ आणि ३० तारीख तुमच्यासाठी शुभ आहे. भाग्यशाली दिवस- प्रत्येक आठवडय़ातील मंगळवार आणि गुरुवार तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत. पुढे पहा शुभ रंग, भाग्यशाली वर्ष, शुभ अंक आणि भाग्यशाली दिशा
शुभ रंग- ऑरेंज रंग तुमच्यासाठी अतिशुभ आहे. याशिवाय पिवळा, गुलाबी, क्रीम व सफेद रंग शुभ आहेत. महत्त्वपूर्ण कामांसाठी लाल रंगाचा वापरही शुभ ठरेल. भाग्यशाली वर्ष- ९, १२, १५, १८, २१, २४, २७, ३०, ३३, ३६, ४२, ४५, ५१, ५४ आणि ६० वे वर्ष तुमच्यासाठी महत्वपूर्ण आणि भाग्यशाली ठरतील. बंधांसाठी शुभ अंक- मूलांक ३ आणि ४ यांच्याबरोबर तुमचे चांगले सामंजस्य राहील. मूलांक १, ४ आणि ८यांपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. भाग्यशाली दिशा- दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिशा तुमच्यासाठी शुभ ठरतील. भाग्यशाली देव- मंगळ, भूमी, सूर्य आणि शक्ती यांच्या उपासनेपासून तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. श्रावणात शिव आणि शक्तीची आराधना केल्यास तुमची खूप उन्नती होईल.

भाग्य रत्न- मूंगा आणि माणिक हे आपले भाग्य रत्न आहे. ५-५ कॅरेटच्या वजनाची रत्ने सोन्यात धारण करा. मानसिक शांतीसाठी चांदीमध्ये मोती धारण करणे चांगले राहील

कल्याणकारी मंत्र –
ॐ अंगार काय नम
ॐ हौं जूं स
ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मै नम

कल्याणकारी उपाय-
संकटांपासून वाचण्यासाठी दर सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. प्रश्नणायाम करावा. दररोज मातीच्या भांडय़ात तूपाचा दीवा लावा. चांदीचा चमचा वापरावा. स्टील आणि लोखंडाच्या चमच्यांचा वापर कमीतकमी करा.

लकी नंबर्स –
९ हा एक आणि ज्यातील अंकांची बेरीज ९ येते असे नंबर्स. (उदा. 3456= 3+4+5+6= 18=1+8= ९, म्हणून ३४५६ हा जन्मांक ९ असणाऱ्या व्यक्तींसाठी एक लकी नंबर आहे). सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
३, ६, ९, २, ५, ७ विसंगत नंबर्स (Incompatible Numbers) ४, ८ लकी वेहिकल नंबर – १००८ मूलांक ९, वार्षिक भविष्य २०२६ आर्थिक बाबतीत मूलांक ९ च्या जातकांसाठी २०२६ हे वर्ष समाधानकारक ठरेल. उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. करिअरमध्ये प्रगती झाल्याने पैशाचा ओघ वाढलेला जाणवेल. बँक बॅलन्स मजबूत होईल आणि त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास येईल. अंकशास्त्रानुसार मूलांक ९, असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष करिअरमध्ये प्रगती आणि शुभलाभ घेऊन येणार आहे. तुमच्या नेतृत्वक्षमतेमध्ये आणि आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. कार्यक्षेत्रात धाडसी आणि ठाम निर्णय घेतल्यास चांगला लाभ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असून धनलाभाचे प्रबळ योग दिसत आहेत. लव्हलाइफमध्ये रोमान्स वाढेल आणि जोडीदाराला जास्त वेळ देणार आहात. वैवाहिक जीवनातही सामंजस्य आणि प्रेम अधिक असून नातेसंबंध अधिक दृढ होतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. 2026 मध्ये तब्येत ठिक असेल पण आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी आत्म-पूर्ती आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. हे वर्ष शेवट आणि सुरुवात दोन्हीचा संगम दर्शवते. ९ हा अंक एका चक्राचा अंतिम अंक आहे. याचा अर्थ असा की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पेरलेले बीज आता स्पष्ट परिणाम देईल. हे वर्ष तुम्हाला शिकवेल की भूतकाळ सोडून देणे आणि भविष्याला स्वीकारणे हे जीवनातील सर्वात मोठे धैर्य आहे. तुम्हाला हे समजेल की काही नातेसंबंध, काम किंवा कल्पना आता तुमच्या जीवनासाठी आवश्यक नाहीत. म्हणून, आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःला सोडून द्या, थोडी जागा मोकळी करा आणि तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा भरा. हे वर्ष तुमच्या आयुष्यात सखोल भावनिक समज, मानवी संवेदनशीलता आणि आत्म-सशक्तीकरण आणेल. तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी देखील प्रेरणास्थान बनू शकता. ९ क्रमांकाचा प्रभाव तुम्हाला प्रौढ, उदार आणि दयाळू बनवतो. म्हणूनच, हे वर्ष आत्म-चिंतन, आत्म-विकास आणि इतरांची सेवा करण्याचे वर्ष असेल.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
०७.०४.२०२६

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 116 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..