नवीन लेखन...

विचार पुष्प – एका युगाचा अंत होत आहे.

येणाऱ्या १०-१५ वर्षांत एक संपूर्ण पिढी हे जग सोडून जाणार आहे… ती पिढी म्हणजे आजचे ‘ज्येष्ठ नागरिक’, ज्यांचे वय सध्या ६० ते ७५ वर्षांच्या दरम्यान आहे. ही पिढी खरोखरच खूप वेगळी आहे… ‌रात्री लवकर झोपणारी, पहाटे लवकर जागी होणारी आणि पहाटेच्या थंड हवेत फिरायला जाणारी ही माणसं.

अंगणातील झाडांना पाणी देणारी, देवाची पूजा करण्यासाठी फुले तोडणारी, मनापासून पूजा-अर्चा करणारी आणि दररोज न चुकता मंदिरात जाणारी ही पिढी. रस्त्यात भेटणाऱ्या लोकांशी थांबून गप्पा मारणारी, त्यांच्या सुख-दुःखाची चौकशी करणारी, दोन्ही हात जोडून नमस्कार करणारी आणि देवाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा कणही तोंडात न टाकणारी ही माणसं. त्यांचं जगच किती निराळं होतं…

सण-वार, पाहुणचार, शिष्टाचार, अन्न-धान्याची चिंता, तीर्थयात्रा, चालीरीती आणि सनातन धर्माभोवती फिरणारं त्यांचं आयुष्य. जुन्या फोनवरच खूश राहणारे, फोन नंबरची डायरी जपून ठेवणारे, चुकून रॉन्ग नंबर लागला तरी प्रेमाने बोलणारे आणि वर्तमानपत्र दिवसातून दोन-तीन वेळा वाचणारे लोक. एकादशी कधी आहे हे तोंडपाठ असणारे, अमावस्या-पौर्णिमा लक्षात ठेवणारे, देवावर प्रचंड श्रद्धा ठेवणारे, समाजाचा आदर (आणि धाक) बाळगणारे, वर्षानुवर्षे तीच जुनी चप्पल, बनियान आणि चष्मा वापरणारे साधे लोक. उन्हाळ्यात लोणची-पापड बनवणारे, घरचा कुटलेला मसाला वापरणारे आणि बाजारात नेहमी गावरान टोमॅटो, वांगी, मेथी शोधणारे हे रसिक. तुम्हाला माहित आहे का? हे सर्व लोक हळूहळू आपली साथ सोडून जात आहेत. तुमच्या घरातही असे कोणी आहे का? जर असतील, तर त्यांची खूप काळजी घ्या. नाहीतर एक महत्त्वाची शिकवण त्यांच्यासोबतच कायमची निघून जाईल… ती म्हणजे ‘संतोषी जीवन’, साधेपणाने जगण्याची कला, प्रेरणा देणारं आयुष्य, भेसळ आणि दिखाव्याशिवाय जगणं, धर्माच्या मार्गावर चालणं आणि सर्वांची काळजी घेणारं आत्मीय जीवन.

तुमच्या कुटुंबात जे ज्येष्ठ आहेत, त्यांना मानसन्मान, आपुलकी, वेळ आणि प्रेम द्या. जमल्यास त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा. संस्कारच गुन्हेगारी रोखू शकतात, सरकार नाही !! शेवटचं पण महत्त्वाचं…

मानवी इतिहासातील ही शेवटची पिढी आहे, ज्यांनी आपल्या मोठ्यांचे ऐकले आणि आता आपल्या लहानांचेही ऐकत आहेत. पुढची येणारी पिढी हे अनुसरून चालेल का?…असे होईल तर खूप चांगले होईल..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..