आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळिक; संतापलेल्या भारतीयांनी चीनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हांक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आत्ताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्वाचे राहणार नाहीत. […]
गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते. […]
शाळा-कॉलेजमधले आपले शिक्षण पूर्ण झाले. शैक्षणिक वर्षाला एक पूर्णविराम असतो.पण एकदा नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवण्यासाठी, उच्च पदावर जाण्यासाठी पुन्हा अभ्यास करावाच लागतो. व्यवसायात आणि पेशातही तसेच आहे. फरक एवढाच आहे, प्रशासकीय सेवेत असणार्या किवा बँक कर्मचार्यांना स्वतःच्या पैशांतून प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. व्यावसायिकाला मात्र धंद्यात टिकून राहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी स्वतः पदरचे पैसे खर्च करावे लागतात. […]
कोट्यावधींनी संगणक असलेल्या आपल्या देशात अजूनही परदेशी ऑपरेटिंग सिस्टिम, परदेशी वर्ड प्रोसेसर, परदेशी इमेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, परदेशी ब्राऊझर्स वापरावे लागतात हे दुर्दैव आहे. नाहीतरी “गुलामगिरी”ची आपल्याला सवयंच आहे !!! ज्या “मायक्रोसॉफ्ट ऑफिस”वर आम्ही रात्रंदिवस काम करतो तसंच एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची आमच्याकडच्या “जायंटस”ना इच्छा का होत नाही? […]
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. हा बुडबुडा कधीही फूटू शकतो. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका फटक्यात शून्य होऊ शकते. अर्थात, या इशार्यानंतरही या आभासी चलनाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. याचे कारण अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय करणार्यांसाठी तसेच आभासी चलन गोळा करून काळा पैसा जमा करणार्यांसाठी हे एक सुरक्षित माध्यम ठरते आहे. […]
महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे. […]
हा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला किंवा इतर प्राथमिकतांकडे दुर्लक्ष करून केवळ बुलेट ट्रेनचा उदो उदो केला गेला, तर इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती ओढवू शकेल. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने आजवर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. २०२२ सालपर्यंत नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारत-जपान मैत्रीची बुलेट ट्रेन एकही लाल सिग्नल न लागता पळवावी लागेल. […]
अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत. अशा या मराठमोळ्या उद्योजकाच्या महान कार्यास मानाचा मुजरा आणि खुप खुप शुभेच्छा…!! […]
आजच्या इतिहासात १४९ वर्षांत पहिल्यांदाच बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस”..? विश्वासाचं दुसरं नाव म्हणून देश ज्या उद्योगसमूहाकडे बघतो, त्या “टाटा” समूहातील एक कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. दूरसंचार क्षेत्रातील ” टाटा टेलिसर्व्हिसेस / Tata Teleservices” या कंपनीला अपेक्षित यश मिळत नसल्यानं ती बंद करण्याचा विचार व्यवस्थापन करतंय. तसं झाल्यास, टाटा समूहाच्या १४९ वर्षांच्या […]
गिरगावतल्या ठाकुरद्वारचं हॉटेल विनय इथं GST लागू झाल्यापासून खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात आलेले आहेत… या हॉटेलमध्ये १ जुलै २०१७ पासून नवे रेट कार्ड आले आहे… हॉटेलच्या मेन्यू कार्डवर नवे आणि जुने दर स्पष्टपणे लिहिलेले आहेत… या नव्या दराचे परिणाम बिलात दिसतात. बिल ५ ते १०% कमी झालेले आहे… हा बदल झालाय तो GSTमुळे.. हे काही काल […]