नवीन लेखन...

निपटारा – भाग  2

काही खास चर्चा असली म्हणजे आम्ही ‘परिंदा’ मध्ये भेटायचो. सिद्धार्थ गार्डनच्या जवळ, नाल्यावरच्या सिद्धी विनायक मंदिरासमोर, परिंदा म्हणजे एक धाबा वजा छोटंसं हॉटेल होतं. भरपूर मोकळी जागा, उघड्यावर टेबल खुर्त्या प्लॅस्टीकच्या, चार चार टेबलांच्या ग्रुपला एक मेंदीचं बुटकं कुंपण, आजूबाजूला भरगच्च झाडी. फारशी गर्दी नाही, भरवस्तीत असूनही शांत आणि आमच्या सारख्या मुलींना सुरक्षित. तिथं फारशी वर्दळही […]

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग पहिला

जगभरात डोंगरमाथे गाठण्यासाठी छोट्या म्हणजे २ फूट रुंदीच्या रुळांवरून टॉय ट्रेन्स धावण्यास साधारण १८९० सालापासून सुरुवात झाली. या गाड्यांचे डबे छोटे आणि सुबक बांधणीचे असतात. डब्यांना दोन्ही बाजूंनी प्रशस्त खिडक्या, छोटी दारं असतात आणि आरामात बसण्यासाठी बाकं असतात. वाफेची वा डिझेल इंजिन असलेल्या अशा गाडीचा वेग इतका कमी असतो, की तरबेज प्रवासी, विक्रेते, अशी मंडळी चालती […]

कल चमन था

दादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ चित्रपटातही, ती होती. पंधरा वर्षांच्या कालावधीत तिच्या जीवनात फार चढ-उतार आले. तिची आई सोबत होती, तोपर्यंत ती निर्धास्त होती. आई गेल्यानंतर, एकाकी पडली. ती फाॅर्मात असताना तिच्या जीवनात राजू उर्फ अली, हा बदमाश माणूस आला. तो अमेरिकेत हाॅटेल इंडस्ट्रीज मध्ये होता. हुमा त्याच्या जाळ्यात, अलगद अडकली. तो व्यवसायासाठी तिच्याकडे पैसे मागत राहिला. हुमा भविष्याचा काहीही विचार न करता, त्याला पैसे पुरवत राहिली. शेवटी चार वेळा, मोठ्या रकमा दिल्यानंतर, हुमाकडे काहीच शिल्लक राहिली नाही. […]

न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ काढण्यासाठी मदत झाली ती ‘मेंसेंजर’ या नासानं बुधाकडे पाठवलेल्या अंतराळयानाची. मेसेंजर यानानं २०११ ते २०१५ या काळात बुधाभोवती प्रदक्षिणा घातल्या. बुधाकडे जाताना या यानानं शुक्राजवळूनही प्रवास केला. आपल्याकडील उपकरणाद्वारे, या दोन्ही ग्रहांच्या पृष्ठभागापासून विविध अंतरावरून जाताना या यानानं, या ग्रहांपासून येणाऱ्या न्यूट्रॉन कणांची संख्या मोजली व त्यावरून संशोधकांना न्यूट्रॉनच्या सरासरी आयुष्याचं गणित मांडणं शक्य झालं. या गणितानुसार न्यूट्रॉनचं सरासरी आयुष्य हे फक्त तेरा मिनिटांचं असल्याचं आढळून आलं आहे. […]

आमदार विनायक मेटे

पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे याच्या नावावर आहे. […]

भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती. […]

जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसन

टायसनने व्यावसायिक बॉक्सिंगचं जग आपलंसं केलं. पहिल्या १८ महिन्यांत त्याने २७ विजय मिळवले. २७ मधील २५ विजय नॉक आऊट होते . पुढे हेवीवेट अजिंक्यपदाच्या लढतीत टेव्हर बसिकला दोन फेऱ्यात लोळवलं आणि केवळ २० व्या वर्षी वर्ल्ड हेवीवेट चम्पिअनचा किताब मिळवून जगाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची मोहर उटविली. […]

केसरी टुर्स च्या संचालिका झेलम चौबळ

केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच. […]

भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ

२० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’ […]

लाटांवरचे करिअर

लेखक व्यापारी नौदलातील निवृत्त कॅप्टन आहेत. शिवाय लेखक आणि कवीही आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसचे गर्वगीत’ ह्या कवितेने नाविकांची, त्यांच्या धैर्याची, चिकाटीची चपखल ओळख आपल्या कवितेतून करून दिली आहे. नौदल म्हणजे नेव्ही. राष्ट्रीय सागरी सीमांचे रक्षण करणारे दल. जगात सर्वात आधी कुठल्या उद्योगाचे जागतिकीकरण झाले असेल तर ते जहाज उद्योगाचे. अनेक लहान-मोठ्या बंदरांनी युक्त असलेला आणि साडेसात […]

1 2 3 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..