नवीन लेखन...

रेल्वे-कामगार संघटना आणि रेल्वेचे संप

रेल्वे-कामगार संघटना पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे १९०० ते १९१४ पर्यंत अस्तित्वातच नव्हत्या. तत्पूर्वी, काही प्रांतांतील रेल्वे-कामगार व वरिष्ठ अधिकारी यांच्यात भांडणं, मारामाऱ्या होत. काहींचे तर मृत्यूही झाले होते, पण कामगारांचे हक्क मागणारी, त्यासाठी भांडणारी कोणतीही संघटना स्थापन झालेली नव्हती. त्या काळानुसार रेल्वे कामगारांचा पगार अतिशय कमी होता. संघर्ष होतच होता. त्यांतून मार्ग काढण्याकरता, कामगारांचं संघटित […]

हत्ती व सिंहाचा रेल्वेरुळांवरील वावर

भारताच्या अति-पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, या भागांत काही वर्षांपूर्वी रेलगाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आय.आय.टी.च्या इंजिनीअर्सनी ‘अनमॅन्ड एरिअल व्हीइकल’ (यु.ए.व्ही.) चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना (ते रेल्वेमार्गावर/पाशी आलेले असल्यास) शोधणारे संवेदक बसविले […]

पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने आखलेले विविध प्रकल्प

रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून […]

भारतीय रेल्वेची हरितक्रांती योजना

पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेता भारतीय रेल्वेनं हरितक्रांती योजना विविध स्तरावर अमलात आणण्यास सुरुवात केलेली आहे. भारतातील हरितक्रांतीचं प्रतीक असलेलं पहिलं स्टेशन मानवळ हे जम्मू-उधमपूर मार्गावरील आहे. या स्टेशनला विद्युत प्रवाह वारंवार खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत असे. आता स्टेशनवरचे सर्व दिवे, सिग्नल्स, सौर ऊर्जेवर चालतात. असा विद्युत पुरवठा आपत्कालीन वेळेकरता तयार ठेवला जातो. ऊर्जा व्यवस्थापन […]

बुलेट ट्रेन्सचा जागतिक आढावा

सन १८९९ मध्ये जर्मनीत पहिली हाय स्पीड ट्रेन अर्थात अतिवेगवान ट्रेन सुरू झाली. तेव्हा तिचा वेग ताशी ७२ कि.मी. होता. पुढे १९०३ सालापर्यंत हा वेग ताशी २०६ कि.मी. इतका झाला होता. १९५७ साली जपानमध्ये ताशी १४५ कि.मी. वेगाची पहिली गाडी सुरू झाली. १९६४ ऑलिंपिकचे औचित्य साधून टोकियो ते ओसाका ही पहिली बुलेट ट्रेन ताशी २१० कि.मी. […]

मोनोरेल

भारतातील पहिली मोनोरेल १९०२ ते १९०८ या काळात कुंडला व्हॅली, मुन्नार, केरळ येथे धावत होती. ही रेल खाजगी मालकीची होती. पुढे त्या मार्गाचं नॅरोगेजमध्ये रूपांतर झालं. १९२४ सालापर्यंत तो मार्ग चालू होता. पुढे पुरात वाहून गेल्यावर तो मार्ग बंद पडला. पतियाळा राज्यात फेब्रुवारी १९०७ मध्ये मोनोरेल चालू झाली व ती १९२७ मध्ये बंद पडली. पुढे बऱ्याच […]

रॅपिड ट्रान्झिट रेल सिस्टीम…

जगामध्ये जसजशी शहरं झपाट्याने वाढत गेली, तसतशी जलद वाहतुकीची गरज वाढू लागली, लोकल-रेल्वेयंत्रणा अपुरी पडू लागली. त्यातच जागेची कमतरताही भासू लागल्याने तीन नवीन यंत्रणा अस्तित्वात आल्या: १. मेट्रो २. मोनोरेल ३. लाईट रेल युरोपमध्ये जमिनीखालून रेल्वे (अंडरग्राऊंड ट्यूब-रेल्वे) फार लवकर उपयोगात आणली गेली होती. लंडन मधील पॅडिंग्टन ते फटिंग्टन अशी ४ मैल लांबीची ट्यूब-रेल इ.स. १८६३ […]

भारतीय रेल्वे आणि संगणकीकरण

भारतीय रेल्वेत संगणकीकरणाने विलक्षण क्रांती घडवून आणलेली आहे. ही प्रगती गेल्या २० ते २५ वर्षांतील असून, रोज ४००० पेक्षा जास्त जागांवरून १५ ते २० लाख तिकिटांचं भारत भरातील ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं आरक्षण केलं जातं. आता ‘इ’ रिझर्व्हेशनमुळे तर हजारो तिकिटं खिडकीशी न जाता आरक्षित करण्याची सोय आहे. रेल्वेच्या या विभागाला पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम […]

जगभरातले काही महाकाय रेल्वे प्रकल्प

१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका) तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला ‘ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग’ म्हणून ओळखलं […]

मुंबई-पुणे: रेल्वे प्रवास

१८५३ मध्ये मुंबई ठाणे रेल्वे सेवा सुरू झाली तरी पुणं गाठणं कठीणच होतं. याचं कारण होतं, मधला अजस्र खंडाळा घाट. त्या काळात बग्गीतून किंवा घोड्यावर बसून मुंबई-पुणे प्रवास ३-४ दिवसांत पुरा केला जाई. सन १८३१ मध्ये मुंबई-पुणे पत्रं पाठविण्याची पोस्टाची सोय होती. या प्रवासास ४८ ते ७२ तास लागत. घोडे व बैलगाड्यांच्या मदतीनं भारतभर पत्रे पाठविण्याची […]

1 2 3 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..