नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ३ – सोनसळी पिवळा बहावा वृक्ष

बहावा! एक नितांतसुंदर असं झाड. भारतीय हरितधनातील एक महत्त्वाची वृक्ष वर्गातील वनस्पती बहावा. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू, पिवळ्या-सोनेरी रंगाच्या छटांमुळे ‘गोल्डन शॉवर ट्री’ असंही म्हणलं जातं. अशी अनेक नावं धारण करणारं भारतीय उपखंडातील मूळचं झाड. […]

चष्मे हे जुलमी गडे

चष्मा म्हणजे चाळिशी किंवा चाळिशी म्हणजे चष्मा अशा भ्रमात किंवा संभ्रमात राहण्याचे दिवस आता डस्टबिनमध्ये जमा झालेले आहेत. एकेकाळी चष्मा डोळ्यांवर चढला किंवा केसांत रुपेणी छटा झळकली की आयुष्याचा मध्यांतर जवळ आला, या कल्पनेने हुरहूर दाटून घेत असले. आता आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून रडणारी मुले सुद्धा चष्म्यात दिसतात. ती चष्मा काढून रडतात आणि रडून झाले की डोळे पुसून पुन्हा चष्मा घालतात. […]

चिरकाल स्मरणात राहणारे बाबूजी

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…. हे शब्द खरे ठरवत, हे गीत ज्या महान गायकाने आपल्या स्वत:च्या आवाजात साऱ्या जगाला ऐकविले आणि या पुढेही ऐकवीत राहणार ते सुधीर फडके तथा बाबूजी आपल्यामधून जाऊन ‘पाच वर्षे झाली तरी सुध्दा त्यांच्या गाण्यांमुळे ते. निघून गेले यावरआपला विश्‍वास बसत नाही. […]

कौल रघुनाथाचा

कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे. […]

स्वाध्याय

उपनिषदातील अनुशासनात ज्या अनेक आज्ञा केल्या आहेत त्यातील एक आहे ‘स्वाध्यायान्मा प्रमदः म्हणजे स्वाध्यायात प्रमाद ‘होऊ नये. यथास्थित स्वाध्याय घडावा यासाठी काही व्रतांचे आचरणही त्यात आलेले आहे. ऋत स्वाध्याय प्रवचने, सत्यं स्वाध्याय प्रवचने – इत्यादी, थोडक्यात सदाचरण, सत्यनिष्ठा, संयमित जीवन इत्यादींनी स्वाध्याय संपन्न असावा. […]

शिवराय लेणी स्थापत्य

वे’रुळ व एलोरा किंवा अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती जरी इ. स. १ ते इ. स. १४ च्या दरम्यान झाली असली तरी त्या आपल्याला आता आता म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानवर होतं त्या काळात जगाला वेरुळ कळाल्या. डोंगररांगांमध्ये ही निर्मिती झाली. जळगावजवळ अजिंठा तीन डोंगरांमध्ये अजिंठा लेण्यांत चित्रकला साकारली. या व अशा प्रकारच्या लेण्या या महान राष्ट्रात… ‘महाराष्ट्रात’ सुमारे एक हजारांवर आहेत. […]

मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक  ह मो मराठे

ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. […]

स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन

भारतीय गरीब शेतकऱ्याच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. भारतासारख्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ ची स्थापना केली होती. […]

ज्येष्ठ कलाकार नयना आपटे

नयना आपटे या ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे यांच्या कन्या, शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या. लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या. […]

1 2 3 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..