गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

चंद्रघण्टा माता – तिसरी माळ

आज नवरात्रीच्या ऊत्सवाचा तिसरा दिवस.दुर्गामातेच्या आजच्या रुपाचं वर्णन आणि महत्व काया आहे याची माहिती आपण घेणार आहोत.या रुपामध्ये मातेने सिंहाला आपले वाहन म्हणून निवडले असून तिचा तिसरा नेत्र सतत ऊघडा असतो ज्यामुळे दानवांचा-राक्षसांचा अत्याचार नष्ट करण्यासाठी लक्ष ठेवते. दानवांचा-राक्षसांचा नायनाट करण्यासाठी दहा शस्रांचा वापरा केलेला आहे.अर्थातच चंद्रघण्टा मातेला दहा हात आहेत. धनुष्य,बाण,कमंडलु,तलवार,अक्षरमाला,गदा,त्रिशुळ,कमलपुष्प धारण केलेले असून भक्तांना […]

ब्रह्मचारिणी – दुसरी माळ

काल आपण माता दुर्गेच्या नवरात्रींपैकी पहिल्या दिवसाच्या पर्वकालातील माहिती पाहिली.आज या कुलोत्पन्न ऊत्सवाचा दुसरा दिवस.दुसरी माळ.आज गुरुवार.गुरु म्हणजे पिवळ्या रंगाचा प्रभाव.आज मातेने पिवळी वस्र परिधान केलेली आहेत अशी श्रध्ददा आहे.दुसर्या माळेला देवी भागवतात अनंत,मोगरा,चमेली,तमर अशा पांढर्या फुलांची माळ घटापर्यंत अर्पण करायची आहे. जपः-दधाना करपद्माभ्याम् क्षमालाकमण्डलू। देवी प्सीदतु मणि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ।। या जपाने ब्रह्मचारिणी मातेची आळवणी करुन […]

शारदीय नवरात्र – पहिली माळ

पहिल्या माळेला आजच्या बुधवारी सर्वसाधारणपणे निळे वस्र, साडी वगैरे पेहराव हा निळ्या रंगाचा असतो. बुधवार या वाराचा आणि बुधब्रहस्पतींचा आवडता रंग निळा आहे. म्हणून आज भाविकांनीही निळ्या रंगांचे कपडे परिधान केलेत तर त्या देवतेच्या चैतन्यापर्यंत पोहोचण्यास “बायपास” मिळतो.   […]

रंगचिकित्सा – भाग ४ 

या लेखात आपण सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिल्या क्रमांकाचे नक्षत्र  “अश्विनी”याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत असतो त्यावर माहिती मिळवु. […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ३

वास्तुशास्त्र पेंटिंग म्हणजे काय? यावर मागील लेखात आपण माहिती घेतली. या विषयावर कोणाला फारशी माहिती नसेल. कधी फारसा विचारही कोणी केला नसेल. परंतु घर वा वास्तूची अंतर्गत सजावट करताना, भिंतींना सजविण्यासाठी पेंटिंग, एखादा आकर्षक आकार इत्यादींची योजना केलेली असते. आपल्याला वा पाहणाऱ्याला त्यातील फारसे काही समजले नाही तरी त्या अंतर्गत सजावटीच्या वातावरणात थांबल्याने काहीतरी समाधान मिळत असते. याचा […]

रंग चिकित्सा – भाग ३

आपल्याला राशी – नक्षत्र वगैरे दिसत नाहीत मात्र रंग दिसतात. जी गोष्ट आपल्याला दिसते तीचं ज्ञान घ्यायला नव्हे व्हायला वेळ लागत नाही. ज्या बाबींचे ज्ञान होतं – आकलन होतं – त्यावर आपला चटकन विश्वास बसतो. विश्वास बसला तर उचित परिणाम व्हायला आपले मन आणि शरीर साथ देत असतं. आणि अद्भुतता वाटणारी ही ‘रंग चिकित्सा’ आपल्याशी कधी ऋणानुबंध प्रस्थापित करते हे कळत देखील नाही. […]

रंग चिकित्सा – भाग २

‘रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते.  उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात. […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग २

आपणास उत्सुकता आहे ती ‘वास्तुशास्त्र पेंटिंग’ म्हणजे काय ? आणि त्या पेंटिंग्स मुळे खरंच काही अपेक्षित परिणाम मिळतो काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची…!!  बरोबर ना… !! तेच आता आपण पाहू. […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – एक अद्भुत रसायन

अनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो ! […]

रंग चिकित्सा – भाग १ – एक आश्वासक उपचार

…. आता मात्र एक मार्ग जो पूर्वी होताच  फक्त आपल्याला माहिती नव्हता – “रंगचिकित्सा”..  !!  “रंगोपचार”…  म्हणजे काय?  तर रंगांपासून आपल्यावर आपण उपचार करून घेतो. आपण आस्तिक असो वा नास्तिक, कुठल्याही वयोगटाचे  अन् आर्थिक उत्पन्न गटाचे. आपण कुणीही असा. आपली प्रकृती कुठल्याही प्रकारची असो…  रंगोपचारांना प्रतिसाद हा मिळतोच मिळतो – उपचारकर्त्यांकडून…!! […]