पिंडीतील ब्रह्मांड

विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते […]

शुद्धीसाठी गुरू

कितीक वेळा धुतला कोळसा,  रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई,  परि काळेपणा कायमचा  ।। भट्टीत घालून त्यास जाळता,  घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो,  राही न जेंव्हा कोळसा  ।। मलीनता ही मनामधली,  खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान ,  शुद्धीसाठी पुरे नसे  ।। गुरू लागतो अग्नी सारखा,  चित्त शुद्धी करिता  । […]

प्रकाश आणि तम

प्रकाश आणि अध:कार तो, दोन बाजू नाण्याच्या सत्व नि तमोगुण,  ठरती त्या प्रभूच्या….१ सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२ जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना केवळ विचारांची…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ? सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत […]

चिखलातले कमळ

जव्हार (  ठाणे  )   ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात  Medical Superintendent   म्हणून कार्यारात होतो.  रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली   की  दोन  दिवसापूर्वी  ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता,  ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती. धावपळ झाली.  सर्वांनी शोधा शोध केली. शासकीय स्थरावर जे करावयाचे ते केले गेले. अतिशय दु:खद व मनास निराश करणारी घटना होती.  त्या बाईने हे सारे योजूनच केले असल्यामुळे,  नाव गाव पत्ता हे सारे असत्य होते. कोणता […]

जागृत आंतरात्मा

कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी, चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी, निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले, नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला कुणी नव्हते जवळी माझ्या त्या […]

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी,  वाटत असते ,तुमच्या मनीं अपेक्षा करता तुम्हीं प्रेमाची,  सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो,  दैनंदिनीच्या तुमच्या जीवनीं क्षणा क्षणाला भासत असते,  जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे दोन मनें ती सांधली जावूनी,  आनंद सर्वत्र […]

सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४ चित्त करूनी […]

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत,  छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता,  चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार,  भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी,  ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी,  रचली जाते एक कविता…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००५०७९८५० bknagapurkar@gmail.com    

अजाणतेतील अपमान

स्फुर्ति येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहीली   शब्द येतां ध्यानी   ।। कवितेतील शब्दरचना   झाली बहरदार   । कौतूकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।। पुर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।। फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य केले मी अजाणतां   […]

1 2 3