नवीन लेखन...

जोसेफ रडयार्ड किपलिंग

ब्रिटिश कथाकार, कवी आणि कादंबरीकार व मोगली व जंगलबुकचे लेखक जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी मुंबई येथे झाला. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे रडयार्ड किपलिंग या नावानेच प्रसिद्ध होते. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला आई-वडिलांनी इंग्लंडला शिकण्यासाठी नेलं होतं. पुढे ते वयाच्या १८व्या वर्षी पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी पत्रकारिता केली. भारतातलं ग्रामीण जीवन त्यांनी जवळून अनुभवलं होतं. कथेइतकंच त्या काळात त्याचं काव्यलेखनसुद्धा सुरू होतं आणि ‘गंगादीन’, ‘मंडाले’, ‘डॅनी डिव्हर’ या त्यांच्या ब्रिटिश राजवटीतल्या कविता चांगल्याच गाजल्या होत्या.

त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथाही गाजल्या होत्या. त्याची ‘दी जंगल बुक’, ‘दी सेकंड जंगल बुक’ आणि ‘किम’ ही पुस्तकं अफाट लोकप्रिय झाली. बच्चे कंपनीला प्रिय अशा मोगली आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जंगलातल्या त्याच्या साथीदारांवर अनेक फिल्म्स, टीव्ही सीरिज बनल्या आणि लोकप्रिय झाल्या. त्यांना १९०७ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
जस्ट सो स्टोरीज, रिकी टिक्की तावी, कॅप्टन्स करेजस, दी मॅन हू वुड बी किंग, प्लेन टेल्स फ्रॉम दी हिल्स, स्टॉकी अँड कंपनी, अंडर दी देवदार्स, तुमाई ऑफ दी एलिफंट्स अशी त्याची इतर अनेक पुस्तकं वाचकप्रिय आहेत. जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचे १८ जानेवारी १९३६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2284 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..